टाळेबंदीच्या काळात घरात अडकलेल्या अनेकांनी वेगवेगळे उपक्रम राबवले. कलागुणांना वाव दिला आणि हे अनुभव करोनाष्टकच्या माध्यमातून वाचकांसमोर आले. वाचकपत्रांचा ओघ संपलेला नाही पण तब्बल दोन महिने चाललेल्या या उपक्रमाला आता येथे विराम देत आहोत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

प्रज्ञा प्रकाश चिकटे, ठाणे मोबाइलला आपण सारे सतत नावे ठेवतअसतो. पण मोबाइल वापरायचे काही सोडत नाही. या टाळेबंदीच्या काळात मात्र मोबाइलने खूप मदत के ली. त्याच्याच माध्यमातून नातेवाईक, मित्रमंडळीे यांच्या संपर्कात राहू शकलो. कितीतरी कोडी सोडवली. त्यावरूनच एकमेकांच्या कविता वाचल्या. कौतुक के ले. अनेक लेखांचा, कथांचा अनुभव घेतला. अनेक नवनव्या पाककृती या मोबाइलच्या माध्यमातूनच कळल्या. आंबा आईस्क्रीम, टूटीफट्री, जाम, कोफ्ते अशा अनेक पाककृती मोबाइलमुळेच करू शकलो.

आमचे एकत्र कुटुंब आहे. आम्ही दोघे, मुलगा सून आणि मोठे दीर व जाऊबाई एकत्र राहतो. १८ एप्रिलला माझ्या मिस्टरांचा आणि त्या आधी २२ मार्चला माझ्या मोठय़ा जाऊबाईंचा ७०वा वाढदिवस होता. त्यासाठी ठाण्यातच राहणारी माझी पुतणीही येऊ शकणार नव्हती, पण हा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा करण्याचे मुला-सुनेने ठरवले.  त्या दोघांनी माझ्या, जाऊबाईंच्या आणि सुनेच्या भावा बहिणींना वाढदिवसाच्या दिवशी सकाळी फोन करून त्यांच्याकडून संदेश मागवले. त्याचा सुंदरसा व्हिडीओ बनवला. आम्ही घरीच के कही के ला.  के क कापताना आणि औक्षण करताना सारे पुतणे, भाचेमंडळी व्हिडीओ कॉलद्वारे सहभागी झाले. एकू ण घरीच के लेला हा वाढदिवसही साऱ्यांच्या उपस्थितीत झक्कास पार पडला.

स्वावलंबनाचे महत्त्व

डॉ. शारदा निर्मळ-महांडुळे, अहमदनगर : करोनाने आपल्या सगळ्यांचेच जगणे बदलले आहे. बाहेरचे खाणे-पिणे, भटकणे-हिंडणे यात रमलेल्या माणसाला त्याने घरात बसवले आहे. बाहेर जाऊन खाणे-पिणे तर आपण जणू विसरूनच गेलो आहोत. नेहमी वाढदिवस म्हटल्यावर बाहेरून के क आणि खाद्यपदार्थ मागवले जात. पण या वेळी मी ठरवून लेकीच्या वाढदिवसाला घरीच के क बनवला. कधी नव्हे ती वेळात वेळ काढून अगदी निवांतपणे देवाची पूजा साग्रसंगीत करता येत आहे. शांतपणे चहाचे घुटके  घेता येत आहेत.

एरव्हीही या गोष्टी होत होत्या, पण त्यात सतत एक घाई असे. यानिमित्ताने मुलांना स्वावलंबी बनवण्याचा एक छोटासा प्रयत्नही मी के ला आहे. मुलांना काम शिकवत असताना खूप धीर धरावा लागतो. वेळ द्यावा लागतो, पण माझ्या कामाच्या गडबडीमुळे तो देणे शक्य नव्हते. आता मात्र थोडा वेळ मिळत होता.  मुलगा-मुलगी दोघांनाही जेवणानंतर आपले ताटवाटी घासून ठेवणे, के र काढणे, लादी पुसणे, कपडे धुणे, घडय़ा घालणे, चहा, सरबत करणे, कु कर लावणे, कणीक मळणे, पोळ्या लाटणे, कांदा चिरणे ही कामे शिकवत आहे. याचा छान परिणामही दिसला.

मुलगी दूर्वा आणि मुलगा अंकु र यांनी मिळून पोळी-भात-वरण आणि पनीरची भाजी असा स्वयंपाक के ला. अंकु रने पोळ्या के ल्या तर दूर्वाने भाजी.  मुलांचे वडील  डॉ. प्रशांतसुद्धा त्यांच्यासोबत कामांमध्ये सहभागी होतात. या सगळ्या कामांमुळे कं टाळा येण्याऐवजी छान एकत्रित गप्पा झाल्या. एकोपा वाढला.

