|| मिलिंद गांगल

जीप या ब्रॅण्डला सात दशकांहून अधिक काळाची ऐतिहासिक पाश्र्वभूमी आहे. प्रामुख्याने हे वाहन अमेरिकन लष्करासाठी दुसऱ्या महायुद्धात बनविले गेले. अमेरिकन बँटन कार कंपनीच्या कार्ल प्रोब्स्त या डेट्रॉइटमधील प्रतिभासंपन्न डिझायनरने अमेरिकन लष्कराला अभिप्रेत असलेल्या गाडीचा आराखडा अवघ्या आठवडाभरात बनवून त्याच्या ब्लू पिंट्र्ससहित सादर केला.

indian chess players performance in candidates chess
ऐतिहासिक सांगतेकडे..
freedom of artist marathi news
‘कलानंद’ हवा असेल तर ‘कलाकाराचं स्वातंत्र्य’ मान्य करता आलं पाहिजे…
Return journey to Alexander
भूगोलाचा इतिहास: ..जेव्हा सम्राट हतबल होतो!
Who was Ramses II
विश्लेषण: गेल्या अनेक वर्षांपासूनचे कोडे आता उलगडणार? कोण होता रामसेस दुसरा? का आहे जगाला त्याचे आकर्षण?

मात्र, छोटय़ा आकाराची बँटन कार कंपनी अमेरिकेच्या अवाढव्य लष्कराला हव्या तेवढय़ा प्रमाणात गाडय़ा पुरवू शकणार नव्हती. यामुळे या गाडीच्या प्रारूपामध्ये थोडे बदल करत उत्पादनाची जबाबदारी बँटनसोबतच विलीज ओवरलॅण्ड आणि फोर्ड मोटर्स कंपनीला देण्यात आले. ही गाडी फोर व्हील ड्राइव्ह होती. ही प्रणाली तेव्हा स्पायसर या कंपनीने पुरविली होती. अमेरिकन लष्करासाठीच हे वाहन बनविण्यात येत असल्याने खडकाळ, वालुकामय भूभाग आणि काटेकुटे- पाण्याच्या प्रदेशातून आरामात मार्गक्रमण करू शकेल अशा सर्व प्रकारच्या भूभागांवर या वाहनाचे अतिशय खडतर अशा चाचण्या घेतल्या गेल्या.

या चाचण्यांमध्ये तावून-सुलाखून निघालेल्या या जीपने दुसऱ्या महायुद्धात मोठी कामगिरी बजावली. त्या वेळी जीप एक छोटी तोफ बसवलेली गाडी, रुग्णवाहिका, झाड कापण्याची यंत्रणा असलेली गाडी, अग्निशामक वाहन, ट्रॅक्टर अशा विविध कामांना उपयोगी आली आणि जीपने त्या युद्धात आपले बहुउपायोगित्व सिद्ध केले. महायुद्धाच्या काळात जीप हे वाहन अमेरिकेने, ग्रेट ब्रिटन आणि तत्कालीन सोव्हिएत रशियाला देखील पुरवले.

महायुद्ध संपल्यानंतर पुढे जीप हे फक्त आर्मीचे वाहन न राहता त्याचे बहुउपयोगित्व लक्षात घेऊन व्यापारी, नागरी वापरासाठीही त्याचे उत्पादन होऊ लागले. जीप हे वाहन इतके लोकप्रिय होऊ लागले की पुढे-पुढे जीप या नाममुद्रेची मालकी अनेक उत्पादकांकडे होती. अमेरिकेबाहेरही जीपचे उत्पादन होऊ लागले आणि अनेक देशांत जीप अवतरली, दिमाखात वावरली, कोणत्याही ओबडधोबड रस्त्यावर चालू शकणारी म्हणून ही गाडी ओळखली जाऊ लागली आणि उत्तरोत्तर अधिकाधिक लोकप्रिय होत गेली.

