12 December 2019

News Flash

योगस्नेह : पश्चिमोत्तानासन

या आसनामुळे पोट व पाठीचे स्नायू बळकट होतात. पचनसंस्था कार्यक्षम होते.

पश्चिमोत्तानासन

पश्चिम या शब्दाचा एक अर्थ आहे पाठीमागची बाजू. या आसनात मानेपासून पायांच्या घोटय़ापर्यंत शरीराच्या पाठीमागच्या भागास ताण मिळतो. त्यामुळे या आसनाला पश्चिमोत्तानासन असे म्हणतात. या आसनामुळे पोट व पाठीचे स्नायू बळकट होतात. पचनसंस्था कार्यक्षम होते.

कसे करावे?

’ दोन्ही पाय समोर सरळ करून बसावे. पायांचे अंगठे व टाचा जुळवून घ्याव्या. हात कंबरेच्या दोन्ही बाजूस ठेवावे. मान सरळ व नजर समोर असावी.

’ थोडे समोर वाकून हनुवटी जमिनीला समांतर ठेवून कंबरेतून वाकून डाव्या हाताने डाव्या पायाचा अंगठा पकडावा आणि उजव्या हाताने उजव्या पायाचा अंगठा पकडावा.

’ श्वास सोडत आणखी पुढे वाकून कपाळ गुडघ्याला टेकवण्याचा प्रयत्न करा. मात्र हे करताना कपाळ जबरदस्तीने गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न करू नये किंवा गुडघे वर उचलून कपाळाला लावण्याचा प्रयत्न करू नये.

’ हाताचे कोपर जमिनीला टेकवण्याचा प्रयत्न करावा. संथ श्वास चालू ठेवावा.

’ थोडा वेळ या स्थितीत राहा. हळूहळू हाताची पकड सोडून पूर्वस्थितीत या.

First Published on March 19, 2019 4:42 am

Web Title: yoga in daily life paschimottanasana
Just Now!
X