अनिल भागवत

माझ्यासारख्या विवेकनिष्ठ विचारसरणीच्या माणसाला लग्नसमारंभापूर्वीची तयारी म्हटल्यासरशी मनात येतं ते विवाहपूर्व समुपदेशन. त्यामध्ये लग्नाचा अर्थ समजणं, कायदेशीर बंधनांचा अर्थ समजणं, लैंगिक संबंधांविषयी नीट माहिती असणं, वैद्यकीय तपासणीचं महत्त्व समजणं असतं. प्रत्यक्षात लोक तयारी म्हणजे निराळंच काय काय करतात. कार्यालय, जेवणाची व्यवस्था, पाहुणे, निमंत्रण पत्रिका, पैशांची व्यवस्था म्हणजे लोकांच्या दृष्टीने तयारी असते.

Ashish patil shared experience of those who perform lavni and dance in women's clothes sometimes being raped
स्त्री पात्र निभावणाऱ्या पुरुषांना वेगळ्या नजरेने पाहिलं जातं; ‘लावणीकिंग’ आशिष पाटीलने सांगितला अनुभव, म्हणाला, “काहीजणांवर बलात्कार…”
Loksatta chaturang Decisive women vote in election
निर्णायक ठरणारी स्त्री-मतं!
Womens health It is need to understand mentality of pregnant women
स्त्री आरोग्य : काय असतं गर्भवतीच्या मनात?
Loksatta Chaturang women movement Miscarriage Status of Abortion Laws
स्त्री‘वि’श्व : माझं शरीर,माझी निवड!

विवाह अभ्यासमंडळात आम्ही बऱ्याच वेळा खेळतो तो खेळ सांगतो. सूत्रधाराने एक शब्द उच्चारल्यासरशी मनात जो विचार येईल तो प्रत्येकाने अगदी एक दोन शब्दात कागदावर लिहायचा. एकदा मी शब्द सांगितला ‘लग्न’. जमलेल्या निरनिराळ्या वैवाहिक अवस्थेतल्या लोकांनी बरेच शब्द लिहिले. त्यातले काही असे होते. खर्च, हनीमून, काळजी, जबाबदारी, पाहुणे, मुलं, सासुरवास, परदेश, मजा, तब्येत, दागिने, नोकरी, बापरे! त्यात ‘बापरे’ हाही शब्द होता. एवढय़ा निरनिराळ्या विचारांपैकी कोणाचाही विचार चुकीचा किंवा बरोबर आपण ठरवू शकत नाही. आपण अभ्यासक असल्यामुळे या विषयांचा अलिप्तपणाने विचार मात्र करू शकतो.

दोन महत्त्वाच्या विधानांचा इथे उल्लेख करतो. एक म्हणजे आनंद वाटल्याने तो वाढतो. दुसरं, ‘दुसऱ्याच्या दु:खात आपण सहभागी झालं पाहिजे’. पुढे भारतीय समाजाने ठरवलं की आनंद खूप गाजावाजा करून वाटायचा. मोठा समारंभ करायचा, सण, उत्सव साजरे करायचे. दु:खाचंही प्रदर्शन करायचं. माणूस वारला की अंत्ययात्रा, अंत्यविधी, दहावा, बारावा, जेवणावळी, पितरं जेवू घालणं वगैरे वगैरे. गेली १०-१५ वर्ष ‘हास्य क्लब’ नावाची लाट खूप लोकप्रिय झाली आहे. मला किंवा पत्नी शोभाला या कल्पनेचं कधी आकर्षण वाटलं नाही. हसणं ही चांगलीच गोष्ट आहे. पण ‘हास्य क्लब’मध्ये जाणारे बरेच लोक आमच्या ओळखीचे असल्याने आम्ही नक्की सांगू शकतो की, सकाळी बागेत जाऊन ‘हसून’ आल्याने त्यांच्या एरवीच्या आयुष्यातला आनंदबिनंद काही वाढलेला नाही.

तत्त्वज्ञानामध्ये असं सांगितलं आहे की, नुसतं स्वस्थ वाटणं हा रोजचा सर्वात मोठा आनंद आहे आणि तो प्रत्येक क्षणी मिळाला पाहिजे. शरीराला किंवा मनाला त्रास झाला तर दु:ख होणार हे आपल्याला समजतं. पण ती वेदना कमी झाली, संपली की त्यानंतर चालू होतो तो आनंदच. थोडक्यात काही त्रास नसण्याचा आनंद हा सर्वात मोठा आनंद आणि आयुष्यभरासाठी आहे.

