गायत्री हसबनीस

दर सिझनला आणि सिझनच्या दरम्यान नवनवीन सनग्लासेस आणि त्यांचे प्रकार हे येतच असतात. रंग आणि स्टाइल या बाबतीत नाना तऱ्हेचे गॉगल्स सनग्लासेस बाजारात उपलब्ध होत आहेत. आजकाल सतत वेगवेगळे आऊटफिट्स कॉलेज आणि नोकरी करणाऱ्यांकडून तरुणाईकडून अवलंबवले जातात.

सध्याच्या वेगवान काळात गॅजेट्सपेक्षा सर्वाना जास्त आकर्षित करतात ते सनग्लासेस. आता पाहिलं तर सनग्लासेस कुठल्याही ऑकेजनला घालण्यावर सर्वाचा भर असतो. आता तसे कुठलेच बंधन उरलेले नाही. त्यामुळे दर सिझनला आणि सिझनच्या दरम्यान नवनवीन सनग्लासेस आणि त्यांचे प्रकार हे येतच असतात. रंग आणि स्टाइल या बाबतीत नाना तऱ्हेचे गॉगल्स सनग्लासेस बाजारात उपलब्ध होत आहेत. आजकाल सतत वेगवेगळे आऊटफिट्स कॉलेज आणि नोकरी करणाऱ्यांकडून तरुणाईकडून अवलंबवले जातात. ट्रेडिशनल, वेस्टर्न, स्पोर्टी लूक असे नानाविध स्टाइल्स आणि तसे आऊटफिट्सचा जमाना असल्याने सनग्लासेस हे अत्यंत आवश्यक ठरले आहेत.

सनग्लासेसमध्ये ग्लासेस आणि रिम्समध्ये खूप वैविध्य आहे. एकतर सनग्लासेसमध्ये विविध रंगांचे ग्लासेस आहेत. मुलांना जास्त करून निओन रंगांचे सनग्लासेस आवडतात आणि मुलींना जास्तकरून काळ्या रंगाचे ग्लासेस अधिक आवडतात. त्यामुळे ऑनलाइन असो वा ऑफलाइन, मुलं-मुली सनग्लासेसमध्ये नेहमीच स्वत:च्या रंगांच्या आवडीनिवडीप्रमाणेच खरेदी करतात. त्यामुळे आकाराचा वा स्टाईल्सचा अधिक प्रश्न सनग्लासेसच्या बाबतीत उद्भवत नाही. कुणालाही नवीन स्टाईल्स जर सनग्लासेसमध्ये आल्या की लगेचच त्यांची शॉपिंग ही होतेच.

सध्या सनग्लासेसमध्ये पॅटर्न्‍स वेगवेगळ्या प्रकारचे पाहायला मिळतील. कारण रिम आणि ग्लासेसच्या आकारात खूप व्हरायटी दिसेल. हॅक्झागोनल, पॅन्टागॉनल आणि स्केवरच्या आकाराचे सनग्लासेस हे सध्या टॉप लिस्टवर दिसतील. त्याचसोबत मुलांकरिता खास ग्रेडियंट पद्धतीचे सनग्लासेस आले आहेत. खासकरून मुलांना ब्रॅण्डेड सनग्लासेस जास्त भावतात. कारण त्यात एविएटर्स, वेफेर्स आणि पोलराइज्ड सनग्लासेस असतात. मुलींकरिता सुद्धा ग्रेडियंटमध्ये सनग्लासेस आहेत ज्यात येल्लो आणि पर्पल असे रंग आहेत.

एका चांगला आणि नवा ट्रेण्ड आहे तो म्हणजे स्किन कलरच्या ग्लासेसचा आणि त्यासोबत सिल्वर रिमचा. खरंतर समर सिझनला आता हळूहळू जवळ येऊ लागल्याने बऱ्यापैकी पांढरे कपडे वा थोडे क्रीम, ऑफ व्हाईट रंगाचे कपडे परिधान करणं सुरू झालं आहे. त्यामुळे या स्टाईलचा गॉगल नक्कीच योग्य ठरेल. खरं तर या स्किन कलरची शेड ही ब्राऊन/चॉकलेटी रंगाच्या शेडमध्ये येते. त्यामुळे या स्टाईलचे सनग्लासेस हे जास्त करून ब्राऊन शेड्समध्येदेखील आहेत.

अजूनही बऱ्याच मुलींना कॅट आय सनग्लासेस खूप आवडतात. त्यामुळे त्याचा ट्रेण्डही सध्या तरी पाहायला मिळेल. तसेच कॅट आयच्या डिझाईन्समध्ये पॉलका डॉट, स्टाईप्स रिमवर पाहायला मिळतील. त्यामुळे कॅट आय पद्धतीचे सनग्लासेस हे ब्लॅक रंगाच्या ग्लासेसमध्येच उपलब्ध आहेत. आजकाल पूर्वीसारखे सगळेच लोकप्रिय ट्रेण्ड्स बऱ्यापैकी उतरणीला आहेत. त्यापैकी राऊंड फेस आणि ओव्हरसाइज्ड सनग्लासेस आहेत; जे सध्या परिधान करणं कमी झालं आहे.