बाजारात नवीन काय? – ५९,९९० रुपयांमध्ये उपलब्ध

ओकिनावा स्कूटर्सने नुकतीच आपली विजेवर चालणारी स्कूटर ‘लाइट’ची घोषणा केली. या स्कूटरची एक्स शोरूम किंमत ५९,९९० रुपये आहे. तरुण वर्ग व स्त्रिया यांना डोळ्यापुढे ठेवून ही स्कूटर तयार करण्यात आली असल्याचा दावा कंपनीने केला आहे.

नवीन लाइट स्पार्कल व्हाइट आणि स्पार्कल ब्ल्यू या दोन अप्रतिम रंगांमध्ये उपलब्ध आहे. डिटॅचेबल लिथिअम आयन बॅटरीने युक्त अशी ही स्कूटर वापरण्यास सोपी व कमी खर्चिक असल्याचे कपंनीचे म्हणणे आहे. इतरांपेक्षा वेगळे वैशिष्टय़ म्हणजे ‘अँटि थेफ्ट बॅटरी लॉक’. यामध्ये लि आयन बॅटरी आतमधून लॉक होऊन जाते व चोरी किंवा नुकसानीपासून स्कूटरचे संरक्षण होते.

यात हझार्ड फंक्शन, इनबिल्ट पिलियन रायडर, फूटरायडर आणि एलईडी स्पीडोमीटर या सुविधा आहेत. स्कूटर एलईडी हेडलाइट, एलईडी विंकर्स आणि शैलीदार एलईडी टेल लाइट्स, स्वयंचलित इलेक्ट्रॉनिक हॅण्डल, सेल्फ स्टार्ट पुश बटन आणि आयताकृती टाइप फ्रण्ट सस्पेन्शन दमदार स्टील फ्रे मच्या बॉडीसह देण्यात आले आहे.