scorecardresearch

सुंदर माझं घर : बिया, टरफलांची शुभेच्छापत्रे

सध्या सणवार सुरू असल्यामुळे प्रसादासाठी पंचखाद्य लागतेच. त्याच्या बियांचा पुनर्वापर कसा करता येईल ते आज पाहू या.

(संग्रहित छायाचित्र)
अर्चना जोशी

सध्या सणवार सुरू असल्यामुळे प्रसादासाठी पंचखाद्य लागतेच. त्याच्या बियांचा पुनर्वापर कसा करता येईल ते आज पाहू या. या बियांपासून शुभेच्छापत्र तयार करू या.

साहित्य :

पिस्त्याची साले, खजूर किंवा खारीकेच्या बिया, अ‍ॅक्रेलिक रंग, ब्रश व रंगकामाचे साहित्य, रंगीत कागद, सुतळ, हिरवी क्रेप टेप, गम (फेव्हिबँड), झिगझॅग व साधी कात्री, जाड हँड्मेड कागद (जुन्या पत्रिका किवा पिशव्यांचा जाड कागद) इत्यादी.

कृती

*      पिस्त्याची टरफले एका आकाराची मापात बघून घ्या. त्याच्या ३-४ मोठय़ा टरफलांचे एक फूल तयार करा.

*      अ‍ॅक्रेलिक रंगाने साल रंगवा व नीट वाळू द्या.

*      इतर बियांची आकर्षक पद्धतीने रचना करा व अ‍ॅक्रेलिक रंगाने रंगवा.

*      सर्व फुले एकत्र करून गुच्छ तयार करा व हँड्मेड कागदावर (जुन्या पत्रिका किंवा पिशव्यांचा जाड कागदही वापरता येईल) गमने चिकटवा.

*      उरलेल्या भागात गवताच्या काडय़ा दाखवण्यासाठी हिरवी क्रेप टेप, सुतळ चिकटवा.

*      रंगीत कागदाची पाने झिगझ्ॉग कात्री किंवा साध्या कात्रीने कापा आणि चिकटवा.

*      एखाद्याचे आभार व्यक्त करणारे पत्र किंवा शुभेच्छापत्र म्हणून ही कलाकृती वापरता येईल. लिफाफा सुशोभित करण्यासाठीही हीच पद्धत वापरता येईल.

मराठीतील सर्व कुटुंबकट्टा ( Kutumbkatta ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Article about seeds placards

ताज्या बातम्या