करोना संकटामुळे कधी नव्हे ते घरातील तिन्ही पिढय़ा एकत्र आल्या आहेत. या उदासीन आणि भयप्रद वातावरणाला सामोरे जाताना आशावाद निर्माण करणारे काही मार्ग कोणी शोधून काढले असतील, काही अभिनव उपक्रमाद्वारे घरातील सर्वच व्यक्तींचा वेळ सत्कारणी आणि अर्थपूर्ण बनविला असेल तर वाचकांनी आपले सकारात्मक अनुभव लिहून पाठवावेत असे आवाहन ‘लोकसत्ता’ने केले होते. त्या आवाहनाला उदंड प्रतिसाद मिळाला. त्यातील काही निवडक अनुभव..

सुदाम कृष्णाजी विश्वे, पुणे  : करोनाच्या पाश्वर्भूमीवर सगळ्यांना लॉकडाऊन अंतर्गत घरीच बसायचे होते. सुरुवातीला एक दोन दिवस आराम केला, पण नंतर खूप कंटाळा येऊ लागला. संपूर्ण दिवस अगदी अंगावर येऊ लागला. वाचन, टीव्ही, बातम्या, यातूनही खूप वेळ शिल्लक राहू लागला. मग विचार सुरू झाला आणखी काय करावे की, हा वेळ मजेत जाईल. शिवाय घरच्यांनाही त्याचा त्रास होणार नाही. मग एक युक्ती सुचली.

mumbai ban on slum demolition marathi news, slums mumbai marathi news
झोपडपट्टी पुनर्विकासात परवानगीविना अतिरिक्त झोपड्या तोडण्यावर बंदी, नव्या परिपत्रकामुळे झोपडीवासीयांना दिलासा
Developed an innovative method to diagnose Parkinson in the first stage Mumbai
मुंबई: कंपवाताचे पूर्वनिदान करता येणार
multi color grapes export demand decline at global level
निर्यातीसाठी रंगीत द्राक्षांना मागणी घटली; जाणून घ्या कारणे काय ?
Construction of 121 artificial reefs on Konkan coast for fish conservation
मत्स्यसंवर्धनासाठी कोकण किनारपट्टीवर १२१ कृत्रिम भित्तिकांची उभारणी

दोन वर्षांपूर्वी मी चित्रकला शिक्षक म्हणून निवृत्त झालो. सेवेत असताना मी नियमित चित्र काढत असे. कोणत्याही कलेचा सराव केला तरच ती टिकते असे म्हणतात. पण निवृत्तीनंतर मात्र माझा चित्रकलेचा सराव थोडा थोडा कमी होत गेला. या संचारबंदीमुळे दिवसभर घरीच राहायचे. त्यामुळे हा सराव पुन्हा सुरू केला तर आपला वेळ मजेत जाईल असे वाटले. मला जलरंग हे माध्यम खूप आवडते. जलरंगातील निसर्गचित्रांची मजा काही औरच. अनेक वेळा वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन मी निसर्गचित्रे काढत असे. मग ठरवले, करोनाच्या या सक्तीच्या सुट्टीच्या काळात जलरंगात चित्र काढण्याचा सराव करावा. घरात शोधाशोध करून जलरंगाची पेटी शोधली. पेन्सिल, ब्रश शोधून काढले. जलरंगावरील काही पुस्तके होतीच. खूप दिवस सराव केलेला नव्हता, मग या पुस्तकांचा आधार घेऊन चित्र काढायला सुरवात केली. पेन्सिल ड्रॉईंग केले, जलरंगात निसर्गचित्र काढायला  घेतले. जसजसे चित्र काढत गेलो तसतसा उत्साह वाढत गेला. चित्र छान जमत गेले. आमच्या सूनबाईंनादेखील चित्रकलेची आवड, ती सुद्धा या सराव सत्रात सहभागी झाली. दोन—तीन तास मजेत जाऊ लागले.  आता ठरवले आहे, रोजच्या रोज नियमित सराव करायचा. संचारबंदीचा कालखंडच नाही तर पुढेही जलरंगातील चित्रे नियमित काढायची.

मुलांचा वेळ कसा घालवावा?