पेटी शिकलो

श्रीकांत पेटकर,कल्याण : घरी राहून आता दोन महिने होत आले. याआधी कधीही इतका वेळ घरी राहिलो नव्हतो. पण आता काही पर्यायच नव्हता. मग मी स्वत:ला,कुटुंबाला व्यस्त ठेवण्याचे  कार्यक्रम  ठरवले. चित्र काढणे, रंगवणे, रेखाटने काढणे हे साऱ्यांनाच आवडते. त्यामुळे ते सुरू  झाले. रोज काही ना काही कविता करत होतो. ते समाजमाध्यमांवरून शेअरही करत होतो. सुरुल आणि सुकृती या माझ्या लेकींनी अनेक नव्या गोष्टी शिकवल्या. मी त्यांच्याकडून पेटी वाजवायला शिकलो. पत्नीकडून स्वयंपाकाचे धडे घेतले. मुलींच्या मदतीने पोलिसांना मुखपटय़ा वाटप, रस्त्यावरील सूचना फलकावर सूचना लिहिण्यासारखा उपक्रम के ला.  विविध ऑनलाइन स्पर्धामध्ये सहभाग घेतला. अनेक उत्तम सिनेमे पाहिले.  इरफान खानच्या निधनानंतर आम्ही त्याचे सगळे सिनेमे पाहिले.  त्याचे रसग्रहणही के ले. एखाद्या अभिनेत्याचे इतके  सिनेमे सलग पाहण्याचा हा माझा पहिलाच अनुभव होता आणि तो छान होता. या सगळ्या गोष्टींमुळे ही टाळेबंदी एक संधीच वाटू लागली आहे.

किल्ल्यावरील कलाकु सर

काव्या निखिल केंद्रेकर, परभणी : टाळेबंदी झाल्यावर फार कं टाळा आल होता. रोज मी आईला विचारायचे काय करू? काय करू? आईलाही अगदी काय सांगावे सुचत नव्हते. बाबांनी आणून दिलेली  सगळी चित्रांची पुस्तके रंगवून संपली. नवीन आणावी म्हटले तर शक्य नव्हते. कॅरम, बॅडमिंटन, सापशिडी, नवा व्यापार खेळून पण कंटाळा आला. एक दिवस मस्त कल्पना सुचली.  दिवाळीच्या वेळेस आजोबांनी मातीचा किल्ला करायला शिकवला होता. मग काय अंगणातली काळी माती, पाणी घेतले आणि मस्त चिखल के ला. जमेल तशी खेळणी, फळे, कुंडय़ा, पणत्या, आरतीचे ताट तयार केले. आईच्या मदतीने छोटासा गणपतीबाप्पाही बनवला. या मातीकामात सध्या मस्त वेळ जात आहे.

सुप्त कलागुणांना जाग

 डॉ शैला कलंत्री, नांदेड टाळेबंदीच्या काळात वेळ मिळाल्यावर इतके दिवस सुप्तावस्थेत गेलेल्या कलागुणांना जाग आली. वैद्यकीय महाविद्यालयात असताना, चित्र काढणे, अवांतर वाचन, सिनेमे, संगीत, नाटके , ट्रेकिं ग हे सगळे के ले होते. पण त्यानंतर मात्र प्रत्यक्ष काम करायला लागल्यावर या गोष्टी कु ठेतरी हरवून गेल्या होत्या. टाळेबंदीत बाहेर जाणे शक्य नव्हते. पण घरात बसून करता येण्यासारख्या गोष्टी तर करू शकत होते. मग पुस्तकांचा संग्रह उघडला. आवडीने घेतलेली पुस्तके  पण ती वाचलीच नव्हती. त्या वाचनाला सुरुवात के ली. रोज सकाळी २तास चित्र काढते. पुस्तके  वाचते. नियमित रोजनिशी लिहिते. घराजवळची बागही नव्याने भेटल्यासारखी वाटते. मनसोक्त छायाचित्रण करते आहे. गंमत म्हणजे पतींचे के सही घरीच कापले. त्यातही मजा आली. या सगळ्याबरोबर अत्यवस्थ रुग्ण पाहणे सुरूच आहे. अर्थात पूर्ण काळजी घेऊनच. मी सगळ्यांना सांगेन, या करोना काळात आप भी कुछ करो ना!

