शनिवार

नाशिकच्या दक्षिणेला ३६ कि.मी. वर असलेल्या सिन्नरला जावे. प्राचीन व्यापारी पेठ, यादवकाळातील राजधानी, श्रीनगर किंवा सिंदीनगर ते हेच. श्रीगोंदेश्वर आणि ऐश्वर्येश्वर ही सुंदर शिल्पांकित मंदिरे पाहावीत. गोंदेश्वर हे भव्य पंचायतन मंदिर आहे. नंदीमंडप फारच देखणा आहे. ऐश्वर्येश्वर मंदिरावर असलेले नृत्यशिव, लक्ष्मी, सप्तमातृका आणि छतावर असलेले अष्टदिक्पालांचे शिल्प अचंबित करणारे आहे. ते पाहून झाले की गारगोटी संग्रहालय पाहावे. झीओलाइट प्रकारच्या असंख्य स्फटिकांचे वेगवेगळे प्रकार, लाइट ग्रीन दगड, पिवळे कॅल्साईटचे स्फटिक अवश्य पाहावेत. हे संग्रहालय वर्षभर सकाळी १० ते रात्री १० उघडे असते. याचे प्रवेशमूल्य १०० रुपये आहे.

Ambabai Devis darshan will be restored from Tuesday conservation process of the idol is complete
अंबाबाईचे मंगळवारपासून दर्शन होणार पूर्ववत; मूर्तीची संवर्धन प्रक्रिया पूर्ण
Mukh Darshan Arranged for Devotees on Gudhi Padwa at Pandharpur Temple due to Conservation Work
मराठी नववर्ष आणि गुढीपाडवा दिवशी विठ्ठलाचे मुख दर्शन दिवसभर : औसेकर महाराज
khajina vihir Vitthal temple
सदाशिव पेठेतील खजिना विहीर विठ्ठल मंदिरात चोरी
khajina vihir Vitthal temple
सदाशिव पेठेतील खजिना विहीर विठ्ठल मंदिरात चोरी

रविवार

सिन्नरपासून १० कि.मी. वर असलेल्या डुबेरे गावी जावे. श्रीमंत पहिले बाजीराव पेशवे यांचे हे जन्मस्थान! डुबेरेतील पेशव्यांचे जन्मस्थान असलेला बर्वे वाडा पाहावा. गावाशेजारीच असलेला छोटेखानी डुबेरा किल्ला पाहावा. चढायला अगदी सोपा आणि पायऱ्या असलेल्या या किल्लय़ावर जाऊन परिसर न्याहाळावा. दूरवर लांबच लांब पसरलेला पट्टा किल्ला सुंदर दिसतो. त्याचसोबत आड, औंढा, बितिंगा किल्लेपण दिसतात. पुढे २० कि.मी. वर असलेल्या आढळा नदीकाठी असलेल्या टाहाकारी गावी यावे. तिथे असलेले शिल्पजडित, तीन गाभारे असलेले जगदंबा मंदिर नक्की पाहावे. मंदिरातील छताला मध्यभागातून खाली लोंबणारे एक दगडी झुंबर अप्रतिम आहे.

ashutosh.treks@gmail.com