सुट्टी पडली की घरातील छोटय़ा दोस्तांसाठी दुकानातून, वाचनालयातून गोष्टींची भरपूर पुस्तके आणली जातात. लहान मुलांना दुपारी झोपही लागत नाही आणि उन्हामुळे खेळायलाही बाहेर सोडता येत नाही. मग गोष्टींची पुस्तके आणि सोबत आइस्क्रीम, कुल्फी अशी धमाल असते. एका बैठकीत पूर्ण पुस्तक वाचून होणं तर अशक्यच. मग दरवेळी शेवटची वाचलेली गोष्ट  शोधत पानं उलटवत बसण्याऐवजी एखादं मस्त बुकमार्क त्यात ठेवलं तर? आणि हे बुकमार्क आइस्क्रीम, कुल्फीच्या काडय़ांपासून किंवा चमच्यांपासून बनवता आलं तर मुलांना जास्तच मजा येईल. पाहू या कसं करता येईल ते.

साहित्य

palghar geography garden marathi news
पालघर: शालेय विद्यार्थ्यांसाठी जिल्ह्यात भूगोल उद्यानाची स्थापना, राज्यातील चौथा प्रकल्प
Perfect Brush For Healthy Teeth Why Adults Shall Use Kids Tooth Brush
तोंडाची दुर्गंधी कमी करण्यासह ‘या’ फायद्यांसाठी तुम्हीही वापरायला हवा लहान मुलांचा टूथब्रश; डॉक्टर काय सांगतात?
stock market, 3 7 crore dmat accounts
सरलेल्या आर्थिक वर्षात ३.७ कोटी डिमॅट खात्यांची भर
diver artist uma mani began exploring new depths to life at age 49
४९ व्या वर्षी शिकल्या स्कुबा डायव्हिंग; आज समुद्र संरक्षणासाठी करतायत मोलाचे काम; कोण आहेत उमा मणी?

आइस्क्रीमच्या काडय़ा किंवा चमचा, कात्री, टिकल्या, ग्लीटर, पुठ्ठा, गम, गुंजेच्या बिया.

कृती

* फुलाच्या आकाराचा पुठ्ठा कापा.

*  आतील बाजूला आइस्क्रीमची काडी चिकटवून घ्या.

*  आत फुलाच्या मधोमध किंवा चमच्याच्या खोलगट भागात गम पसरवा व त्यात गुंजेच्या बिया चिकटवून घ्या.

*  पाकळ्यांच्या कोपऱ्यांमध्ये गम पसरवा व त्यावर चिकटवा.

* बाहेरील बाजूस टिकल्यांचे सुशोभन करा.

*  स्वस्त, सुंदर, टिकाऊ  बुकमार्क तयार.

apac64kala@gmail.com