|| अनिल पंतोजी

वाहन थांबण्यास किंवा उभे करण्यास मनाई हे चिन्ह असे दर्शविते की, सदर जागेवर वाहन थांबविण्यास किंवा उभे करण्यास मनाई आहे.

काही रस्त्यांवर वाहनांचा अविरत प्रवाह असतो. अशा ठिकाणी एखादे वाहन क्षणभर थांबले तरी वाहतुकीची कोंडी तर होतेच, परंतु अपघाताचीदेखील शक्यता असते. हे सर्व टाळण्यासाठी ह्या चिन्हाचा वापर गरजेचा आहे. तसेच या चिन्हाचा अनादर केल्यास पोलीस/आरटीओ विभागामार्फत दंडात्मक कार्यवाहीस तोंड द्यावे लागते. उंची मर्यादा सदर चिन्ह दर्शविलेल्या आकडय़ापेक्षा जास्त उंचीच्या वाहनास मनाई असल्याबाबत सुचित करते.

भौगोलिक परिस्थितीनुसार रस्त्यांची बांधणी रेल्वे पुलाखालून अथवा बोगद्यातून करावी लागते. त्यामुळे वाहन उंचीच्या मर्यादा असतात. काही प्रसंगी वाहन अशा ठिकाणी जास्त उंचीमुळे अडकल्याचे आपण पाहतो. अशा अप्रिय घटना अथवा अपघात टाळण्यासाठी चालकाने सदर चिन्हाबाबत जागरुक असणे आवश्यक आहे.