जोडीदाराचा शोध अनेक र्वष घेऊन मनाजोगा जोडीदार अनेकांना सापडत नाही, असे अनेक तरुण, तरुणी आहेत. ‘मनाजोगा’ याची व्याख्या नेमकी माहीत नसल्यामुळे निर्णय घेता येत नाही. प्रत्यक्षात जबाबदारीने वागण्याचं शिक्षण आणि सारासार विचारांच्या मर्यादा या मुलामुलींनी शिकून घेतल्या तर त्यांचे प्रश्न वेळेवर सुटतील. व्यवस्थापनशास्त्र यापेक्षा निराळं काही नसतं. लग्नाच्या नात्यात तर हे व्यवस्थापनशास्त्र अत्यंत महत्त्वाचं काम करतं.

अनेक वर्षांपूर्वी अमेरिकेत बांधकामातलं व्यवस्थापनशास्त्र शिकून मी भारतात परत आलो. इथे तोच व्यवसाय करायचा, असं ठरवलं होतं. पण व्यवसाय म्हणून शिकलेलं शास्त्र मला प्रत्यक्ष वैवाहिक आयुष्यात वापरता आलं. कसं त्याच विषयी आज आपण बोलणार आहोत.

upsc exam preparation tips in marathi
UPSC ची तयारी : पर्यावरण पारिस्थितिकी, जैवविविधता
Mentally healthy Psychotherapy Mental health problems
ताणाची उलगड: मानसिकदृष्ट्या निरोगी आहोत का?
kanyadan, valid marriage,
वैध लग्नाकरता कन्यादान नाही, तर सप्तपदी महत्त्वाची !
lokrang, shekhar rajeshirke, documentary making, journey, for, nature documentaries, family contribution,
आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले: माहितीपटांचा गृहोद्योग…

व्यवस्थापनशास्त्राने सांगितलंय की, सबंध आयुष्य हे थंड डोक्याने जगण्यासाठी आहे. त्याचा अर्थ सतत विवेक वापरून एवढाच आहे. आणखी एक कल्पना आयुष्यात फार उपयोगी आहे. ती कल्पना साध्या शब्दात अशी आहे की, नीट माहिती मिळाल्याशिवाय मनाला होकाराकडे किंवा नकाराकडे झुकू द्यायचं नाही. खासकरून सांगायचंय ते जोडीदार निवडीबद्दल. बहुतेक कुटुंबं आणि खुद्द उपवर मुलगा-मुलगी चुकीच्या पद्धतीने निर्णय घेताना मला दिसतात. कोणीतरी उंचीबद्दल आग्रही असतं, कुणी पत्रिका बघण्याबद्दल, पशांबद्दल, कोणी रंगाबद्दल, चष्म्याबद्दल, जातीबद्दल. ती एक गोष्ट मनाजोगी असली किंवा नसली की ते पुढे विचार करत नाहीत. घाईने होकार किंवा नकार ठरवून टाकतात नि मग बाकीच्या गोष्टींकडे बघायला सुरुवात करतात.

याखेरीज जोडीदाराचा शोध अनेक र्वष घेऊन मनाजोगा जोडीदार सापडत नाही, असे अनेक तरुण तरुणी आहेत. ‘मनाजोगा’ याची व्याख्या नेमकी माहीत नसल्यामुळे निर्णय घेता येत नाही. अशा परिस्थितीत बधिर आणि दिशाहीन अवस्थेत एक एक दिवस काढणारी अगणित तरुण मुलं-मुली आहेत. प्रत्यक्षात जबाबदारीने वागण्याचं शिक्षण आणि सारासारविचारांच्या मर्यादा या मुलांमुलींनी शिकून घेतल्या तर त्यांचे प्रश्न वेळेवर सुटतील. व्यवस्थापनशास्त्र यापेक्षा निराळं काही नसतं. त्यातले जरूर ते मुद्दे मी आता ओळीने सांगतो.

सर्व विषयांचा एकमेकांशी संबंध असतो. कमी किंवा जास्त, पण संबंध असतोच. तो संबंध समजणं महत्त्वाचं आहे. व्यवस्थापन आणि मानसशास्त्र हे खूप जवळचे विषय आहेत. केवळ पसे मिळवण्यासाठीच्या कामाच्या जागेपुरता व्यवस्थापनाचा संबंध असतो हा गरसमज आहे. त्याचा संबंध वैयक्तिक आयुष्यातही असतो.