जगदीश काबरे, नवी मुंबई</strong> : ‘करोना‘च्या कृपेमुळे अचानक लहान-थोरांना सुट्टय़ा मिळाल्या. आठवीपर्यंतच्या मुलांच्या तर परीक्षा रद्द झाल्या. त्यामुळे त्यांना अभ्यासालाही अनायासे सुट्टी मिळाली. अशा वेळेला घरी असलेल्या आई—वडिलांना या मुलांच्या घरभर हुंदडण्याचे करायचे तरी काय असा मोठा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे.  आमच्या घरातही आठ वर्षांचा नातू ऋषी आहे. या अचानक मिळालेल्या सुट्टीचा आनंद वाचनाची हौस भागवून करून घेत आहे. वाचनाचा कंटाळा आला की,  मोटार बनवणे, विमान बनवणे, घरे बनवणे असे सर्जक डोकॅ लिटीचे खेळ खेळायला लागतो. त्याचाही कंटाळा आला की मग नेटफ्लिक्स किंवा यूटय़ूबवर वैज्ञानिक कार्टून पाहतो.. सोपे आणि घरी करता येण्यासारखे वैज्ञानिक प्रयोग आणि जादूचे प्रयोगही पाहातो. याचबरोबर पुढच्या वर्षांच्या इयत्तेची शालेय पुस्तकेही चाळतो.

हे सगळे करत असताना त्याच्या सतत आईशी गप्पा चालू असतात. आईला सतत प्रश्न विचारून भंडावून सोडतो. कारण त्याला सुरुवातीपासूनच कोणतीही गोष्ट कळली नाही तर ‘म्हणजे काय?‘ असा प्रश्न विचारायची सवय त्याच्या आईने लावली आहे. चौकसबुद्धी वाढल्यावर आपोआपच मुलांची आकलनक्षमताही वाढते. त्याच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न ती करत असते. अडचणीच्या प्रश्नांवर त्याला गप्प न बसवता आणि उत्तर माहीत नसेल तर कधीही थातूरमातूर सांगून वेळ मारून नेत नाही, तर त्याला स्वच्छपणे सांगते की, याचे उत्तर मला माहीत नाही पण नंतर शोधून तुला देईन. असा सगळा त्याचा भरगच्च कार्यक्रम असल्यामुळे त्याचा दिवस कसा जातो ते त्यालाच कळत नाही. या सगळ्यासोबत आम्ही नातवासोबत जे खेळ खेळतो, त्यातील काही नमुन्यादाखल देत आहे. त्याचा सुयोग्य वापर करून इतर पालकही आपल्या पाल्याचा वेळ सत्कारणी लावू शकतील.

१) अक्षरओळख : या खेळात एक मुळाक्षर घेऊन त्यावरून किती शब्द तयार करता येतात ते तपासणे आणि अशा प्रत्येक शब्दाला एक गुण देणे. अशा शब्दांची यादी तयार करून त्यांचे अर्थ विचारणे, आणि माहीत नसतील तर समजावून देणे.

२) एका शब्दातून अनेक शब्द तयार करणे : या खेळात एक शब्द देऊन त्यातील अक्षरांपासून इतर अनेक शब्द तयार करणे.

अक्षरांची निवड करून नवीन शब्द तयार करणे. आणि अशा प्रत्येक शब्दाला एक गुण देणे. उदा. वातावरण पासून वात, वरण, तारण, ताव, वार इ. शब्द तयार होतात.

३) समानार्थी शब्द देऊन गाव, शहर वा राज्याचे नाव ओळखणे: या खेळात इंग्रजी, मराठी आणि हिंदी अशा तीनही भाषांचा वापर करता येईल.

उदा. Make juice = बनारस,

House of clouds = मेघालय,  इ. नावे आणि गावे बनवता येतील.

४) शब्दाचे वर्णन : या खेळात एक शब्द द्यायचा आणि त्यावर किमान ५ वाक्ये तयार करायला सांगायचे.

उदा. हवा –  ‘हवे’त सजीवांसाठी जीवनावश्यक असलेला ऑक्सिजन वायू हा एक घटक आहे. किं वा  मला लाडू ‘हवा’.

अशा प्रकारे ‘हवा‘ या शब्दाचे विविध अर्थच्छटांचे उपयोग करायला मुले शिकतात.

५) मनकवडी संख्या : या खेळात एक ते नऊ यातील कोणताही आकडा मुलाला/मुलीला मनात धरायला सांगा.

त्या आकडय़ाला ३ ने गुणा, मग येणाऱ्या संख्येत एक मिळवा. पुन्हा ३ ने गुणा. त्यामध्ये धरलेला आकडा मिळवा आणि उत्तर काय आले ते विचारा. त्याने सांगितलेल्या उत्तरातील दशकस्थानचा अंक हा मनात पकडलेला आकडा असातो.

