08 March 2021

News Flash

अर्धचंद्रासन

अर्धचंद्रासन या नावामध्येच या आसनाची क्रिया दर्शवण्यात आली आहे

अर्धचंद्रासन या नावामध्येच या आसनाची क्रिया दर्शवण्यात आली आहे. हे आसन करताना आपल्या शरीराची स्थिती अर्धचंद्रासारखी होते. म्हणूनच या आसनाला अर्धचंद्रासन असे म्हणतात. हे आसन नियमित केल्याने गुडघे, पोट, छाती आणि मान यांचे विकार दूर होतात. पोटावरील चरबी कमी करण्यास हे उपयुक्त आहे.

कसे करावे?

  •  आसनस्थ होण्यासाठी आधी दोन्ही पायांची पंजे व बोटे व्यवस्थित करून ताठ उभे राहावे. दोन्ही हात कमरेला चिटकवून सरळ ठेवून     मान सरळ ठेवावी.
  •  दोन्ही पाय साधारण एक ते दीड फूट एकमेकांपासून दूर ठेवावेत. पाठीचा कणा सरळ ठेवावा.
  •  उजवा हात वर उचलून खांद्याच्या समांतर रेषेत आणून हाताच्या पंज्याला आकाशाच्या बाजूने वर उचलून कानाला चिटकवून सरळ करावा. या स्थितीत मात्र डावा हात जमिनीच्याच बाजूने पूर्वीच्या आहे त्याच स्थितीत ठेवावा.
  •  त्यानंतर आहे त्या स्थितीत कमरेवरून डाव्या बाजूने झुकावे. अशा वेळी आपला डावा हातही आपोआप खालच्या बाजूला सरकत जाईल. मात्र एक लक्षात घ्या की, डावा हात व पाय एकमेकांपासून दूर होता कामा नये.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 12, 2019 1:55 am

Web Title: yoga asana 94
Next Stories
1 गुडघेदुखी
2 वाढत्या वजनावरील उपाय
3 दिवाळीत वाहन उद्योग सावरला..पण आव्हान कायम
Just Now!
X