07 March 2021

News Flash

ट्रॅफिक सेन्स..

चालकाने सावध होऊन वाहनाचा वेग व दिशा यावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे.

|| अनिल पंतोजी

डावे वळण

हे चिन्ह असे दर्शवते की पुढे गेल्यावर डाव्या बाजूस वळण आहे. चालकाने सावध होऊन वाहनाचा वेग व दिशा यावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. सदर चिन्हास योग्य प्रतिसाद देऊन कृती केल्यास दुर्घटना टाळणे शक्य होते.

डावे तीव्र वळण

हे चिन्ह असे दर्शवते की पुढे गेल्यावर डाव्या बाजूस तीव्र वळण आहे. चालकाने योग्य प्रतिसाद देऊन वेग नियंत्रित करून दिशेकडे लक्ष देणे गरजेचे आहे. अशा ठिकाणी रात्रीच्या वेळी दिव्यांची उघडझाप (अप्पर डिप्पर) करीत वाहनचालकांना सावध करावे.

तीव्र चढ

हे चिन्ह असे दर्शवते की पुढील बाजूस तीव्र चढ आहे. अशा ठिकाणी चालकाने वाहनाचा वेग कमी करून खालच्या गियरचा वापर करावा. तीव्र चढावर पुढील वाहन बऱ्याचदा मागे येऊ शकते. त्याकरिता दोन वाहनांत योग्य अंतर राहील याबाबत चालकाने दक्ष असणे गरजेचे आहे.

तीव्र उतार

हे चिन्ह असे दर्शवते की पुढील बाजूस तीव्र उतार आहे. घाट चढताना ज्या गियरचा वापर चालकाने केला आहे त्याच गियरचा वापर उतरतानाही करणे गरजेचे आहे.

वर्तुळ मार्ग

वर्तुळ मार्गाचा वापर काटरस्त्यास पर्याय म्हणून केला जातो. या मार्गावर वाहतूक नियंत्रक दिवे नसले तरी वाहतूक सुरक्षित व कार्यक्षमतेने पुढे जाणे गरजेचे असते. वर्तुळ मार्गात प्रवेश करताना ज्या दिशेला वळायचे असेल त्याच मार्गिकेत वाहन ठेवावे .

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 29, 2020 12:09 am

Web Title: traffic sense akp 94 3
Next Stories
1 गावरान कोंबडा
2 कार्यात्मक द्रवे आणि वंगणे
3 नागभूमीची सफर   
Just Now!
X