प्रत्यक्षात सगळ्यांनी मिळून आनंदाची किंवा दु:खाची खरी भावना शंभर पटींने अतिशयोक्त स्वरूपात व्यक्त करण्याचा निर्णय घेतला आणि त्याची परंपरा बनवली. त्याला कर्मकांडाचं स्वरूप देऊन टाकलं. लोकांना टी.व्ही. वर दिसेल तेच सत्य आणि अनुकरण करण्याजोगं चांगलं असं वाटतं. वर्तमानपत्र वाचलं किंवा टी.व्ही. बघितला की खुर्चीवरून न हलता सबंध जगाचं ज्ञान सहज होतं आणि तेही फार स्वस्तात. त्यामुळे प्रत्येक समारंभाची कल्पना लोकप्रिय होणार हे पक्कं असतं.

लग्न करणं यामागची मूळ कल्पना समाधानी, आनंदी जीवन जगण्याचीच असते यामध्ये शंका नाही. पण खुद्द लग्न करण्याच्या दिवशी साजरं करण्याजोगं किती आणि काय असतं याबद्दल अभ्यासकाच्या नजरेतून निराळ्या गोष्टी दिसायला लागतात.

माझ्यासारख्या विवेकनिष्ठ विचारसरणीच्या माणसाला लग्नसमारंभापूर्वीची तयारी म्हटल्यासरशी मनात येतं ते विवाहपूर्व समुपदेशन. त्यामध्ये लग्नाचा अर्थ समजणं, कायदेशीर बंधनांचा अर्थ समजणं, लैंगिक संबंधांविषयी नीट माहिती असणं, वैद्यकीय तपासणीचं महत्त्व समजणं असतं. प्रत्यक्षात लोक तयारी म्हणजे निराळंच काय काय करतात. कार्यालय, जेवणाची व्यवस्था, पाहुणे, निमंत्रण पत्रिका, पैशांची व्यवस्था म्हणजे लोकांच्या दृष्टीने तयारी असते. त्या सगळ्याची नशा चढते. लग्नसमारंभात पर्यावरणाची परिस्थिती काय होते याचा विचार करण्याची तयारीच नसते. एरवी अशी व्यक्ती पर्यावरणप्रेमीदेखील म्हणवून घेते हे विशेष.

एरवी बऱ्यापैकी आधुनिक वाटणारा माणूस घरात ‘लग्न’ हा विषय निघाला की कुठचं रूप दाखवेल काही सांगता येत नाही. माझ्या दृष्टीने लग्नसमारंभाच्या नशेचा तो अंमल असतो. असा माणूस नॉर्मल राहातच नाही. बहुतेक घरांमधले ज्येष्ठ हे परंपरांचा आग्रह धरणारे असतात. वडीलधाऱ्यांच्या आग्रहामुळे आणि त्यांना न दुखावण्याच्या कल्पनेमुळे तरुणांना मोठा समारंभ करावासा वाटतो किंवा करावा लागतो. वडीलधाऱ्यांना दुखवून चालत नाही हा सगळ्यांना सर्वात जास्त ताण असतो. असा ताण येतो याचा अर्थ वडीलधाऱ्यांच्या वागणुकीत काहीतरी चूक असणार. ते धार्मिक विधींचा आग्रह धरतात. मला स्वत:ला त्यात काही तथ्य दिसत नाही. विधी म्हणजे एक प्रकारची शपथच. न्यायालयात गीतेवर हात ठेवून शपथ घेतल्याने माणसं खरं बोलत असती, तर आणखी काय पाहिजे होतं? विधी म्हटले की दुसरी कुठली तरी दैवी, किंवा बा शक्ती आपलं भलं करणार अशी त्यात कल्पना असते. त्यामुळे स्वत: काही करायचं असतं हे ध्यानातच येत नाही.

