व्हर्जिन मेरी नावाचे एक प्रसिद्ध मॉकटेल आहे. त्यात वोडका या मद्याचा समावेश असतो. त्याला ब्लडी मेरी असेही म्हणतात. पेरूचा रस वापरण्यामागचे कारण म्हणजे त्याची वेगळी चव. पेरूवर मीठ, मसाला घालून तो छानच लागतो. त्याची अशी एक वेगळी चव लागते. त्यामुळेच तो मॉकटेलमध्येही छानच दिसेल. शिवाय सध्या बाजारात भरपूर पेरू दिसतही आहेत. त्यामुळे हे मॉकटेल करून पाहा.

साहित्य

*  पेरूचा रस ५०० मिली

*  सोडा – २५० मिली

*  टोबॅस्को २ चमचे

*  वुस्टरशायर सॉस – ३ चमचे

*  एका मोठय़ा लिंबाचा रस

कृती

कॉकटेल शेकरमध्ये बर्फ घालावा. त्यात सर्व साहित्य घालून ते व्यवस्थित हलवून घ्यावे. ते पुरेसे हलवून घेतल्यानंतर गाळून घ्यावे आणि वरून थोडीशी सजावट करून लगेचच प्यायला द्यावे.