टेस्टी टिफिन :  शुभा प्रभू साटम

सध्या डाएटवर अनेक जण काटेकोर लक्ष देतात. त्यामुळे अतिगोड किंवा साखरेचा वापर असलेले पदार्थ खाण्याचेही ते टाळतात. मधुमेहाची तक्रार असलेल्यांना तर साखर वज्र्यच असते. मात्र, अशा व्यक्तींना पथ्य सांभाळूनही मिठाई चाखण्याची संधी आहे. यासाठीच आज आपण ‘शुगर फ्री बर्फी/रोल’ कशी बनवायची, हे पाहू

साहित्य

खजूर, सुके अंजीर, जर्दाळू, तूप, काळे मनुके, खसखस किंवा शेंगदाणे, जायफळ पूड, वेलची पूड किंवा व्हॅनिला इसेन्स, सुका मेवा

कृती

खजुरातील बी काढून त्याचे बारीक तुकडे करून घ्या. सुके अंजीर आणि जर्दाळू यांचेही बारीक तुकडे करून किंचित तुपात परतून घ्या. यात हवे असल्यास काळे मनुकेही टाकता येतील. या सर्व जिन्नसाची एकत्रितपणे मिक्सरमध्ये भरड करून घ्या. कोणताही सुका मेवा योग्य त्या प्रमाणात घेऊन तो कोरडा शेकवून घ्या. तुम्ही शेंगदाणे किंवा खसखसही यात टाकू शकता. हे सर्व कोरडे जिन्नस वाटून त्यात वेलची पूड, जायफळ पूड किंवा व्हॅनिला इसेन्स टाकून मिश्रण करा. हे मिश्रण कोमटसर असतानाच एकत्र करून त्याचे लाडू, रोल किंवा चौकोनी बर्फीचे तुकडे करा.