अपूर्व आणि रेश्मा ओक, ठाणे

करोना संकटामुळे कधी नव्हे ते घरातील तिन्ही पिढय़ा एकत्र आल्या आहेत. या उदासीन आणि भयप्रद वातावरणाला सामोरे जाताना आशावाद निर्माण करणारे काही मार्ग कोणी शोधून काढले असतील, काही अभिनव उपक्रमाद्वारे घरातील सर्वच व्यक्तींचा वेळ सत्कारणी आणि अर्थपूर्ण बनविला असेल तर वाचकांनी आपले सकारात्मक अनुभव लिहून पाठवावेत असे आवाहन ‘लोकसत्ता’ने केले होते. त्या आवाहनाला उदंड प्रतिसाद मिळाला. त्यातील काही निवडक अनुभव..

करोनामुळे सारेच घरी आहेत आणि मुलेही घरातच. त्यामुळे पालकांपुढे मोठे आव्हान आहे ते, या बालवीरांना कसे रमवायचे त्याचे. आम्ही मुलांना रमवण्यासाठी काही उपक्रम आवर्जून राबवतो. इतर पालकांनाही ते उपयोगी पडू शकतील, यासाठी ते शेअर करत आहे.

गाणी, गोष्टी बहुतेक सगळ्याच मुलांना आवडतात. त्यांची पुस्तके  वाचणे किं वा व्हिडीओ पाहणे साऱ्याच मुलांना आवडते, पण मुलांना मोबाइल शक्यतो देऊ नये. गाणी के वळ ऐकणे हा प्रकार आता कमी झाला आहे. तेव्हा तो परत सुरू करायला हरकत नाही. विविध भाषांतील, विविध प्रकारांतील गाणी घरात मंद आवाजात लावून ठेवावी. त्यामुळे मुलांना संगीत ऐकण्याची सवय होते. निरनिराळ्या भाषांतील गाणी ऐकल्याचा फायदा भाषा शिक्षणात नक्कीच होऊ शकतो. पत्ते, उनो हे खेळही  मजेचे ठरतात.

मुलांना प्रयोग करायला आवडतं. त्यामुळे त्यांना घरातल्या गोष्टी हाताळायला, त्यांच्याशी खेळायला द्याव्यात. स्वयंपाकघर ही त्यांची प्रयोगशाळा ठरू शकते. कणीक मळणे, त्याचे आकार करणे, सरबत करणे आणि पिणे, भाज्या चिरणे असे उद्योग करायला देता येतात. अर्थात त्यासाठी मुले थोडी मोठी हवीत. पाच वर्षांपेक्षा मोठी मुलं-मुली असतील तर स्वयंपाकात मदतनीस म्हणून उत्तम कामगिरी करतात. चित्र काढायला आवडत असेल तर चित्र काढण्यात तासन्तास जाऊ शकतात. भाज्यांचे ठसे वापरूनही चित्रे काढता येतात. त्याच चित्रांची पुढे वही करावी, त्यात त्यांना निर्मितीचा आनंद मिळतो. घरी पाना, हातोडी, पकड अशी अवजारे असतील तर त्या प्रकारचे खेळ खेळता येतात. उदाहरणार्थ सुतार सुतार, गॅरेज गॅरेज किंवा काहीही. अर्थात हे खेळताना काळजी गरजेची आहे.

अक्षरं आणि अंकांचे खेळ खेळायला मजा येते. अक्षरांचे झाड, अक्षरचक्र यांसारखे काही खेळ आम्ही नियमितही खेळतो. एक अक्षर घेऊन त्यापासून सुरू होणारे जितके शब्द आठवतील तितके लिहीत जावे. ते अक्षर म्हणजे बीज आणि शब्दगणिक एक फांदी असे अक्षरांचे झाड तयार करावे. अक्षरांची छोटी छोटी करड करून ठेवावीत आणि वेळ लावून अक्षरे ओळखण्याची स्पर्धा करावी. अशाच प्रकारे वेगवेगळी चार-पाच अक्षरं काढून त्यापासून शब्द तयार करायचा खेळ करता येतो. समान अर्थाचे शब्द किंवा उलट अर्थाचे शब्द याचा खेळ खेळता येतो. नाव-गाव-फळ-फूल हा खेळ मुलांसोबत तोंडी किंवा लिहिता येत असल्यास लिहून खेळता येतो. अंकांची कोडी घालून मुलांना रमवता येते. घरातल्या वस्तू घेऊन खेळाखेळात बेरीज, वजाबाकी याची ओळख करून देता येते. रंगांचे खेळ खेळता येतात. उदाहरणार्थ एक रंग सांगून त्या रंगाच्या जास्तीत जास्त वस्तू एकत्र करणे. मग त्या मोजून पुन्हा जागच्या जागी ठेवणे. याने रंगांची ओळख होतेच, परंतु घरात काय कुठे ठेवलं आहे हे कळते आणि पुन्हा तिथेच ठेवायचे असल्याने स्मरणशक्तीचाही व्यायाम होतो. घरी नकाशा असेल तर जगाची ओळख करून देता येते.