उदा. सात हा आकडा धरला तर ७ x ३=२१,  २१+१=२२,  २२x३=६६,  ६६+७=७३ दशकस्थानी ७ मनात पकडलेला आकडा आहे.

गणितातील अशी अनेक कोडी शोधून मुलांचा वेळ मजेत घालवता येईल. (त्यासाठी आंतरजालाची मदत घेता येईल.) वेगवेगळ्या विषयांतील अशी कोडी शोधल्यास मुलांचा अभ्यासही होईल आणि मजाही येईल. या खेळांमध्ये मुलांचा छान वेळ जातोच, पण पालकांचाही वेळ छान जातो.

पापड, कुरडया आणि गप्पा

रेणुका हातवळणे, ठाणे : करोना जगासाठी हानीकारकच आहे. पण या पळणाऱ्या जगाला थोडावेळ का होईना थांबवून ठेवण्याची किमया या करोनाने के ली आहे. करोनामुळे मिळालेल्या या सक्तीच्या सुट्टीत उदास होण्यापेक्षा काहीतरी छान करण्याचा आमचा प्रयत्न आहे. आम्ही मायेलेकींनी ठरवले आहे, रोज काहीतरी नवीन करायचे. कोकणातून गेल्यावर्षी शंख-शिंपले आणले होते. ते तसेच खोक्यात पडले होते मग दोघींनी मिळून त्याची छान फोटोफ्रे म बनवली.  संदीप खरेंच्या गाण्यातला लवकर जाणारा नी उशीरा येणारा दमलेला बाबा आता लेकीला समोर बसून काम करताना दिसतो आहे. त्यामुळे तीही खुश आहे. तिच्यासोबत पत्ते आणि विविध खेळ खेळताना वेळ कसा जातो, हे कळत नाही. सहज रात्री काही गप्पा मारताना गोष्टी सांगताना लक्षात आले की, माझ्या मुलीला पापड, कु रडया या गोष्टी कशा करतात ते माहितीच नाही. मग ठरवले तिला हे दाखवून द्यायचे. आजीचीही सोबत मिळाली आणि मग पापड,  कु रडया करून दाखवल्या. या निमित्ताने तीन पिढय़ा एकत्र आल्या आणि एक वेगळीच धमाल आम्ही अनुभवली. नेहमी मॉल्स किं वा इतर ठिकाणी फिरून मिळणारी सो कॉल्ड फन आम्ही अशी घरात वेगवेगळ्या पद्धतीने अनुभवतो आहे.

आनंदाची फुलबाग

सुनीता श्रीराम दातार, ठाणे : वयाची पंचाहत्तरी ओलांडलेले आम्ही दोघे ज्येष्ठ नागरिक करोनाचा प्रादुर्भाव होण्यापूर्वी आमच्या सोसायटीत संध्याकाळी नियमितपणे कट्ट्यावर जात असू. तिथे आमच्यासारख्याच समवयस्कांबरोबर गप्पागोष्टी चालायच्या. शिवाय आमचा मुलगा आमच्या घरापासून जवळच १० मिनिटावर राहतो. त्यामुळे २—४ दिवसांनी नात किवा मुला-सुनेचे येणेजाणे चालायचे. थोडक्यात गेल्या महिन्यापर्यंत आमच्या आयुष्याची संध्याकाळ सुखात चालली होती. पण या सर्व दिनचर्येला करोनामुळे एकदम खीळ बसल्यासारखे झाले. पहिल्या दिवशीची संध्याकाळ खूप सुनीसुनी वाटली. आजूबाजूच्या घडामोडी ऐकायला बातम्या लावल्या तर बहुंताश निराशाजनक बातम्या. त्यांनी मनाची उदासी आणखीनच वाढली. ते कमी म्हणून की काय समाजमाध्यमांवरील उलटसुलट..खऱ्याखोटय़ा बातम्यांनी गोंधळात टाकायचे काम केले. रात्री झोपताना मात्र मनाशी पक्के केले की, उद्यापासून यावर काहीतरी मार्ग काढला पाहिजे. त्यानुसार दुसऱ्या दिवसापासून नक्की काय काय करायचे त्याचे वेळापत्रकच आखले म्हणा ना.

