News Flash

पेनड्राइव्हची देखभाल

पेनड्राइव्ह शर्ट किंवा पँटच्या खिशात ठेवण्याची अनेकांची सवय असते.

माहितीची देवाणघेवाण करण्यासाठी आणि माहिती साठवण्यासाठी पेनड्राइव्हचा उपयोग केला जातो. मात्र अत्यंत लहान असलेल्या या उपकरणाची योग्य ती देखभाल करावी लागते.

पेनड्राइव्ह शर्ट किंवा पँटच्या खिशात ठेवण्याची अनेकांची सवय असते. कृपया ही सवय मोडा. कारण अनेकदा खिशातील मोबाइल, पैसे किंवा इतर वस्तू काढताना नकळत पेनड्राइव्ह खाली पडू शकतो. त्याशिवाय शरीरातील उष्णतेमुळे आद्र्रता निर्माण होते. त्यामुळे पेनड्राइव्ह नादुरुस्त होऊ शकतो. खिशामध्ये असलेल्या लहान धूलिकणांमुळेही पेनड्राइव्ह खराब होऊ शकतो.

  • पेनड्राइव्ह बॅगमध्ये नेहमी सुरक्षित ठिकाणी ठेवावा. घरामध्येही सुरक्षित आणि स्वच्छ ठिकाणी तो ठेवावा.
  • अनिश्चित काळासाठी संगणक, लॅपटॉप अथवा टीव्हीला पेनड्राइव्ह जोडू नका. खूप वेळ पेनड्राइव्ह इलेक्ट्रॉनिक्स वस्तूला जोडल्यामुळे तो नादुरुस्त होण्याची शक्यता असते.
  • कोणत्याही संगणकाला अथवा लॅपटॉपला पेनड्राइव्ह जोडण्यापूर्वी काळजी घ्या. व्हायरस असलेल्या संगणक वा लॅपटॉपमधून तो पेनड्राइव्हमध्ये येतो. हा पेनड्राइव्ह अन्य संगणकाला जोडल्यास व्हायरस त्यात प्रसारित होतो.
  • पेनड्राइव्हमध्ये व्हायरस असेल तर अँटिव्हायरसच्या साहाय्याने तो काढून टाका किंवा पेनड्राइव्ह फॉरमॅट करा.
  • पेनड्राइव्ह पाण्यात भिजवू नका. भिजलेला पेनड्राइव्ह इलेक्ट्रॉनिक्स वस्तूला जोडू नका. त्यामुळे पेनड्राइव्ह खराब होऊ शकतो.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 28, 2018 12:42 am

Web Title: usb flash drive
Next Stories
1 आयुष्यातील प्रत्येक क्षणात एक विनोद शोधा
2 ‘नेट’शी नाते जडले..
3 पावसाळ्यात वाहन घसरते  म्हणजे काय?
Just Now!
X