scorecardresearch

सौंदर्यभान : लायपोसक्शन

प्रक्रियेआधी कोणती काळजी घेणे आवश्यक आहे? सर्वप्रथम तुमच्या त्वचारोगतज्ज्ञ व शल्यचिकित्सक यांचा सल्ला घेणे आवश्यक आहे

डॉ. शुभांगी महाजन

अंगावरील चरबी वाढलीय? व्यायाम आणि आहारावरील नियंत्रणही उपयोगी ठरत नाही? मग जाणून घ्या लायपोसक्शन या उपचार पद्धतीविषयी.

लायपोसक्शन ही अशी सौंदर्यवर्धक प्रक्रिया आहे, जी तुमच्या शरीरातील अशा प्रकारची चरबी कमी करण्यास मदत करते, जी व्यायाम आणि आहारावर नियंत्रण ठेवूनही कमी होत नाही. उदाहरणार्थ पोटावरील, मांडीवरील, पाठीवरील, नितंबावरील, चेहरा आणि हनुवटीवरील जास्तीची चरबी.

तुम्ही लायपोसक्शनसाठी सुयोग्य उमेदवार आहात का? कोणतीही प्रक्रिया करण्याआधी तुमच्या अपेक्षा या वास्तववादी असाव्यात. लायपोसक्शन ही एक प्रकारची शस्त्रक्रिया असून त्यात काही अपवादात्मक धोके उद्भवू शकतात. म्हणून कोणतीही शस्त्रक्रिया करण्यापूर्वी तुम्ही शारीरिकदृष्टय़ा तंदुरुस्त असणे आवश्यक आहे. यात वजनावर नियंत्रण, त्वचा निरोगी व घट्ट असणे तसेच रक्तदाब व रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात असणे आणि धूम्रपान टाळणे या गोष्टींचा समावेश होतो. वरीप्रमाणे तुमचे आरोग्य सुस्थितीत नसल्यास डॉक्टर शस्त्रक्रियेची शिफारस करत नाहीत.

प्रक्रियेआधी कोणती काळजी घेणे आवश्यक आहे? सर्वप्रथम तुमच्या त्वचारोगतज्ज्ञ व शल्यचिकित्सक यांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. प्रक्रियेबद्दल संपूर्ण माहिती, तुमच्या अपेक्षा, उद्दिष्टे, उपलब्ध असलेले पर्याय, संभाव्य धोके आणि येणारा खर्च याबद्दल तुमच्या डॉक्टरांशी सविस्तर चर्चा करूनच योग्य निर्णय घ्यावा.

जर तुम्ही शस्त्रक्रियेसाठी तयार असाल तर तुम्हाला तुमचे डॉक्टर त्याबद्दल आवश्यक त्या सूचना देतील त्यांचे योग्य पालन करा. यात आहारातील काही पदार्थ, अल्कोहोल आणि धूम्रपानप्रतिबंध यांचा समावेश असू शकतो. तुमचा सध्याचा आहार, तुम्हाला असलेल्या अ‍ॅलर्जीबद्दल व घेत असलेल्या औषधांबद्दल तुमच्या डॉक्टरांशी चर्चा करा.

शस्त्रक्रियेला सुरुवात करण्याआधी विशिष्ट प्रकारच्या मार्करने लायपोसक्शन करावयाचे आहे, तो भाग खुनाकृत केला जातो. या प्रक्रियेसाठी भूल देणे आवश्यक असून गरजेनुसार भूलतज्ज्ञ स्थानिक किंवा पूर्ण भूल देतात.

पुर्नप्राप्ती किती काळ आहे?

* आपण केलेल्या शस्त्रक्रियेच्या प्रकारानुसार आपल्याला कदाचित रुग्णालयात राहावे लागू नये.  परंतु जर शस्त्रक्रिया मोठी असेल म्हणजे जर जास्त प्रमाणात चरबी काढली असेल तर तुम्हाला रुग्णालयात किमान एक दिवस थांबावे लागेल. आपण कमीतकमी काही आठवडय़ांसाठी जखम होणे, सूज येणे आणि खवल्याची अपेक्षा करावी.

* सूज नियंत्रित करण्यासाठी शस्त्रक्रिया १ ते २ महिन्यांपर्यंत कॉम्प्रेशन देणारे वस्त्र परिधान करावे लागेल.

* आपल्याला कदाचित संसर्ग रोखण्यासाठी काही प्रतिजैविक औषधेदेखील घ्यावी लागतील.

मराठीतील सर्व कुटुंबकट्टा ( Kutumbkatta ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Article on liposuction treatment abn

ताज्या बातम्या