टेस्टी टिफिन : नाचणीचे धपाटे

पाणी आणि तेल सोडून बाकीचे सर्व जिन्नस एकत्र मिसळून घ्या. पिठात थोडे थोडे पाणी घालून ते छान मळून घ्या.

(संग्रहित छायाचित्र)

साहित्य :

एक वाटी नाचणीचे पीठ, अर्धी वाटी तांदळाचे पीठ किंवा रवा, बारीक चिरलेला कांदा, हिरवी मिरची, आले. कोणतीही एक किंवा आवडतील त्या भाज्या शक्यतो पालेभाज्या किंवा किसलेले गाजर अथवा कोबी. तिखट, मीठ, साखर, पाणी, तेल.

कृती

पाणी आणि तेल सोडून बाकीचे सर्व जिन्नस एकत्र मिसळून घ्या. पिठात थोडे थोडे पाणी घालून ते छान मळून घ्या. आता तेलावर याचे छान धपाटे लावा. जर धपाटे नको असतील तर हेच पीठ थोडेसे पातळ करून त्याची धिरडी करता येतात. पालेभाज्यांमध्ये पालक, मेथी, शेवग्याची पाने अशी कोणतीही भाजी तुम्ही वापरू शकता. तसेच तांदळाचे पीठ किंवा रवा याच्याऐवजी गव्हाचे पीठ किंवा बेसनही वापरू शकता.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Nachanichi dhapate recipe