22 April 2019

News Flash

उत्कटासन

पायाच्या स्नायूंच्या मजबुतीसाठी हे आसन उपयुक्त आहे.

पायाच्या स्नायूंच्या मजबुतीसाठी हे आसन उपयुक्त आहे. या आसनाला कुर्सी आसन असेही म्हणतात. खुर्चीवर बसताना या स्थितीत असतो, त्या स्थितीत हे आसन केले जाते, पण येथे काल्पनिक खुर्ची असते. पाठीचा कणा, कंबर आणि पोटाचे स्नायू या आसनामुळे मजबूत होतात. शरीरही समतोल बनण्यास या आसनाने मदत होते.

कसे करावे?

  • पायात थोडे अंतर ठेवून ताठ उभे राहा.
  • हात खांद्यांच्या सरळ रेषेत शरीराच्या पुढील बाजूस घ्या. तळहात जमिनीच्या दिशेला असतील. हात कोपरात वाकवू नका.
  • आता गुडघे पायात वाकवून कंबर आणि पोटाचा भाग थोडा खाली आणा. आपण खुर्चीत बसत आहोत, अशी कल्पना करून त्या स्थितीत कंबर व पोट खाली घ्या.
  • हात जमिनीला मात्र समांतर असावे. पाठ मात्र न वाकवता ताठ ठेवावी.
  • श्वसन चालू ठेवावे. कंबर अधिकाधिक खाली घेण्याचा प्रयत्न करा.
  • आता वर येऊन आस सोडावे.

First Published on February 12, 2019 2:45 am

Web Title: utkatasana yoga pose