राजेंद्र भट

गच्चीवर लावायच्या वेलभाज्यांची ओळख आपण करून घेत आहोत. वेलीला येणारे प्रत्येक नवे पान काही काळापर्यंत मोठे-मोठे येत राहाणे आवश्यक आहे. या पानांच्या बगलांमधून नवीन फांदीफूट येत असते. शेंडा वाढत असताना बगलफूट तुलनेने कमी येते. शेंडा जेव्हा अधांतरी राहतो, तेव्हा त्याची वाढ खुंटते आणि बगलफुटी वाढू लागतात.  वेलीच्या नवीन कोवळ्या कोंबांवर आणि फांद्यांवर कीड येते आणि जुन्या पानांवर रोग येतात. वेलीची जुनी पाने काढून टाकावीत. कोवळ्या पानांवर आणि कोंबांवर योग्य औषधे कीड नियंत्रणासाठी फवारावीत. रस शोषणारी कीड विषाणूंचा प्रसार करते. वेलींवर येणारे प्रमुख रोग जाणून घेऊ.

nagpur, polling station,
मतदान केंद्रावरील कर्मचारीच म्हणतो, बोटाला शाई कशाला हवी?
Unseasonal rain is expected in the state for the next week
राज्यावर आठवडाभर अवकाळीचे ढग.. कुठे गारपीट, कुठे पाऊस?
धूळ नियंत्रण वाहनांमुळे नागरिकांबरोबरच झाडांचाही मोकळा श्वास
Use Apps to Manage Electricity Use and Reduce Bills During Summer Heatwaves
भरमसाठ वीज देयक येते का? ‘हे’ करा मग येईल वीज वापराचा अंदाज…

हळद्या  : यात पानांच्या शिरा सोडून उर्वरित भाग पिवळा पडत जातो आणि वेलीची प्रकाश संश्लेषण क्रिया कमकुवत होत जाते. वाढ थांबते. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी रस शोषणाऱ्या किडीचे नियंत्रण करावे. रोगप्रतिबंधक जातीचे बीज वापरावे. बुरशीनाशकाची फवारणी करावी. एम-४५ हे बुरशीनाशक प्रभावी आहे. १० लिटर पाण्यात २५ ग्रॅम पावडर मिसळून फवारावी. स्टिकर आणि स्पेडर मिसळल्यास जास्त फायदा होईल.