‘‘बायकोशी अमुक पद्धतीने वागेन’’ अशी शपथ घेऊन आणि हे म्हणताना विस्तवात तूप सोडल्याने किंवा फुलं वाहून किंवा पाणी शिंपडून, हाताला हात लावून, लोकांना आयुष्यभर त्याचं बंधन वाटत असतं तर सध्याचे एवढे तणावपूर्ण संसार दिसलेच नसते. सोप्या मराठीमध्ये त्या मंत्रांत काय म्हटलंय हे जर कोणीतरी समजावून सांगितलं तर ते तुलनेने जरा जास्त परिणामकारक होईल. पण स्वत: त्या गोष्टी समजून घ्यायच्या असतील तर ते त्या समारंभाच्या लग्नघाईत शक्यच नाही. उत्सुकतेमुळे मी धार्मिक विधी समजून घ्यायचा प्रयत्न केला तेव्हा कळलं की त्यात मुलीला काही अधिकारच नसतो. ती एक वस्तू समजून तिचं कन्यादान केलं जातं.

खरं तर समाधानी वैवाहिक आयुष्य घडवायचं असेल तर ते दोघांनी घडवायचं आहे. या कर्मकांडांचा आणि रूढींचा वैवाहिक समाधानाशी काही संबंध नाही. लग्नसमारंभावर होणारा खर्च योग्य का नाही हा पण वादाचाच मुद्दा आहे. अभ्यास मंडळाच्या खेळात छोटा लग्नसमारंभ करणाऱ्यांची एक बाजू असते आणि मोठा लग्नसमारंभ करणाऱ्यांची विरुद्ध बाजू असते. छोटा समारंभ म्हणजे काय आणि मोठा समारंभ म्हणजे काय यांची व्याख्या स्पष्ट केलेली असते. मग ते आपापली बाजू मांडतात.

बहुतेक जण असं म्हणताना आढळतात, ‘एकदाच लग्न करायचं तर ते चांगलं का करू नये?’ स्वत:च्या वैवाहिक आयुष्याचा अभ्यास करायची तयारी नसली तर ‘एकदाच लग्न’ हे खोटं ठरण्याची शक्यता आहे. शिवाय चांगलं म्हणजे काय हा देखील प्रश्नच आहे. नीट अभ्यास केला तर ‘एकदाच लग्न करू, साधं करू, खर्च टाळू’, हे सगळ्यात अर्थपूर्ण असतं. याउलट खर्च करणं हाच काहींचा उद्देश असतो. लग्नात भरपूर खर्च केला हे लोकांना दिसलं पाहिजे ही यजमानाची गरज असते. ‘मी यशस्वी आहे, माझ्याकडे सुबत्ता आली, मला एवढा खर्च करता येतो, परवडतो.’ हे लोकांना जाहीरपणे सांगण्याचा हा मार्ग असतो.

आणखी एक मुद्दा. अनेक वर्षांपूर्वी मी लग्नसमारंभांना जायचो हे आपण बोललोच आहोत. लग्नसमारंभात स्त्री-पुरुष असमानता दिसत नाही असा सलग एक तासही जात नाही असं माझं निरीक्षण आहे. या एका मोठय़ा कारणासाठी मुलींचा मनातून लग्नसमारंभाला विरोध असतो. ‘आम्हाला काही नको, पण लग्नसमारंभाचा खर्च मुलीकडच्यांनी करावा’ या समानतेच्या सरासरी अवस्थेत समाज आहे.

तरुण मुली म्हणतात, ‘एवढे शेकडो लोक आशीर्वाद देऊन जातात. जेवून जातात, भेटवस्तू, शुभेच्छा देऊन जातात, पण नवराबायकोचं पुढे भांडण झालं, सासरच्यांनी वाईट वागवलं तर त्यांच्यापैकी येतं का कोणी मदतीला? या मुली अगदी बरोबर बोलतायत.

आमच्या कुटुंबातल्या कोणी असा समारंभच केला नाही याचं फार बरं वाटतं. यात अगदी थोडे अपवाद मलादेखील मान्य आहेत. अगदी जवळच्या माणसांचा तेवढा अपवाद. अशा जवळच्या माणसांची संख्या अगदी कमी म्हणजे १०-१२ असली तरच मला मान्य होईल. मगच मी अशा लग्नसमारंभात हजार राहतो.

hianildada@gmail.com

chaturang@expressindia.com