• मला नवीन गाडी घ्यायची आहे. बजेट १५ ते २० लाख या दरम्यान आहे. मी कोणती एसयूव्ही घेऊ? कृपया पर्याय सांगा. – राहुल महाडिक

तुम्ही जीप कंपास घ्यावी. ही अतिशय देखणी आणि भक्कम आहे. या गाडीमध्ये बसल्यानंतर अतिशय आलिशान वाटते.

  • टाटा टियागो पेट्रोल व्हर्जन चांगली की मारुती स्विफ्ट? – निशांत महाजन

टाटा टियागो ही कमी बजेटमधील उत्तम अशी कार आहे. तरी बजेट जास्त असेल तर अर्थातच स्विफ्ट उत्तम ठरते. स्विफ्टचे मायलेज उत्तम आहे. मेन्टेनन्स आणि पुनर्विक्री करतानाही तिला चांगली किंमत मिळते.

  • मी डोंबिवलीला राहतो. मला मारुती सेलेरियो किंवा वॅगन आरबाबत मार्गदर्शन करावे. माझे रनिंग जास्त नाही. महिन्यातून दोनदा किंवा तीनदा मी बाहेर जातो. तरी मला कमी मेंटेनन्स आणि जास्त खर्च नसणारी कार हवी आहे. तरी वरीलपैकी कोणती कार घ्यावी, याबाबत मार्गदर्शन करावे. – हर्षद एकबोटे

तुम्ही सेलेरियो घ्यावी. यामध्ये मागील आसनांवर ३ जण अतिशय आरामात बसतात. गाडी वजनाला हलकी असल्याने मायलेजही उत्तम आहे आणि मेंटेनन्सही कमी आहे.

 

समीर ओक

ls.driveit@gmail.com