अभ्याससाहित्य तयार केले

दिलीप अहिरे : जगभरात करोनाच्या विषाणूने थैमान घातले आहे. टाळेबंदी संपण्याऐवजी वाढण्याचीच शक्यता जास्त वाटते. त्यामुळे  शाळा व महाविद्यालय लवकर सुरू होतील असे वाटत नाही. पण मुलांसाठी अध्ययन  साहित्य निर्माण करणे गरजेचे आहे.  मी गेली ३३वर्षे मराठी विषयाचे अध्यापन तसेच अभ्याससाहित्य करत आहे. आत्तासुद्धा १०१  साहित्यिकांची माहिती आणि फोटो मिळून साहित्य परिचय तक्ते  तयार के ले. इतिहासाच्या अध्ययनासाठी देशभक्त, क्रांतिकारकांचेही असे तक्ते  के ले. दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी तज्ज्ञ शिक्षकानी दिलेल्या माहितीपर लेखांचे कात्रण फाईल के ले.  बोधकथा व योगासने याबद्दलचा संग्रहदेखील केला आहे. विविध दैनिकांत प्रसिद्ध झालेल्या किल्ले,दुर्ग यांची माहितीची हस्तलिखिते तयार करून घेतली आहेत. या सगळ्यामुळे टाळेबंदीचा काळ सत्कारणी लागल्याचे समाधान मिळत आहे. या सर्व साहित्याचा भविष्यात मला, माझे सहकारी शिक्षक व विद्यार्थी यांना नक्कीच फायदा होणार आहे.

शिवनेरी दर्शन झाले

कुलदीप सैद, नारायणगाव : करोनामुळे टाळेबंदी घोषित झाली. मीही पुण्याहून माझ्या गावी नारायणगावला परतलो. घरामध्ये कु टुंबासोबत छान वेळ घालवण्याची ही संधीच होती. सूर्यनमस्कार, स्वयंपाकात आईला मदत, वैयक्तिक अभ्यास, दुपारी जेवण, वामकु क्षी घेतो. वडील मुख्याध्यापक असल्याने त्यांचे शालेय काम सुरूच आहे. आई शिक्षिका असल्याने तिचेही आरोग्याबाबतचे असणारे दैनंदिन सर्वेक्षण सुरू असते. घराच्या गच्चीवर संध्याकाळचा फे रफटका असतोच.

एक दिवस मात्र अगदी आश्चर्याची गोष्ट घडली. वारुळवाडी— नारायणगाव येथील आमच्या गच्चीवरून हरिश्चंद्र-बालाघाट डोंगररांगेत वसलेल्या शिवनेरीचे दर्शन होऊ लागले. पूर्वी प्रदूषणामुळे ते डोंगर दृष्टीसच पडत नसत. आता मात्र रोज गच्चीवरून शिवनेरीचे दर्शन होऊ लागले. सारे मिळून आम्ही विविध पुस्तकांचे वाचन करतो. जुने फोटो, शुभेच्छापत्रे काढून वाचतो.

गोष्ट वैद्यकीय उपकरणांची

राधिका वेलणकर : सध्या टाळेबंदीमुळे दोन महिन्यांपासून घरातून काम चालू आहे. सारा दिवस यातच जातो. सोबतच करोनीविषयीच्या बातम्या ऐकणे,वर्तमानपत्रामध्ये त्याबद्दल माहिती वाचणे हेही सुरूच आहे. यात एक गोष्ट प्रकर्षांने जाणवली ती म्हणजे वैद्यकीय क्षेत्राशी निगडित भरपूर शब्द आपण सध्या ऐकतोय जसे की व्हेंटिलेटर, थर्मल स्कॅनर, पीपीई, रॅपिड टेस्ट किट  इ. पण त्याचा अर्थ काही समजतो असे नाही. बायोमेडिकल इंजिनीयरिंगच्या पदवीचा उपयोग करून या उपकरणांची माहिती आपण का देऊ नये, असा विचार मनात आला. लगेच कामाला लागले. माहिती गोळा के ली. एक यूटय़ूब वाहिनी उघडून त्यावर हे व्हिडीओ पोस्ट के ले. त्याला उत्तम प्रतिसादही मिळत आहे.