या सुट्टीत अनेक जण साफसफाई करत असतील. त्यात मुलांनाही सहभागी करून घ्या. सोबत उडत्या ठेक्याची गाणी लावा. श्रमपरिहार म्हणून एखादा चटकमटक पदार्थ सगळ्यांनी एकत्र खा. मुलांना या सगळ्यात खूप मजा येते. कपडय़ांच्या घडय़ा घालणे, कपडे वाळत घालणे, केर काढणे, लादी पुसणे या कृती मुद्दाम मुलांना करायला द्याव्यात. घरात फळे-भाज्या यांच्या बिया काढून ठेवाव्यात, कुंडय़ा असतील तर त्या बिया पेरून मुलांना बागकाम करू द्यावे, छान वेळ जातो. ‘वेळ’ न जाण्यावर उपाय म्हणून घडय़ाळ वाचायला शिकवावे. खेळणी तर सगळ्याच मुलांकडे असतात, पण खोक्यावर लिहिल्याप्रमाणेच ती खेळणी खेळण्याचा आग्रह धरू नका. उदा. चेंडू असेल तर त्याचा उपयोग झेल घेत खेळायला होतो. घरातल्या घरात

क्रिके ट, कधी पेल्याचा मनोरा करून तो चेंडूने नेम धरून पाडणे इ. ही यादी आणखी बरीच मोठी होऊ शकते. यातले अनेक  खेळ आम्ही घरी खेळतो.  कधी ठरवून तर कधी उत्स्फूर्तपणे. मुलांशी अगणित प्रकारचे खेळ खेळता येतात. पालक किती कल्पक विचार करतात त्यावर अवलंबून आहे. या सुट्टीत असे अनेक खेळ खेळता येतील, अर्थात शासनाच्या सर्व सूचना तंतोतंत पाळून मगच आणि घराच्या बाहेर अज्जिबात न पडता.

माझी डिजिटल नृत्य साधना

स्नेहा पोतदार : मी गेली १५ वर्षे नृत्याचे वर्ग घेते. काहीही झाले तरी यामध्ये आत्तापर्यंत  कधीही खंड पडला नाही, पण करोनाच्या या संकटामुळे सक्तीचे घरी बसणे आले. एवढय़ा वर्षांतून मिळालेल्या या निवांतपणामुळे दिवसभर करायचे काय असे वाटू लागले आणि अंगातली व्यावसायिकता शांतही बसू देईना. मग नवऱ्याने ऑनलाइन क्लास घेण्याबद्दल प्रोत्साहित केले.  ऑनलाइन क्लास ही संकल्पना तशी नवीन नाही. पण माझ्यासारख्या छोटय़ा स्तरावर क्लास घेणाऱ्यांसाठी नक्कीच नवीन आहे. करोनाच्या या काळात मी ते शिकू न घेतले. आता दिवसातून एक तास रोज मी हा ऑनलाइन क्लास चालवते. आजवर के वळ माझ्या परिसरापुरता मर्यादित असलेला हा  क्लास आता अगदी जगभर पसरला. पार दुबई, स्पेन येथूनही विद्यार्थी मिळाले. वय वर्षे ३ ते ६० या वयोगटांतील लहान मुले, महिला, पुरुष असे चाळीस जण या उपक्रमात सहभागी आहेत. आता फिटनेस ते बेली डान्सिंगपर्यंत अनेक गोष्टी मी त्यांच्याकडून करवून घेत आहे.  या निराशाजनक परिस्थितीत नृत्याच्या माध्यमातून मी त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवू शकते याचे समाधान मला मिळाले आहे. मनात इच्छा असेल आणि सकारात्मक विचार असतील तर कुठल्याही परिस्थितीत आपण मार्ग शोधतोच हा धडा मला या काळात घेता आला.

