आत्माराम परब

* उन्हाळ्यात समुद्राच्या निळ्याशार लाटा आणि किनाऱ्यावरचं माडांचं बन सर्वानाच आकर्षित करतं. महाराष्ट्रात डहाणू-पालघरपासून ते तारकर्ली-देवबागपर्यंतचे अनेक किनारे पर्यटकांना खुणावतात.

* अशा ठिकाणी गेल्यावर भरती ओहोटीचं वेळापत्रक स्थानिकांना विचारून घ्या. शक्यतो ओहोटीच्या वेळी समुद्रात उतरू नका. गणपतीपुळे, हरिहरेश्वरचा प्रदक्षिणा मार्ग अशा ठिकाणी उत्साहाला आवर घाला. मद्यपान करून पाण्यात उतरू नका.

* बीचवर जाताना टॉवेल, बदलायचे कपडे आठवणीने घ्या आणि हे सगळे ठेवायला कापडी पिशवी किंवा झोळी अवश्य घ्या, म्हणजे कपडय़ांना वाळू लागणार नाही. मौल्यवान वस्तू ओल्या होऊ  नयेत म्हणून त्या ठेवण्यासाठी झिप लॉक पिशवी जवळ ठेवा.

* डिस्क, रबरी चेंडू, रिंग असं साहित्य अवश्य घ्या. मित्र-मैत्रिणी आणि कुटुंबीयांबरोबर खेळायला मजा येईल.

* आपल्याकडून किनाऱ्यावर कचरा होणार नाही याची खबरदारी घ्या. फोटो काढताना सुरक्षिततेला प्राधान्य द्या.

* राज्यातील अनेक किनाऱ्यांवर स्नॉर्केलिंग, स्कूबा डायव्हिंग पासून पॅरासेलिंग पर्यंत विविध खेळ उपलब्ध झाले आहेत. मात्र, त्यांचा आनंद लुटताना सुरक्षिततेकडे दुर्लक्ष करू नका. त्यासाठीची सर्व सुरक्षा साधने अवश्य वापरा.

* किनाऱ्यावर उन्हाच्या तीव्र झळा लागतात. त्यामुळे बाहेर पडण्यापूर्वी चेहरा, मान, हातांवर सनस्क्रिन लोशन न विसरता लावा. टोपी, गॉगल, स्कार्फ, पाण्याची बाटली सतत सोबत ठेवा.