25 January 2020

News Flash

वाफ्यातील कंदपिके

वनस्पती कधी लावाव्यात, त्यांचा कालावधी याची माहिती घेऊ या..

शहरशेती  : राजेंद्र भट

आपण केलेल्या वाफ्यात किंवा मोठय़ा कुंडीत जमिनीखालील कंदपिके घेणे हे तेथील माती समृद्ध करण्यासाठी उपयुक्त ठरते. यासाठी रताळी, मुळा, गाजर, बीट, कांदा, बटाटा, सुरण, हळद, आंबेहळद, आरारूट, माइनमुळा, लसूण आणि औषधी वनस्पतींपैकी कोष्टक, सर्पगंधा, शतावरी या वनस्पती आपण लावू शकतो. या वनस्पती कधी लावाव्यात, त्यांचा कालावधी याची माहिती घेऊ या..

मुळा : मुळा साधारण ९ इंच वाढतो. ४०-५० दिवसांत तयार होतो आणि वर्षभर लावता येतो. यात पांढरा लांब, लाल लांब, पांढरा व लाल लांब एकत्र, लाल गोल, असे प्रकार आहेत. मुळ्याचा पाला आणि मुळा दोन्हींचा वापर केला जातो. मुळ्याच्या वरच्या टोकाकडील (पाल्याची) बाजू एक इंच कापून लावावा. त्याला पाला येतो आणि बियासुद्धा येतात. त्या शेंगांच्या स्वरूपात असतात. शेंगांना डिंगऱ्या म्हणतात. त्यांची भाजी करतात. मसाला भरून सुकवूनही ठेवल्या जातात. सुकवलेल्या शेंगा तळून खातात.

गाजर : गाजर वीतभर रुंद आणि फूटभर खोल जागेत वाढू शकते. त्याचे दोन प्रकार आहेत. एक म्हणजे देशी गाजर, जे फक्त हिवाळ्यात होते आणि दुसरे युरोपीय गाजर, जे केशरी रंगाचे असते आणि काही भागांत वर्षभर घेता येते. गाजराला थंड आणि कोरडे हवामान मानवते. महाराष्ट्रात ते बहुदा नसतेच. गाजराचा कालावधी ७० ते ९० दिवस असतो. पाणी जास्त दिल्यास पाल्याची वाढ जास्त होऊन गाजर लहान राहते. पावसाळा संपल्यानंतर गाजराचे बी लावावे. पाला वाढण्यासाठी उष्णता आवश्यक असते, तर कंद पोसण्यासाठी थंडीची गरज असते. त्यामुळे सप्टेंबर-ऑक्टोबरमध्येच गाजराचे बी लावण्यास सुरुवात करावी. दर १५-२० दिवसांनी थोडे थोडे बी लावावे. त्यामुळे सतत गाजरे मिळत राहतात. युरोपीय गाजरे उन्हाळ्यातही येतात.

First Published on September 6, 2019 6:11 am

Web Title: tuber crops akp 94
Next Stories
1 कोकोनट केक
2 ‘अ‍ॅप’मधले शिक्षक
3 घरातलं विज्ञान : निसर्ग आपला गुरू
Just Now!
X