शैक्षणिक खेळांची गंमत-जंमत

मानसी शैलेंद्र शिंदे, कुर्ला : मी कर्णबधिर विद्यार्थ्यांना शिकवते. करोनामुळे आम्हालाही सुट्टय़ा मिळाल्या. माझी दोन्ही मुले आयसीएसई बोर्डला शिकत असल्याने दोघांचीही परीक्षा फेब्रुवारीअखेरीस संपून  १५ मार्चपर्यंत सुट्टी होती. १६ मार्चपासून त्यांची शाळा सुरू होणार होती. त्यात ही सुट्टी सुरू झाली. करोनामुळे पाळणाघरेही बंद त्यामुळे मुले घरीच. घरात राहून दिवसभर टीव्ही, मोबाइल असा त्याचा दिनक्रम सुरू झाला. ते पाहून माझा राग अनावर व्हायचा पण दुसरा पर्यायही नव्हता. माझे विद्यार्थीही असेच काही करत असतील, असा विचार मनात आला आणि माझ्यातली शिक्षिका जागी झाली. मी पटकन उठले आणि छोटय़ाला म्हणाले, मला मदत करशील का? तो तयार झाला. त्याला म्हटले, तुझ्या टेबलमध्ये जे काही उरलेले साहित्य तू आता शाळेतून आणले आहेस ते बाहेर काढ. त्याने सर्व पट्टी, पेन्सिल, १/४ आकाराचे रंगीत कागद,  जुन्या वह्य, सजावटीचे साहित्य बाहेर काढले.

मलाही एक उत्साह आला होता. एके क युक्त्या सुचू लागल्या. वहीचे पुट्ठे काढले ते वर्तुळात कापून दिले. छोटय़ाला सांगितले, त्यात भर म्हणून. तोवर मोठा लेकही मदतीला आला. मला एक सवय आहे, कोणतीही वस्तू टाकण्यापूर्वी त्याचा काही उपयोग होईल का हे विचार करते मगच ती वस्तू टाकून देते. त्याप्रमाणे मी जपून ठेवलेले कागदी ग्लास, चमचे, बाहेर काढले. मुलांनी दिलेले वर्तुळ रंगवून ठेवले होते. तिघांनी बसून आम्ही पाढय़ांचे चक्र बनवले. मोठा म्हणाला, आई, या चक्रात तुला वेगवेगळ्या संकल्पनाही करता येतील.  माझाही तोच विचार चालू होता. मुलांनी दुसरे गोल कापून देईपर्यंत मी बनवलेल्या पाढय़ांच्या चक्राचा व्हिडीओ के ला आणि माझ्या वर्गाच्या व्हॉट्सअ‍ॅप  ग्रुपवर टाकला. विद्यार्थ्यांच्या नावानिशी प्रत्येकाला एक पाढय़ांचे चक्र बनवण्यास सांगितले. मुलांनी कापून ठेवलेल्या गोलातून आम्ही लागलीच जुन्या पुस्तकांतून चित्र व शब्द कापून त्याचे एक/ अनेक (२्रल्लॠ४’ं१ ंल्ल िस्र्’४१ं’) चे  चक्र बनवले.  जे  इंग्रजी अभ्यासासाठी उपयुक्त होणार आहे. असेच आणखी विशेषण, क्रियापदे यांचेही चक्र बनवण्याचा विचार केला आहे.

