खांद्याच्या खुब्याचा व्यायाम

खांद्याच्या खुब्याच्या (एक्स्टर्नल रोटेटर) बळकटीसाठी व्यायाम करणे आवश्यक आहे.

|| डॉ. अभिजीत जोशी

खांद्याच्या खुब्याच्या (एक्स्टर्नल रोटेटर) बळकटीसाठी व्यायाम करणे आवश्यक आहे. हा व्यायाम थेराबँडच्या साहाय्याने करता येतो. खांद्याच्या खुब्याचे स्नायू बाहेरून दिसत नाहीत. ते सांध्याच्या अंत:भागात खोलवर असतात. या व्यायामाने केवळ एक्स्टर्नल रोटेटरचे स्नायूच नव्हे, तर मनगट आणि खांद्याच्या मागील बाजूस असलेले स्नायूही मजबूत होतात.

कसे कराल?

थेराबँडची टोके दोन्ही हातात पकडून ठेवा. सुरुवातीला थेराबँडला थोडा ताण द्या. हाताचे कोपर आणि मनगट काटकोनात असावे. हाताचे कोपर शरीराच्या खूपच जवळ असू द्या. (छायाचित्र १ पाहा) असे करताना मनगटाची कोणतीही हालचाल न करता स्थिर ठेवा.

थेराबँडला ताण देऊन दोन्ही हाताचे कोपर आता बाहेरच्या बाजूस फिरवा आणि थेराबँडचा ताण कमी करून पुन्हा पूर्वीच्या स्थितीत या. (छायाचित्र १ पाहा) मात्र असे करताना हाताला झटका देऊ नका. नाहीतर खांद्याला दुखापत होऊ शकते. हा व्यायाम अत्यंत संथ गतीने आणि दृढतापूर्वक करायचा आहे.

dr.abhijit@gmail.com

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Loksatta fitness mantra

ताज्या बातम्या