गायत्री हसबनीस

सतत जीन्स, टॉप, टी-शर्ट घालून मॉडर्नेस मिरविण्याची क्रेझ पूर्वी कॉलेज तरुणींनाच काय, ऑफिस गर्ल्समध्ये तितकीच होती. पण काही वर्षांपासून वैयक्तिक फॅशनवर खूप भर दिला जातोय. म्हणजे ‘एथनिक वेअर’च्या फॅशन. यंदाही तरुण ग्राहकांमध्ये एथनिकचा बोलबाला आहे.

how to make kala masala at home recipe
Recipe : आजीबाईंनी दिलेल्या प्रमाणाने घरच्याघरी बनवा ‘गोडा मसाला! लिहून घ्या हे प्रमाण
quarantine ship in mauritus
मॉरिशसमध्ये अख्खे जहाजच केले क्वारंटाईन; ३,००० हून अधिक लोक अडकले समुद्रात; नेमके प्रकरण काय?
Opportunities for the unemployed Recruitment for more than 20 thousand vacancies
बेरोजगारांना संधी! २० हजारांपेक्षा जास्त रिक्त पदांवर भरती!
Index Sensex falls to 73 thousand level print eco news
नफावसुलीमुळे ‘सेन्सेक्स’ ३५२ अंश माघारी

सोशल मीडियावरून ट्रेडिशनल कपडे जास्तीतजास्त प्रमाणात ग्राहकांना आकर्षित करतात. कारण साडय़ा, चुणीदार, पलाझो-कुर्ता, ब्रोकेड ड्रेसेस, कॉटन आणि चिकनकारी कुर्ती, जरदोसी ड्रेस, लेनिन कुर्ते, लखनवी ड्रेसेस आणि खादीचे कपडे असे असंख्य प्रकार ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही प्रकारे ग्राहकांकडून खरेदी केले जातात. आरामदायी आणि सुटेबल कपडे घालण्याविषयीची आणि त्या हिशोबाने फॅशनची जागरूकता तरुणींमध्ये आलीय. आधी कॉलेज, मग ऑफिसात तरुण मुली हल्ली ‘एथनिक वेअर’ वा मग अगदी ट्रेडिशनल पण कॅज्युअल वेअर जास्त वापरतात.

याउपर अपडेट राहणंही आलंच. इन्स्टाग्राम आणि फेसबुक अपडेटेड राहत असलेल्यांना येऊ घातलेल्या ट्रेडिशनल आणि एथनिक वेअरच्या खरेदीचा शौक असतो आणि तो ते लागलीच पुरवतातही.

प्रोफेशन, रूटीन आणि बदलत्या जीवनशैलीमुळे डिझाइनर त्या पद्धतीने विविध स्टाइलचे एथनिक आणि ट्रेडिशनल कपडे बाजारात आणत आहेत. प्रामुख्याने एथनिक वेअरच्या वाढत्या मागणीमुळे त्यात नानाविध प्रकारांची ओळखही तरुणींना सतत नव्याने होत असते. रंग, फॅब्रिक आणि पॅटर्न्‍समध्ये येणारे वैविध्य हे वैयक्तिक पातळीवर लगेच अपील होत असल्याने बाजारात काय नवीन येतंय याची खात्री मुलींना आहे. व्हॉट्स अ‍ॅपवरून एकमेकींना (मैत्रिणींना) नव्या आउटफिट्सविषयी माहिती देणं, त्यावर चर्चा करताना पसंतीला स्थान देणं आणि मग खरेदी असा तो क्रम आहे.

खूप आधी अनारकलीची क्रेझ होती. आता पलाझो सलवारने त्याची जागा घेतलीय. अनारकलीमध्ये रंगांच्या छटा आणि त्यांची सरमिसळ होती. पण आता पलाझो सलवार आणि कमीज अशा पद्धतीच्या कपडय़ांमध्ये असंख्य पॅटर्न्‍स उपलब्ध आहेत. त्यात नानाविध प्रकार, स्टाइल्स, डिझाइन्स, पॅटर्न्‍स आणि एमब्रॉयडरीही पाहायला मिळते. मुलींना लांबलचक पलाझो स्कर्ट घालायला आवडतो ज्याच्या बॉर्डरला एमब्रॉयडरी आणि तो स्कर्ट आकर्षित वाटावा म्हणून तीन-चार पदरी लटकनही त्याला असते. अजूनही विशेषत: आवडत्या सिनेअभिनेत्री ट्रेडिशनल आणि एथनिक वेअरमध्ये काय घालतात त्यानुसार त्यांना आवडीने ‘फॉलो’ करतात. हवी तशी केशरचना, त्याप्रमाणे अ‍ॅक्सेसरीज घालून ज्यात बॅग्स, चपला, घडय़ाळ अशा छोटय़ामोठय़ा गोष्टींचीही तरुणी वैयक्तिकरीत्या काळजी घेत असतात.

आकर्षक ‘अनमॅच’

कोणत्याही प्रकारचे कपडे आता मॅचिंगच असावेत असा आता हट्ट वा गरज उरली नाही. गेली चार वर्षे होत असलेल्या फॅशन वीक्समधूनही हेच दिसून आले. त्यामुळे एकाच रंगाच्या शेड्स वापरणं किंवा त्याला थोडं कॉन्ट्रास्ट आणि मॅचिंग अ‍ॅक्सेसरीज परिधान करायची आणि गरज नाही. वेगळ्या पद्धतीने ‘स्टॅन्ड आऊट’ होण्यासाठी अनमॅच म्हणजेच मिळतीजुळती फॅशन न करता आता सहजसोपी आणि आकर्षक फॅशन होते. कुर्त्यांखाली चुणीदार वा सलवार घालण्याचे दिवस आता नाहीत तर एथनिक सेमी पलाझो, केपरी, थ्री-फोर्थ आणि हॅरम पॅन्ट असे पर्याय आता खुले झाले आहेत. कुर्त्यांप्रमाणेच क्रॉप टॉप, लॉन्ग एथनिक जॅकेट, साडी पॅन्ट, साडी ड्रेस, एसिमेट्रिकल कुर्ता, एसिमेट्रिकल पॅन्ट्स आणि टय़ूनिक टॉप्स यांचा समावेश आहे. आता पॅन्टचे डिझाइन, रंग आणि स्वरूप सटल रंगांचे असल्यास त्यावर विरोधी डिझाइन, रंग आणि पॅटर्नचा टॉप घालून मॅचिंगचा ट्रेण्ड मोडला आहे. त्यामुळे वेगळं काहीतरी हवं असेल तर मॅचिंग लुक विचारात न घेता ‘आऊट ऑफ द बॉक्स’ विचार करून फॅशन करण्याचा प्रयत्न सगळी तरुण पिढी अवलंबते आहे.