अभ्यासानंतर कागदी ग्लासांचा खेळ बनवण्याचा विचार आला. लगेचच छोटय़ाला एका जुन्या पुस्तकातील चित्र व शब्द कापून दिले आणि त्याच्याकडून ते प्रत्येक ग्लासवर चिकटवून घेतले. एक शैक्षणिक खेळ तयार झाला. लागलीच मी त्या खेळाचा प्रयोग लेकावर केला. त्याला माहिती दिली कसा खेळायचा आणि त्याचा एक व्हिडीओ केला. त्याला हिंदी हा विषय गेल्या वर्षीपासून सुरू झाला असल्याने त्याची शब्दसंपदा जरा कमी होती. या खेळातून त्याची हिंदीची शब्दसंपदा वाढवण्याचा प्रयत्न के ला. माझ्या क्षेत्रातील माझ्या मित्र/ मैत्रिणीनी  हे व्हिडीओ पाहून, त्यापासून प्रेरणा घेतली. त्यावर अभिप्रायही दिले.  सगळ्यात मोठा आनंद मिळाला तो, एका कर्करोगपीडित मुलांसाठी काम करणाऱ्या संस्थेकडून. अ‍ॅक्सेस लाइफ या संस्थेतर्फे  कर्करोगपीडित मुलांना सहाय्य के ले जाते. या संस्थेकडे मुलांना अ‍ॅक्टिव्हिटी शिकवण्यासाठी येणारे तज्ज्ञ आता करोनामुळे बंद झाले आहेत. अशा वेळी माझे हे व्हिडीओ त्यांनी वापरले. त्यांना उपयोगी पडले. मी त्या मुलांशीही ऑनलाइन संवाद साधला. खेळ दाखवले. या मुलांना झालेला आनंद पाहून खऱ्या अर्थाने मन भरून आले.

घराची आणि मनाचीही सफाई

प्रा. अनिता किशोर सुळे, चिंचवड  : न भूतो न भविष्यति असे घडले आणि लांबवर असलेल्या चीनच्या वुहान या शहरातून हा करोना थेट आपल्या भारतात येऊन पोहोचला. या विषाणूने संप्रू्ण जगाचाच जीवनक्रम बदलवून टाकला. सर्वानाच सक्तीने घरी बसण्याची वेळ आली. आता घरातील सर्व सभासद घरीच आहोत. आता ठरवले आहे की, सर्वाशी आधी छानसा संवाद साधायचा. घरातील सर्व सभासद सकाळ, संध्याकाळ एकत्र जेवत आहोत. विचारांची देवाणघेवाण करत आहोत. घरात खेळत असायचे खेळ आठवले. कोपऱ्यात धूळ खात पडलेला कॅ रम माझ्याकडे बघून हसत होता. आता तरी माझ्याशी बोला, असेच जणू सुचवीत होता. मग सोंगटय़ा शोधल्या आणि सुरक्षित अंतर राखून सारेच कॅ रममध्ये रमलो. मग आणखीन काही जुने खेळ सापडतात का, याचा शोध सुरू झाला. मग घरातच बारकाईने निरीक्षण व्हायला लागले. प्रत्येक गोष्ट वेगळीच भासत होती. काहीकाही गोष्टी उगाच माळ्यावर जागा अडवून बसल्या होत्या. त्यांना नम्रपणे खाली उतरवून कायमचा रामराम ठोकला.

हॉलमधील सोफा ,पडदे मग डोळे वटारून माझ्याकडे बघायला लागले. पडदे तर म्हणत होते, अगं,आता तरी जरा मस्तपैकी आंघोळ करू दे आम्हाला. दोन-तीन महिने झाले तसेच आहोत.  मी उगाचच ओशाळले आणि पटकन सोफ्यावरची आवरणे, पडदे, गालिचा यांना स्वच्छ धुऊन हॉलमध्ये बसविले.  कोपऱ्यात बघते तर फु लदाणी रुसून बसलेली. जणू ती विचारत होती, काय फक्त मोठा कार्यक्रम असला की मगच माझ्याकडे बघणार का? मग तीही मस्त धुऊनपुसून ठेवली. मग आला टीव्हीचा नंबर. त्यावरचीही धूळ झटकली. तो म्हणत होता, एवढय़ा महत्त्वाच्या बातम्या देतो मी, मनोरंजन करतो, मग माझ्यावरची धूळ जरा पुसून ठेवत जा. हे सगळे करून जरा बसते न बसते तोच समोरचे कपाट दिसले. तेही पुसले. त्याचे दार उघडले तोच भराभर सर्व सामानांचा पाऊस माझ्या अंगावर कोसळला. मग मात्र आळस झटकला आणि कामाला लागले. स्वच्छ भारत अभियानाच्या धर्तीवर सगळे घर साफ करून टाकले. एकमेका साहाय्य करू म्हणत सगळे सदस्य या कार्यात सहभागी झाले. हे अभियान तब्बल चार दिवस चालले. पाचव्या दिवशी आमचे घर अगदी वेगळेच दिसू लागले. जणू ब्युटीपार्लरला जाऊन टिकोमिको करून आल्यासारखे. आता टेरेसमधली छोटीशी बागही हिरवीगार दिसते आहे. गुलाब, शेवंती, मोगरा, गोकर्ण सारे आनंदाने डोलतायत. आमच्या शेजाऱ्यांशीही नव्याने गप्पा झाल्या. आता गच्चीवरच्या बागेत तुळस आणि गवती चहासुद्धा लावणार आहोत. एकू णच या करोनाच्या निमित्ताने या सगळ्या गोष्टींना नव्याने उजाळा झाला. घराची आणि मनाचीही सफाई झाली.

