05 August 2020

News Flash

उपचारपद्धती : होमिओपॅथी

रोगाची लक्षणे ज्या औषधाच्या लक्षणसमूहात आहेत, जी रोगाच्या लक्षणांपेक्षा शक्तिमान आहेत

अ‍ॅलोपॅथीनंतर लोकप्रिय असलेली उपचारपद्धती म्हणून होमिओपॅथीकडे पाहिले जाते. डॉ. सॅम्युअल हॅनेमन या जर्मन वैद्यकीयतज्ज्ञाने १७९०मध्ये या उपचारपद्धतीचा शोध लावला. ‘समानाला समान बरे करते’ या मूलभूत तत्त्वावर होमिओपॅथी ही उपचारपद्धती आधारलेली आहे. म्हणजे लोखंडाने लोखंड कापावे, काटय़ाने काटा काढावा या तत्त्वानुसार ही उपचारपद्धती चालते. त्यामुळे या चिकित्सापद्धतीला समचिकित्सा असे म्हटले जाते. म्हणजे एखाद्या व्यक्तीने काही सेवन केल्यानंतर त्याला आजार झाल्यास, औषध म्हणजे तोच पदार्थ सूक्ष्म प्रमाणात द्यावा. रोगाची लक्षणे ज्या औषधाच्या लक्षणसमूहात आहेत, जी रोगाच्या लक्षणांपेक्षा शक्तिमान आहेत, ती औषधे रुग्णाला दिल्यास रोग बरा होतो, असे ही उपचारपद्धती सांगते.

होमिओपॅथीचे औषध देताना रुग्णाचे व्यक्तिमत्त्व, आवडीनिवडी, सवयी आणि एकूण आरोग्य विचारात घेऊन उपचार केले जातात. प्रत्येक औषधाला स्वतंत्र अस्तित्व, रूपरंग व स्वभाव असतो आणि ते आपल्याशी सहरूप असलेल्या व्यक्तीला बरे करू शकते, हे होमिओपॅथीचे सूत्र आहे. फार लहान मात्रेत असलेल्या होमिओपॅथीच्याऔषधांत रोगनिवारणाची सुप्त शक्ती असते, असे समजले जाते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 14, 2020 3:35 am

Web Title: treatment method in homeopathy zws 70
Next Stories
1 आयुर्उपचार : पंचकर्म म्हणजे काय?
2 मनोमनी : तणावाला जाणू या, स्वीकारू या!
3 सेकंडहॅण्ड गाडी घेताना..
Just Now!
X