*  ‘आत्ताच्या आत्ता’ हा शब्द उच्चारण्याची नतिक परवानगी फक्त ‘मेडिकल इमर्जन्सी’मध्ये आणि युद्धात असते. नेहमीच्या कौटुंबिक आयुष्यात त्याला परवानगी नसते.

* बाहेर जाताना ‘कुठे चालला’ हे विचारायचं नाही. त्याचा अर्थ काय विचारायचं ते निघायच्या आधी, योग्य वेळी विचारायचं. गाडी अगदी सुटताना आयुष्याला कलाटणी देणारं वाक्य बोलणं, विमानतळावर परदेशी निघताना काही क्षण आधी विचारलेला प्रश्न, हे सगळं ‘फिल्मी’ आहे. प्रत्यक्षात त्याचा उपयोग नाही.

* अनेकवेळा हो-नाहीचा उलगडा एवढीच गरज असते. आपणहून केलेला उलगडा सर्वात उत्तम. तो झाला नाही की विसंवादाला सुरुवात होते.

* कुटुंबातल्या अधिकारांच्या स्पष्ट विभागणीला खूप महत्त्व असतं. कारखान्याच्या, ‘ऑफिस’ व्यवस्थापनात जसे कामाचे, अधिकाराचे विभाग ठरलेले असतात, तशी ती गोष्ट घरीही पाळायची असते. विभक्त कुटुंबात केवळ नवराबायको राहत असले तरीही.

* कुटुंबात जेव्हा ‘हे बोलण्याची ही वेळ नाही’ असं वाटण्याजोगे प्रसंग येतात त्याचा अर्थ अग्रक्रम समजला नाही. घाईने कुठेतरी पोहोचण्यासाठी ड्रायव्हरला नेहमीपेक्षा लवकर बोलावलेलं असताना तो उशिरा आला तर त्याला उशीर कशामुळे झाला, हे लगेच विचारण्याऐवजी लगेच निघण्याला अग्रक्रम असतो. उशिराचं कारण नक्की विचारायचं आहे, पण ते नंतर.

* आणखी एका बाबतीत माणसं चुकीचं वागतात आणि त्याला ते ‘मल्टिटास्किंग’ समजतात. लॅपटॉप वापरताना किंवा वर्तमानपत्र वाचताना दुसऱ्याला म्हणणं, ‘माझं लक्ष आहे तुम्ही बोला’ हे चूक आहे. या वागणुकीमुळे समोरच्याचा अपमान होतो.

* नवरा-बायकोत शिस्तीचं प्रमाण कमी-जास्त असणार हे उघड आहे. तरी एक कायम लक्षात ठेवण्याची गोष्ट म्हणजे जोडीदाराला किंवा इतर कुटुंबीयांना आपणहून शिस्त शिकवायला जायचं नाही. सारखी त्याच त्याच गोष्टीची आठवण करून छळायचंही नाही. स्वत: काही न बोलता शिस्त पाळली की, दुसऱ्यावर हळूहळू परिणाम होतो.

* भांबावलेले, कातावलेले आईवडील मुलांसमोर बऱ्याच वेळा भांडतात, कारण मतभेदाचा मुद्दा स्वत:च्या लक्षात राहील याची दोघांना खात्री वाटत नाही. मुद्दा लक्षात ठेवण्याची काही व्यवस्था नसते. शेवटी एकच गोष्ट उरते. आसपास कोणीही असलं तरी लगेच बोलून टाकणं, मग तो मुद्दा नीट मांडला गेला नाही तरी चालेल. पण यामुळेच गैरसमज वाढतात.

* सगळ्यांसाठी एक महत्त्वाची युक्ती सांगतो, ‘मी म्हणतो ते पटलं पाहिजे, असं बंधन नाही.’ हे वाक्य तोंडात असलं तर पटण्याची शक्यता जास्त असते.

