04 July 2020

News Flash

योगस्नेह : उष्ट्रासन

या आसनस्थितीत शरीराची अवस्था उंटाच्या आकाराची होते, म्हणून त्याला उष्ट्रासन असे म्हणतात.

या आसनस्थितीत शरीराची अवस्था उंटाच्या आकाराची होते, म्हणून त्याला उष्ट्रासन असे म्हणतात. हे आसन केल्यास शरीरात स्फूर्ती निर्माण होते. पोट, पाय, खांदे, पाठीचा कणा यांना ताण बसून त्यांचा चांगला व्यायाम होतो. या आसनामुळे पोटासंबंधी आजार बद्धकोष्ठ, अपचन दूर होण्यास मदत होते.

कृती :

* सुरुवातीला वज्रासनात बसा. त्यानंतर गुडघ्यांवर उभे राहा. साहजिकच पाय मागे राहतील.

*  आता दोन्ही हात समोर न्या. त्यानंतर हात कानावरून मागे घ्या. त्यानंतर शरीराचा पुढील भाग हळूहळू मागे झुकवण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर हातही पूर्णपणे मागे न्या.

*  आता हातांनी टाच पकडण्याचा प्रयत्न करा. मानही मागे वळवा आणि डोकेही मागे न्या. तुमचे शरीर आता मागच्या बाजूला झुकलेले असेल.

*   या आसनातून बाहेर येताना दोन्ही हात एकाच वेळी पुन्हा पुढे येतील आणि त्यानंतर वज्रासनातून बाहेर या.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 21, 2019 3:29 am

Web Title: ustrasana back ending asana in modern yoga
Next Stories
1 ‘हॅलो एमजी’
2 व्हिंटेज वॉर : गोष्ट होंडाची
3 मस्तमॉकटेल : लेमन ग्रास जस्मीन आइस टी
Just Now!
X