काळाला अनुसरून जीपमध्ये विविध सुविधा उत्पादक देत राहिले अन् वेगवेगळ्या रूपात जीप अनेक देशांत, सर्व प्रकारच्या वातावरणात अन् अगदी खडबडीत रस्त्यापासून ते गुळगुळीत हमरस्त्यावर आपले बहुगुणित्व सिद्ध करत राहिली.

युद्धासाठीचे वाहन म्हणून निर्मिली गेलेली ही गाडी हळूहळू एसयूव्ही बनली. काळाच्या ओघात जीप या ब्रॅण्डची मालकी विलीज ओवरलॅण्ड, फोर्ड मोटर्स, कैसर जीप, अमेरिकन मोटर कॉपरेरेशन (रेनॉल्ट संचलित) क्रीसलर, डॅमलर असा प्रवास करत फियाट कंपनीच्या भात्यात सामील झाली.

या साऱ्या प्रवासात जीपचे रंगरूपच बदलून गेले. अनेक मॉडेल अस्तित्वात आली. १५ ते १७ लाखांपासून दीड कोटी किमतीचे जीपचे मॉडेल (जीप चेरोकी २१३) आपल्या देशामध्ये उपलब्ध आहेत. वाहननिर्मिती क्षेत्रातील अनेक दिग्गजांच्या मालकीची असलेली ही नाममुद्रा आपले ‘जीप’पण आजही टिकवून आहे. तुलना करायची म्हटली तर आपल्या भारतीय अभिजात संगीतात एकच राग, संगीतातील नावाजलेली घराणी, आपापल्या घराण्याच्या चालीरीती सांभाळत (किराणा, आग्रा जयपूर, ग्वालियर) एकच राग वेगळ्या ढंगाने पेश करतात. तरीदेखील यमन हा यमन असतो, मारू बिहाग हा मारू बिहाग असतो. ही घराणी रागाचा थाट अथवा बाज बदलू शकत नाहीत. अगदी तसेच जीपचे देखील आहे. अनेक कंपन्यांची मालकी बदलूनसुद्धा जीपचे ‘जीप’पण आणि त्याची लोकप्रियता टिकून आहे.

गेली अनेक वष्रे मिहद्र आणि मिहद्र कंपनी  स्टेशन वॅगन मूळ उत्पादकांकडून परवाना घेऊन भारतामध्ये मिहद्र जीप बनवत होती. आता मात्र फियाट, क्रिस्लर यांनी रांजणगाव येथे स्वत:चा प्रकल्प सुरू केला असून जीप कंपास या पहिला मॉडेलचे उत्पादन गेले वर्षभर सुरू आहे. कंपास हे  मॉडेल खास उजवीकडे स्टेअरिंग असलेल्या देशांसाठी बनविण्यात आले आहे. जीपच्या भात्यात बरीच अस्त्र असून भविष्यात ती भारतीय वाहनप्रेमींच्या सेवेत येणार आहेत.

कंपास श्रेणीमधले बेडरॉक नावाचे मर्यादित श्रेणीतले मॉडेल कंपनीने नुकतेच भारतीय बाजारात आणले आहे. यानंतर २०१९ मध्ये येणारे जीपचे रेनेगेड हे मॉडेल येणार आहे.

३१ जुल २०१७ रोजी भारतीय बाजारपेठेत सादर झालेल्या जीप कंपासने अवघ्या वर्षभरात २५००० वाहने विकण्याचा उच्चांक गाठला. फियाट क्रिसलर ऑटोमोबाइल इंडियासाठी (एफसीए) जीप कंपास या मॉडेलने केलेली ही सर्वोत्तम कामगिरी ठरली आहे. त्याचा आनंद साजरा करताना एफसीएने भारतीय बाजारपेठेत जीप कंपास बेडरॉक हे मर्यादित श्रेणीतील मॉडेल आणले आहे. या निमित्ताने जीप या ब्रॅण्डकडे वळून पाहताना सात दशकांचा इतिहास लक्षात घ्यावा लागेल.