घरकामाला येणारी मदतनीस मुलगी यापुढे येणार नसल्याने स्वयंपाकपाण्याबरोबरच साफसफाई, भांडी वगैरे जास्तीची कामेही अंगावर पडली. अर्थात आपली तब्येत सांभाळून जमतील तसतशी ती कामे दुपापर्यंत आटपली की जेवणानंतरची थोडी विश्रांती अत्यावश्यकच. पण वामकुक्षी झाल्यानंतर मात्र रात्रीपर्यंतचा वेळ आम्ही दोघांनी सत्कारणी लावायचा ठरवले. माझा पिंड कलाकाराचा..एकेकाळी कुठे मण्यांची तोरणे.हार.पुठ्ठय़ावरच्या महिरपी. कागदाची फुले करण्यात माझा हातखंडा होता. आजूबाजूच्या बऱ्याच जणांना मी हौसेने ते शिकवायची, पण कालांतरान सर्व मागे पडले होते.

या साथसोवळ्याच्या दिवसात दुपारच्या चहानंतर आम्ही दोघांनी एक कार्यक्रम नक्की केला. आमच्याकडे अनेक आध्यात्मिक .तत्त्वज्ञानपर पुस्तकाचा संग्रह आहे, आम्हाला दोघांनाही त्यात रुची आहे. म्हणूनच त्या दिवसापासून माझ्या यजमानांनी एक एक पुस्तक मोठय़ाने वाचायला सुरुवात केली आणि मी..बाजूला बसून श्रवणभक्ती करताकरता कागदांपासून फु ले तयार करू लागले. कधी चाफ्याची कधी पारिजातकाची, कधी गुलाब तर कधी जास्वंदाची फुले तयार करू लागले. तिन्हीसांजेपर्यंत माझी परडी फुलांनी भरून जाऊ लागली, अजूनही त्यात रोज भर पडतेय.

सध्या ही फुले तयार करताना माझ्यातले कसब मला नव्याने गवसले आहे. या वयातही मी काही साकारू शकते हा सकारात्मक विचार मला दुसऱ्या दिवसाची आतुरतेने वाट बघायला लावतो. करोनाच्या निराशाजनक वातावरणातही आमच्या छंदामुळे आमच्या घरात आम्ही आनंदाची फुलबाग फुलवायचा प्रयत्न केलाय म्हणायला हरकत नाही.

अन्नपूर्णा पारगेकाकू

विष्णू चौधरी, पुणे : मी पुण्यामध्ये शिकत आहे. सदाशिव पेठेत अभ्यास करतो. करोनामुळे सध्या साऱ्या पुण्यात स्मशानशांतता पसरली आहे. एरव्ही विद्यार्थ्यांच्या आवाजाने गलक्याने गजबजलेली आमची पेठही सध्या शांत आहे. अभ्यासिका बंद, खानावळी, उपाहारगृह सारे काही बंद. अनेक मुले गावी गेली आहेत. काहींची जेवणाची व्यवस्था होत नसल्याने तीही गावी जाण्याच्या गडबडीत होती. काहींना मात्र ते जमलेच नाही.

आमच्या खानावळीच्या पारगे काकू ंनी मात्र या काळात आम्हा विद्यार्थ्यांसाठी मोलाचे काम के ले आहे. त्यांनी आमच्या जेवणाची चांगली सोय के ली आहे. सर्वानाच माहिती आहे, भाजीबाजार बंद आहे, भाज्या नाहीत. पण काकू चे काही नातेवाईक लॉकडाऊनच्या आधीच्या काळात गावावरून येणार होते, तेव्हा काकू ने त्यांना चक्क तिकडून भाजीपाला आणायला सांगितला.

त्यांनीही येताना गाडीत घालून होता होईल तेवढा भाजीपाला आणला. या कठीण परिस्थितीत कु णी कु णाला जवळ बसू देण्यासही तयार नसताना आमच्या काकू ने मात्र आमची जेवणाची सोय के लीच, शिवाय आम्हाला सगळयांना सांगितले आहे, तुमच्या कु णा मित्राला जेवण मिळत नसेल तर त्यालाही बिनधास्त घेऊन या. सारे मिळून खाऊ या. सर्वजण सध्या के वळ स्वत:च्या सुरक्षेचा विचार करत असताना आमच्या काकू ची ही कृती खूप वंदनीय आहे.

