25 January 2020

News Flash

शीर्षांसन

शीर्षांसन हे अत्यंत महत्त्वाचे आसन आहे

शीर्षांसन हे अत्यंत महत्त्वाचे आसन आहे. मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी हे सर्वोत्तम आसन आहे. या आसनामुळे मेंदूपर्यंत अधिक रक्तपुरवठा होतो. मानसिक तणाव दूर करण्यासाठी हे आसन उपयुक्त आहे. अनेक शारीरिक व्याधीही हे आसन नियमित केल्याने होत नाहीत. हे आसन सुरुवातीला करताना अवघड वाटेल. त्यामुळे योगशिक्षकाच्या मार्गदर्शनाखालीच ते करावे. सुरुवातीला हे आसन भिंतीचा आधार घेऊन करावे.

कृती :

  • प्रथम डोक्याखाली ठेवण्यासाठी एखादे कापड गुंडाळून त्याची गादी करावी.
  • दोन्ही हातांची बोटे एकमेकांत गुंतवा आणि कोपऱ्यापर्यंत हात जमिनीवर टेकवा. एकमेकांत अडकवलेली बोटे मधोमध ठेवा.
  • डोक्याचा वरचा भाग गादीवर व गुडघे जमिनीवर टेकलेले असावेत.
  • शरीराचा भार मानेवर तसेच हाताच्या कोपरांवर संतुलित करावा.
  • एक गुडघा दुमडत हळूहळू वर उचलावा, त्याचबरोबर दुसरा गुडघा दुमडून हळूहळू वर उचलावा.
  • आता पाय समांतर रेषेत येतील, असे ठेवावे. या अवस्थेत असताना श्वासाची गती सामान्य असू द्या.
  • पूर्वावस्थेत येण्यासाठी हळूहळू पाय खाली घ्यावेत. त्यानंतर शवासन करा किंवा उभे राहा.

First Published on September 10, 2019 2:39 am

Web Title: yoga shirshasana akp 94
Next Stories
1 भांडय़ांचा  हव्यास!
2 सदनिकेचा आकार आणि देखभाल शुल्क
3 नक्कल‘कार’
Just Now!
X