डॉ. मानसी पाटील

साहित्य

१ मोठा चमचा शेंगदाणा तेल, १ मोठा चमचा बारीक कापलेले आले, १ लवंग, लसूण, १ चिमटी मेथीचे दाणे, १ कप कोरडे लेन्टिल (मसूर), १ कप स्क्व्ॉश केलेले बटरनट क्यूब्स, एकतृतीयांश कप बारीक चिरलेली कोथिंबीर, २ कप पाणी, अर्धा कप नारळ दूध, २ मोठे चमचे टोमॅटो पेस्ट, १ चिमूट लाल मिरची, १ चिमूट जायफळ पूड, चवीनुसार मीठ आणि मिरपूड

कृती

मध्यम गॅसवर मोठय़ा भांडय़ात तेल तापवून त्यात कांदा, आले, लसूण आणि मेथी शिजवा. त्यानंतर त्यात मसूर, स्क्व्ॉश केलेले बटरनट आणि कोथिंबीर टाका. त्यात पाणी, नारळाचे दूध आणि टोमॅटो पेस्ट टाका व नीट ढवळून घ्या. त्यानंतर कडीपत्ता, लाल मिरची, जायफळ, चवीनुसार मीठ आणि मिरपूड टाका व ढवळून घ्या. हे मिश्रण ३० मिनिटे उकळू द्या. गरम गरम सूप सव्‍‌र्ह करा.