युनानी औषधोपचार पद्धती ही एक पुरातन उपचार पद्धती आहे. युनानी औषधोपचार पद्धती ग्रीसमध्ये उत्पन्न झाली. भारतात पुरातन काळी ग्रीक नागरिकांना यवन असे म्हणत. यवनांनी पुढे आणलेल्या वैद्यकीय पद्धतीला युनानी म्हटले गेले. अरबी लोकांनी ग्रीकांची वैद्यकीय पद्धती जाणून घेतली आणि त्यात भरही घातली. त्यामुळे युनानी उपचार पद्धतीला प्रगत करण्यात मोठा वाटा अरबांचा आहे.

अरब व्यापाऱ्यांसोबत ही पद्धती भारतात आली आणि मोगलांच्या काळात तिचा प्रसार व भरभराट झाली. भारतीय हकिमांनी येथील स्थानिक हवामानास अनुकूल असे फेरफार करून या उपचार पद्धतीला देशी रूप दिले. युनानी उपचार पद्धतीत औषधांचे व्यवस्थापन आणि प्रकृतीच्या आकलनाची विशिष्ट तत्त्वे आहेत. युनानी औषधोपचार पद्धतीनुसार मानवी शरीर सात मूळ घटकतत्त्वांनी बनलेले आहे. आरोग्याच्या देखभालीसाठी ही तत्त्वे महत्त्वाची असतात. अल्- अरकान (मूलद्रव्ये), अल्- मिजाज (प्रवृत्ती), अल्- अखलात (शारीरिक द्रव्ये), अल्- आझा (अवयव), अल्- अखाह (जीवनावश्यक स्फूर्ती), अल्- कवा (शक्ती), अल्- अफआल (शारीरिक क्रिया) ही सात तत्त्वे आहेत. या तत्त्वानुसार औषधोपचार केला जातो.

upsc exam preparation guidance
UPSC ची तयारी : अर्थशास्त्र: आर्थिक एकात्मता
GST Uniform taxation of goods and services
‘जीएसटी’च्या ध्येयपूर्तीसाठी…
iPhone users in 91 countries warned to beware of Pegasus like spyware
‘पेगॅसस’सारख्या स्पायवेअरपासून सावधान! ९१ देशांतील आयफोन वापरकर्त्यांना इशारा
Vasai Virar
शहरबात… वन्यप्राण्यांच्या अधिवासांवर अतिक्रमणाचे परिणाम

युनानी उपचार पद्धतीचा अवलंब करणारे अनेक रुग्ण आहेत. सध्या देशात २६३ नोंदणीकृत युनानी रुग्णालये आहेत. बंगळूरु येथे राष्ट्रीय युनानी चिकित्सा संस्था आहे. युनानी औषधोपचार पद्धतीचा प्रसार या संस्थेमार्फत केला जातो.