या आसनामध्ये शरीराचा आकार त्रिकोणी होतो, म्हणून त्यास त्रिकोणासन म्हणतात. कंबरेचे दुखणे असणाऱ्यांसाठी आणि पोटावरील अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठी हे आसन महत्त्वाचे आहे. या आसनामुळे कंबरेचे स्नायू लवचीक व मजबूत बनतात. या आसनामुळे पचनक्रियाही सुधारते. लठ्ठपणा कमी करण्यासाठी आणि शरीर सुडौल करण्यासाठी हे आसन उपयुक्त आहे.

कसे करावे?

raj thackeray amit shah (
भाजपाने मनसेला नेमकी काय ऑफर दिलेली? राज ठाकरे म्हणाले, “त्यांनी मला सांगितलं…”
yoga mind concentration
योगमार्ग : पर्वतासन
योगस्नेह : शलभासन
योगस्नेह : उष्ट्रासन
  • सरळ उभे राहा. दोन्ही पायांमध्ये तीन ते चार फूट अंतर ठेवा.
  • उजवे पाऊल ९० अंशामध्ये आणि डावे पाऊल १५ अंशामध्ये उजवीकडे फिरवा.
  • दोन्ही पावलांची पकड जमिनीवर घट्ट आहे याची खात्री करून घ्या.
  • एक दीर्घ श्वास आत घेऊन श्वास सोडत उजवीकडे झुकताना दोन्ही हात सरळ एका रेषेत ठेवा आणि उजवा हात जमिनीकडे आणि डावा हात हवेत सरळ येऊ द्या.
  • असे करताना कंबर वाकली नाही पाहिजे. शक्य होईल असा उजवा हात उजव्या पायाच्या नडगीवर, घोटय़ावर किंवा जमिनीवर पायाजवळ टेकवा.
  • श्वासाची गती सामान्य ठेवून जेवढा वेळ शक्य असेल, तेवढा वेळ या स्थितीत थांबून राहायचे आहे. नंतर श्वास घेत हळूहळू पूर्वस्थितीत या. त्यानंतर हेच आसन दुसऱ्या बाजूने करा.