धावपळीतून ब्रेक

पूजा ढेरिंगे : रोजच्या आयुष्यात नोकरीमागे, करिअरमागे धावताना अनेकदा वाटायचे की, थोडा विराम घ्यावा. कधी तरी सकाळची साखरझोप मिळावी. कधीतरी मस्तपैकी दुपारी १ ते ४ निवांत ताणून द्यावी. पण आपल्या दुपटीने पळणारे जग पाहिल्यावर असा विचार करूनही ओशाळल्यासारखे होत असे. करोनामुळे मिळालेल्या या सुट्टीने मात्र हे सगळे करण्याची संधी दिली. घरात सगळेच काही ना काही कामात व्यस्त त्यामुळे अनेकदा प्रत्येकाच्या कामाच्या ठिकाणचे राग, ताणतणाव घरावर निघत असत. पण एकमेकांशी शांतपणे बोलण्यासाठीही कोणाकडे वेळ नव्हता. परिणामी घराचे गणित जरा बिघडले होते.

करोना सुट्टीचा पहिला दिवस कॉलेजच्या पहिल्या दिवसासारखाच अवघडलेला गेला. दुसऱ्या दिवशी मात्र सकाळीच बातम्यांनी जाग आली. पुण्यातील करोनाग्रस्तांचा आकडा वाढतोच आहे. ते पाहून सगळ्यांना एकमेकांची काळजी वाटू लागली.  बोलता बोलता निवांतपणे सगळेजण आपली मतं मांडू लागले. ही मतमतांतरे चालू असताना कपडय़ांचे कप्पे आवरायला घेतले. जुने पण चांगल्या स्थितीतले वापरत नसलेले कपडे  आश्रमात देण्यासाठी काढले, धुण्याजोगे कपडे बाजूला काढून, जुन्या उशांच्या खोळी, बेडशीट, पडदे एकदाचे धुवायला टाकले. जुन्या कपडय़ांच्या आठवणी काढून त्याची नाळ जुन्या घरांशी जोडून पुन्हा आठवणींचे एक घर बनत होतं. नकळत गाण्यांच्या भेंडय़ाही सुरू झाल्या होत्या. कपडे आवरून झाले तरीही हातात बराच वेळ शिल्लक राहत होता. तेव्हा बाल्कनीत बागकाम करायचे ठरवले. रोपांच्या मुळांना टवटवीत कोंब फुटले होते, पण त्याच्या पानांवर धूळ साचली होती. सगळी रोपे पाण्याने धुऊन त्यांना ताजेतवाने के ले. बाल्कनीतील कोळ्यांची जाळी काढून टाकली असून तिथे मस्त पेंटिंग करायचे ठरवले. ती जागा परवापर्यंत चकचकीत करून तिथे पुस्तक वाचायला बसणार आहोत, नवे-जुने काही लिहायला, ऐकायला बसणार आहोत. घरात आई, पप्पा आणि आज्जी आहे, कामामुळे थकून आल्यानंतर त्यांचा असा वेळ दिला जात नाही, त्यामुळे त्यांच्यासाठी आणि आमच्यासाठी सुटीच्या दिवशी ती बाल्कनी आमच्या तिन्ही पिढय़ांची साक्षीदार बनणार आहे. या काळात मला खरी मजा आली ती ‘कानातल्यांची खिडकी’ बनवायला. घरात जुनी जाळीची खिडकी पडून होती. ती सजवून तिच्या जाळीत कानातले अडकवले. कु णी खास व्यक्तीने दिलेले कानातले, कु णी आठवणीने दिलेले, कधी स्वत:च हौशीने घेतलेले कानातले आवरताना मजा आली. सोबतच धूळ खात पडलेल्या सीडीज, पुस्तके  यांचे कप्पेही आवरून झाले.  सोबतच लहानपणचे खेळही बाहेर आले.  घरचेच पौष्टिक पण चविष्ट खाणे सुरू झाले. सोबत मूगभजी,रवा डोसा, तांदळाचे धिरडे हे पदार्थही लज्जत वाढवू लागले. आमच्या गप्पांमध्ये बोलता बोलता आजी म्हणाली, हे रोग साधारण १०० वर्षांनी येतच राहतात. तिने प्लेगची साथ, देवीची साथ या काळातील आठवणी सांगितल्या. ती म्हणाली, हे सगळे रोग माणसासाठी घातकच असतात पण निसर्ग मानवाला याद्वारे सांगत असतो की, मानवता विसरू नका आणि निसर्गाला विसरू नका. एकू णच हा विषाणू घातकच, पण त्याच्यामुळे साध्य होणारा एकत्र येण्याचा हेतू महत्त्वाचा आहे. हे आमच्या पिढीला जास्त जवळचे वाटते.