किश्श्यांचा खजिना

डॉ. नूतनकुमार पाटणी, चिकलठाणा, औरंगाबाद कधी स्वप्नातही वाटले नव्हते, अशी परिस्थिती करोनाने प्रत्यक्षात उतरवली. वृत्तपत्र हातात येणे बंद झाले. तेव्हा विचार के ला मी वेगवेगळ्या वृत्तपत्रांमध्ये पत्रलेखन के ले आहे, त्याचा संग्रह के ला. कात्रणे नीट चिकटवली. यात मुलगा शंतनू आणि पत्नी अलकाची फार मदत झाली. मी अनेक कविताही के ल्या होत्या, पण त्या कु ठे चिटोरक्यांवर, एखाद्या वहीच्या मागे वगैरे होत्या. त्या सगळ्या नीट लिहून काढल्या. आता मी सत्तरीच्या उंबरठय़ावर आहे. इतक्या वर्षांत अनेक निरनिराळे अनुभव आले. अनेक कठीण प्रसंग आले. पण त्यातून मी कशाप्रकारे वाचलो, त्या त्या वेळी नेमके  काय के ले हे सगळे मुलांना सांगितले.  कु त्र्याने माझे प्राण कसे वाचवले, उंदीरमामाने नेलेले कानातले डूल परत कसे दिले, हरवलेली किल्ली रात्री एक वाजता कशी सापडली,नागिणीच्या पिल्लाला पकडतानाचा थरार अशा या गोष्टी सांगताना मला मजा आली आणि ऐकताना मुलांना. या सगळ्यासोबत छायाचित्रण आणि बागकामाचा छंद जोपासला.

ती सध्या काय करते?

स्मिता लेले-कुलकर्णी : फोनची रिंग वाजली. छत्तीसगडवरून एका काकूंचा फोन होता, माझी दिव्यांग मुलगी मनाली कु लकर्णी हिची राष्ट्रपतीपदाची यशोगाथा त्यांनी वाचली होती. आता सध्या टाळेबंदीच्या काळात मनाली काय करते, कं टाळली का, चिडचिड तर नाही करत ना? असे प्रश्न त्या विचारत होत्या. हे प्रश्न काळजीपोटीच होते हे मी समजूच शकते. कारण सामान्य मुले निदान घरातल्या चार भिंतींत तरी बागडू शकतात, पण मनालीसारखी मुले सतत व्हीलचेअरवर किं वा जमिनीवर बसून काय करतील? मला काकूंचे प्रश्न ऐकू न एका गोष्टीचे समाधान वाटले की, बारा वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतरही लोकांना मनूबाबत आस्था वाटते. तिच्या कामाचे कौतुक वाटते.

मी काकूंना म्हटले, अहो काकू , मनालीसारखी मुले तर या संकटालाच संधी समजतात आणि आपल्यालाच चार गोष्टी नव्याने शिकवीत असतात. कालच मनूच्या धाकटय़ा बहिणीला सन्मिताला एक नवा पदार्थ करून पाहायचा होता. तो करता करता स्वयंपाकाला उशीर झाला. त्यामुळे मनालीच्या जेवणालाही उशीर झाला. त्यामुळे ती जेवलीच नाही. आम्ही खूप समजावले पण ती म्हणाली, ‘‘आई मी रागावले नाही गं. सध्या माझे अ‍ॅक्टिव्हिटी सेंटर बंद आहे. त्यामुळे शरीराला चलनवलन नाही. अशात मी उशिरा खाल्ले तर पचनसंस्थेवर ताण येणार, अपचन, उलटय़ा होणार.. तुमच्या सगळ्यांची पळापळ होणार. या वेळेला आपण बाहेर पडलो तर बाहेर पोलिसमामांनासुद्धा त्रास होणार.. मग हे सगळे टाळण्यासाठी मी खाल्ले नाही. ’’ इतके च काय घरी के लेले आइस्क्रीम आवडत असूनही तिने खाल्ले नाही. कारण तिचे म्हणणे एकच, दुखऱ्या दातावर ताण येईल. तिचे डॉक्टर विचारेकाका यांना तिला त्रास द्यायचा नव्हता. या काळात तर नाहीच नाही. तिच्या या समंजसपणाचे, विचारीपणाचे मला कौतुकच वाटले. यासोबत ती स्वत:चे इतर वेळापत्रक नीट सांभाळते आहे. के वळ आम्हाला त्रास होऊ नये म्हणून आपले आपण औषधाचा डोस तयार करणे, बेड तयार करणे, युरिन पॉट स्वच्छ करणे या गोष्टी ती आवडीने करते. बसल्याबसल्या मला मदत म्हणून कांदे वगैरे चिरून देते. कपडय़ांच्या घडय़ा घालते. या काळात मनाली तिची चित्रकलेची आवड जोपासते आहे. अगदी मनसोक्त चित्र काढते आहे. स्वत:ची काळजी ती जिवापाड घेतेच, पण त्यामागे आपल्यामुळे दुसऱ्यांना त्रास होऊ नये, असा तिचा हेतू असतो. ही टाळेबंदी लवकरच संपावी आणि मनूसारख्या इतर मुलांचे आयुष्यही पुन्हा नव्याने सुरू व्हावे, हीच अपेक्षा!

मराठीतील सर्व कुटुंबकट्टा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lockdown activities readers activities in lockdown zws
First published on: 28-05-2020 at 04:35 IST