scorecardresearch

खाद्यवारसा : वरई भाकरी

तांदळाची भाकरी तर आपण खातो. आज थोडी वेगळ्या प्रकारची भाकरी पाहू.

खाद्यवारसा : वरई भाकरी
वरई भाकरी

ज्योती चौधरी-मलिक

तांदळाची भाकरी तर आपण खातो. आज थोडी वेगळ्या प्रकारची भाकरी पाहू.

साहित्य  – वरीचे पीठ, थोडे तिखट, मीठ, थोडेसे दूध

कृती-एका परातीत पीठ, तिखट, मीठ घालून कालवून घ्या. त्यात दूध घाला. आता नेहमीच्या भाकरीच्या पिठाप्रमाणे पीठ भिजवा. तव्यावर टाका. फक्त नेहमीच्या भाकरीप्रमाणे वरून पाणी फिरवू नका. उलटा, चांगली शेका. तूप लावून गरम असतानाच खा. यासोबत नारळाची चटणीही छान लागेल.

मराठीतील सर्व कुटुंबकट्टा ( Kutumbkatta ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.