News Flash

अभिमानाचे रंग लेवुनिया..

राष्ट्रीय सणाच्या दिवशी देशप्रेमाचे प्रतीक असलेली खादी तुम्हाला रिच लुक देते.

केवळ राष्ट्रीय सणांदिवशीच आवर्जून घातला जाणारा पांढरा रंग त्यासोबत तिरंग्यातील तीनही रंगांचं कॉम्बिनेशन हे आजच्या तरुणाईलाही तितकचं भावतं. पण काळाची पावलं ओळखत तरुणाई त्यात आपल्या पद्धतीने बदल करते. त्यातून या कपडय़ांचा ट्रेण्ड तयार होतो. यंदाच्या प्रजासत्ताकदिनी पांढरा रंग मिरवताना त्यासोबत काय हटके करता येईल हे आमच्या प्रतिनिधी शलाका सरफरे आणि मीनल गांगुर्डे यांच्या शब्दांत..

राऊंड नेक टीशर्टवरील देशप्रेम

नेहमीच काही तरी वेगळं करण्याकडे तरुणांचा कल असतो. मग पांढऱ्या रंगातले तेच कुर्ते, सलवार-कमीज आणि साडीला डच्चू देत यंदाही बाजारात अनेक नवीन गोष्टी आल्या आहेत. त्यांपैकी एक म्हणजे प्रिंटेड राऊंड नेक टी-शर्ट. या टी-शर्टवर तिरंग्यासोबतच ‘आय लव्ह इंडिया’ अशा प्रकारचे संदेश, स्वातंत्र्यसेनानींची, भारतातील पर्यटन स्थळांची छायाचित्रे पाहायला मिळतात.

खादी कुर्त्यांचा ट्रेण्ड

राष्ट्रीय सणाच्या दिवशी देशप्रेमाचे प्रतीक असलेली खादी तुम्हाला रिच लुक देते. खादीच्या कुर्त्यांमध्ये सध्या अनेक पर्याय उपलब्ध आहेत ते तुम्ही ट्राय करू शकता.

राष्ट्रीय सणाचा परिपूर्ण लूक

फॅशन डिझायनरच्या मते मुलींनी नेहमीचा पटियाला व कुर्तीऐवजी एखादा व्हाइट शर्ट, त्यावर ग्रीन ट्राऊझर, त्याला साजेशी अशी ऑरेंज बॅग कॅरी केल्यास राष्ट्रीय सणाचा एक परिपूर्ण लुक मिळू शकतो. तसेच हिरव्या रंगाच्या लांब स्कर्टवर मऊ सुती कापडापासून तयार केलेले व्हाइट ब्लाऊज किंवा क्रॉ टॉप, त्यावर भगव्या रंगाचा स्कार्फ असा नवा लुक तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता. तसेच मुलांसाठी कुर्त्यांसोबत जॅकेटचे पर्यायही बाजारात उपलब्ध आहेत. त्यातील रंगाच्या बाबतील काही वेगळे प्रयोग करता येऊ शकतात. पांढऱ्या कुर्त्यांऐवजी हिरवा आणि भगव्या रंगाचा कुर्ता आणि पांढऱ्या रंगाचं जॅकेट हा उत्तम पर्याय ठरू शकतो.

कार्यक्रमानुसार पेहराव

या दिवशी अनेक कार्यक्रम असतात, मग त्या कार्यक्रमानुसार तुमचा पेहरावही बदलला पाहिजे. सकाळी झेंडावंदनाच्या कार्यक्रमाला तुम्ही कुर्ती, त्यावर लेगिंग्जऐवजी धोती, जेगिंग्ज आणि पटियाला, सलवार याचंही कॉम्बिनेशन करू शकता. पांढऱ्या रंगाचा शॉर्ट कुर्ता त्यावर भगव्या किंवा हिरव्या रंगाचा पटियाला, साजेशी शिफॉन व कॉटनची ओढणी हा लुक नक्कीच क्लासी आहे. पूर्ण लांब कुर्त्यांचा ट्रेण्ड आता इन आहे. त्याचा उपयोग तुम्ही संध्याकाळच्या सांस्कृतिक कार्यक्रमाला उठावदार पेहरावासाठी करू शकता. पांढऱ्या रंगाची पूर्ण लांब कुर्ती त्यावर पांढऱ्याच रंगाचा लेगिंग्ज आणि ओढणी मात्र हिरव्या किंवा भगव्या रंगातील लखलखत्या मिररवर्कची, बांधणी प्रकारातली किंवा डिझायनरच हवी. त्यावर लटकन व पारंपरिक पण हटके प्रिंट असल्यास हा लुक हिट आहे. सलवार किंवा कुर्ती प्लेन असेल तर ओढणी ही भरगच्चच हवी.

फ्युजन

व्हाइट टीशर्ट, शर्ट किंवा टॉप आणि त्याच्या बरोबरीने उरलेल्या तीन रंगातील बॉटम असं कॉम्बो तुम्ही ट्राय करू शकता. त्याबरोबर एखादा कूल स्कार्फ घेतलात तर खूप चांगला लुक मिळेल. खरं तर पांढऱ्या रंगातील बॉटम्सही वापरता येतील. त्यामध्ये ट्रेंडी पलाझो, स्कर्ट्स, शॉर्ट्स असंही तुम्ही वापरू शकता. या शिवाय एखाद्या प्लेन पांढऱ्या पेहरावावर हिरव्या, निळ्या आणि भगव्या रंगांतील आकर्षक नक्षीकाम केलेले जॅकेट खूप सुंदर दिसतील. हे जॅकेट्स वनपीसवरपण तुम्ही घालू शकता.

जुन्या कपडय़ांना नवा लूक

* तुमच्या कपाटात असलेल्या जुन्या पांढऱ्या रंगाच्या कपडय़ांचा तुम्ही याही वर्षी खुबीने वापर करू शकता. त्याला ट्रेण्डी लुक देऊ शकता. त्यासाठी फॅशन डिझायनर लीना टिपणीस यांनी काही टिप्स दिल्या आहेत..

* पांढऱ्या रंगाची जुनी कॉटन कुर्ती वापरून जरा नवा लुक मिळवायचा असेल तर शिफॉनची फ्लोरल प्रिंट असलेली ओढणी तुम्ही वापरू शकता. शिफॉन हा मुळात कापडाचा चमकणारा प्रकार आहे. त्यामुळे तुम्ही शिफॉनची तिरंगी रंगातील कोणत्याही रंगाची ओढणी जुन्या कुर्त्यांच्या फिकट छटेला झाकू शकते. यात तुम्ही ओढणी कशा प्रकारे कॅरी करता ती पद्धतही महत्त्वाची आहे.

* तुम्ही जुना पांढऱ्या रंगाचा शर्ट वापरत असाल, तर त्यावर निळ्या रंगाची जीन्स वापरावी. तो पूर्ण इन करावा त्यावर चॉकलेटी अथवा तत्सम रंगाचा पट्टा वापरू शकता.

* तुम्ही पांढऱ्या रंगाचा जुना वनपीस वापरत असाल तर त्यावर स्टिलहाऊट जॅकेट तुम्हाला हटके लुक देईल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 24, 2018 5:37 am

Web Title: wearing republic day fashion inspired by the colours
Next Stories
1 मस्त मॉकटेल : ऑरेंज ट्वायलाइट
2 ‘पद्मिनी’
3 स्ट्रॉबेरी, पनीर अ‍ॅण्ड अक्रोड सॅलड
Just Now!
X