सापशिडी, पत्ते आणि गप्पा

प्रियांका दडेकर, ठाणे  : माणूस हा प्राणी खरेच विचित्र आहे. नवीन वर्ष सुरू झाल्यावर आपण सगळे जण वर्षभरात किती सुटय़ा मिळणार आहेत, याचे गणित मांडत बसतो. मग त्या सुटय़ांत काय काय करायचे, याचे नियोजन करतो. घरी वेळ घालवणे, हल्ली

कु णालाच आवडत नाही, पण करोनाने सगळ्यांना सक्तीने घरी बसवले. समाजमाध्यमांवर सगळे या सुट्टीविषयी भावना व्यक्त करत होते. काही जण खूश होते, काही चिंतित. आम्ही विचार के ला, आता ही सुट्टी मिळालीच आहे तर तिचा विनियोग चांगल्या कामासाठी करू. उगाच वायफळ गप्पा नकोत. मग पहिले काम के ले ते एकमेकांशी संवाद साधण्याचे. दैनंदिन कामातील व्यस्ततेमुळे एकमेकांसोबतचा संवादच हरवला होता. मग ठरवले, आता ठरवून गप्पा मारायच्या. तेव्हा लक्षात आले, घरातले हे साथीदारच खरे. बाकी फक्त औपचारिकता. आपल्या आणि त्यांच्याही बालपणाच्या  गमतीशीर गोष्टी जेव्हा आपण आईवडिलांकडून ऐकतो ना तेव्हा  इतके वर्ष बाहेरच्या साथीदारांसोबत घालवलेले क्षण फिके पडतात. काही वेळा स्वत:शी होणारा संवादही महत्त्वाचा असतो. तो करण्यासाठी वेळ मिळाला. नाव, गाव, फळ, फू लसारखा खेळ किती दिवसांनी खेळलो. खूप धमाल आली. डमशेराजसारखा खेळ खेळताना अभिनयाची कसोटी लागली. सापशिडी, पत्ते सगळेच जुने मित्र नव्याने सापडले. या सगळ्या गोष्टी आपल्या नित्यक्रमातील नाहीत. खरे तर आपण मोठे होताना मागे पडलेल्या गोष्टी या, पण त्या करताना खूप धमाल आली. करोनाच्या निमित्ताने हे सगळे क्षण अनुभवायला मिळाले आणि हो यासोबत आम्ही शासनाचे नियमही पाळत आहोत. कारण या सगळ्या गोष्टी आम्ही करतोय ते घरात बसून मगच.

कोसलाची साथ

करणकुमार पोले, वाळकी, हिंगोली : जुनी पुस्तके चाळता चाळता भालचंद्र नेमाडय़ांची ‘कोसला’ दिसली. पूर्वी डिग्रीला असताना वाचलेली. पहिल्या वेळी वाचतानाचा अनुभव आणि या वेळी वाचतानाचा अनुभव काही वेगळाच होता. पहिल्या वेळी वाचताना आपण कुठले रटाळ पुस्तक वाचतोय असे वाटले होते. तेव्हा कदाचित समज नव्हती. आयुष्यात पहिलीच कादंबरी वाचत असल्याने असेल कदाचित. या वेळी मात्र खराखुरा पांडुरंग सांगवीकर मला भेटला, असे वाटले. आपल्या घरच्यांच्या जुनाट विचारांची व्यथा मांडणारा, त्याविरोधात बंड करणारा, सडेतोड पांडुरंग, आपल्या बहिणीच्या मृत्यूची कथा सांगणारा, डोळ्यांच्या कडा भिजवतील, असे त्याचे वर्णन करणारा, महाविद्यालय, वसतिगृहाच्या आठवणी, खानावळीच्या बिलांचे प्रश्न मांडणारा सांगवीकर अगदी आपल्यातलाच एक वाटतो. त्याचे एकटेपणही जवळचे वाटते. कादंबरीतही असाच एकटा चालणारा पांथस्थ भेटतो.