06 April 2020

News Flash

आयुर्उपचार : स्नेहन

अभ्यंग हा दिनचर्येतील एक महत्त्वाचा भाग आहे, असे आयुर्वेदात सांगितले आहे.

वैद्य प्रभाकर शेंडय़े drshendye@gmail.com

आयुर्वेदातील बाह्य़ स्नेहन किंवा अभ्यंग यांना खूप महत्त्व आहे. स्नेह म्हणजे प्रेम किंवा ओलावा. ज्या उपक्रमामध्ये शरीरात आतून व बाहेरून स्निग्धता आणली जाते किंवा ओलावा तयार केला जातो, त्याला स्नेहन असे म्हणतात. स्नेहन हे साधारणपणे दोन प्रकारे केले जाते.

*  बाह्य़ किंवा बाहेरून

*  आभ्यंतर किंवा आतून

अभ्यंग हा दिनचर्येतील एक महत्त्वाचा भाग आहे, असे आयुर्वेदात सांगितले आहे. रोज अभ्यंग केल्यामुळे त्वचा टवटवीत राहते. तारुण्य दीर्घकाळ टिकून राहते. थकवा व वातविकार दूर होतात.

पंचकर्म पूर्वकर्म

शरीरभर पसरलेल्या दोषांना मऊ करून पुन्हा कोष्ठामध्ये आणण्याचे काम स्नेहन व स्वेदन करते. म्हणून साधारणपणे अभ्यंग हा पंचकर्माची पूर्वतयारी म्हणून किंवा एक आयुर्वेदिक उपक्रम म्हणून केला जातो.

रुग्णाला व त्याच्या शारीरिक अवस्थेला योग्य असे तेल किंवा तूप वैद्यकीय सस्ल्याने निवडले जाते. त्या तेलाला/तुपाला गरम करून पूर्ण शरीरात तो स्नेह योग्य रीतीने जिरवले जाते. साधारणपणे ४५ मिनिटे चालणाऱ्या या उपक्रमात बाह्य़ किंवा त्वचेमध्ये असणाऱ्या वाताला शांत केले जाते.

स्नेहन केल्यानंतर स्वेदन किंवा कुठल्या ना कुठल्या प्रकारचा शेक घेणे श्रेयस्कर ठरते. शेकण्यामुळे तिथल्या शिरा मोकळ्या होतात, तिथला रक्तप्रवाह वाढतो व वात कमी होऊन दुखणे कमी व्हायला मदत होते.

पंचकर्ममधील पूर्वकर्म म्हणून जे स्नेहन किंवा अभ्यंग केला जातो, तो वैद्यकीय सल्ल्यानुसार ३-७ दिवसांपर्यंत दिला जाऊ शकतो.

अपवाद- आमवात, कफाचे रोग असणाऱ्यांनी अभ्यंग टाळावा.

फायदे

अभ्यंग हा वाढत्या वयाच्या लक्षणांना दूर ठेवणारा, श्रम कमी करणारा व शरीर तंदुरुस्त करणारा आहे. तसेच उत्तम दृष्टी, शरीराचे उत्तम पोषण, झोप नीट येणे व त्वचा चांगली राहणे हेही अभ्यंगाचे फायदे दिसतात. अभ्यंग करताना मुख्यत: डोके, कान व पाय या ठिकाणी अवश्य करावा. संधीवात, अंगदुखी, जुनाट मलावरोध, झोप न येणे किंवा निद्रानाश, स्नायूंची दुखणी, कंबरदुखी, मणक्यांचे आजार, डोकेदुखी अशा दुखण्यांमध्ये अभ्यंग किंवा तेल लावण्याचा फायदा दिसतो.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 11, 2020 1:40 am

Web Title: types of massage massage therapy health benefits of massage zws 70
Next Stories
1 उपचारपद्धती : सिद्ध
2 पूर्णब्रह्म : सासम
3 वाहनवारी ‘ऑटो एक्स्पो’तील
Just Now!
X