आपल्या आयुष्यात रंगांना फारच महत्त्व आहे. याच रंगांचा वापर करून केल्या जाणाऱ्या उपचारपद्धतीला क्रोमोटो थेरपी किंवा रंगोपचार म्हणतात. ही एक पूरक उपचार पद्धती असून शरीरातील ऊर्जेचा समतोल राखण्यासाठी ती महत्त्वाची आहे. विशेषत: मानसिक तणाव, नैराश्य, चिंता आणि विविध मानसिक विकारांवर नियंत्रण मिळवण्यासाठी रंगोपचार पद्धतीचा वापर केला जातो. भारत, चीन आणि इजिप्तमध्ये फार पूर्वीपासून या पद्धतीचा वापर करण्यात आला आहे. रंग आणि प्रकाश यांचा वापर या उपचार पद्धतीत केला जातो.
प्रत्येक रंगाला वेगवेगळी वारंवारता असते. शरीराच्या प्रत्येक पेशीला गरज असते प्रकाशऊर्जेची. शरीरावरील पेशील रंग शोषून घेतात आणि त्यामुळे शारीरिक, भावनिक व मानसिक परिणाम दिसून येतात. हे विज्ञान लक्षात घेऊन या उपचार पद्धतीचा वापर केला जातो.
आपल्या शरीरात सात ऊर्जा चक्र असल्याचे ही पद्धती मानते. या उर्जाचक्रांचा वापर या उपचारपद्धतीत केला जातो.
लाल रंग भौतिक शक्ती जागृत करतो. नारंगी रंग उदासीनता दूर करतो, हिरवा रंग तटस्थ रंग आहे. असे प्रत्येक रंगाचे महत्त्व जाणून त्याप्रमाणे उपचार केले जातात. त्यासाठी त्या त्या रंगांच्या प्रकाशाचा, सुगंधी अत्तरांचा वापर केला जातो.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on March 3, 2020 4:12 am