* असंही म्हणणारे लोक मला भेटले आहेत की आता आम्ही वयस्कर झालो. यापुढे नवीन काही शिकणं आम्हाला जमणार नाही. मला बरोब्बर उलट वाटतं. वयस्करांना नोंदी ठेवायची जास्त गरज असते. स्वत:ची औषधंदेखील धड न घेणारे बरेच ज्येष्ठ मला माहिती आहेत.

* आणखी एक गम्मत सांगतो. आज मला ‘मूड’ नाही वगरे वाक्य घराघरात बोलली जातात. ‘मूड’ नाही याचा अर्थ स्पष्ट आहे. नेमकं काय करायचं ते नीट उलगडलेलं नाही आणि मुख्य म्हणजे ते काम नाही झालं तर काय परिणाम होतील, याची पुरेशी भीती वाटत नाही. तेव्हा ते टाळलेलं बरं, ही मानसिकता.

*  कुठेतरी, कशीतरी पडलेली अशी एकही वस्तू घरात असता कामा नये. ती वस्तू ठेवलेली पाहिजे. एकदा ठेवली म्हटलं की, कुठे ते ठरलेलं पाहिजे. कशी, कुठच्या क्रमाने ते सगळं पाठोपाठ आलंच.

* कागदपत्रं ही गोष्ट अशी आहे की एखाद्या कागदाची किंमत किरकोळ असू शकते, तर दुसरा एखादा कागद अमूल्य असतो. कागदाचे दोनच प्रकार असतात. फेकायचा किंवा सांभाळण्याचा. फेकायचा कागद लौकरात लौकर फेकून त्याच्या जबाबदारीतून मोकळं व्हावं. बाकीच्या सगळ्या कागदांची जातकुळी सांभाळण्याची असली, तर त्याची काहीतरी व्यवस्था हवी. कागदांची फाइल, कप्पे, कपाट, यातल्या कशातून सुटकाच नाही.

* आता अनेक मुद्दय़ांचा सारांश मांडतो. निव्वळ ‘पॉझिटिव्ह’ विचार करावा वगरे आपण ऐकतो आणि नकारात्मक विचार टाळतो. प्रत्यक्षात नकारात्मक आणि सकारात्मक या दोन्हीचं एकाच वेळी भान असणं म्हणजे ‘वास्तववादी’ हाच खरा उपयोगी विचार असतो.

* आपण प्रत्येक काम करताना स्वत:ची परीक्षा स्वत:च घेत असतो. त्या परीक्षेत आपण पास झालो की नापास, हे फक्त स्वत:ला नीट माहिती असतं. इतरांना ते माहिती नसतं. आपण जर त्या परीक्षेत पास असलो तर आपला आत्मविश्वास टिकतो. वारंवार नापास झालो तर न्यूनगंड निर्माण होतो. आपल्या परीने आपण सगळे प्रयत्न केल्याची मनातून खात्री असली की परिणामांचं अवास्तव महत्त्व राहात नाही. नशीब या पात्राची पुढच्या नाटकात खूप मोठी भूमिका आहे हे आपल्याला माहीत असतं. आपण पुरेसे प्रयत्न केले की नाही, हा खरा प्रश्न असतो. काम होवो किंवा न होवो.

* व्यवस्थापनाच्या प्रशिक्षणात एक मुद्दा प्रत्येक वेळी चच्रेला निघतो. आरडाओरडा, शिवीगाळ करणं योग्य ठरेल असा सबंध आयुष्यातला प्रसंग कुठचा? सगळे जमलेले चूपचाप बसतात. थोडक्यात, असा एकही प्रसंग आयुष्यात नसतो.

* समुपदेशनार्थीच्या दिनचय्रेत शिस्तीचा आणि जिद्दीचा अभाव ही मोठी अडचण असते. त्यांनी ‘डायरी सिस्टीम’ कशी वापरायची, हे शिकून घेणे महत्त्वाचे आहे. पूजा, ध्यान, ईश्वरभक्ती अशा मार्गाप्रमाणे व्यवस्थापन कलेचा अभ्यास आणि आचरण हा एक मार्ग आहे, ही कल्पना असू द्या. हा मार्ग लोकप्रिय नाही, पण नक्की उपयोगी आहे.

hianildada@gmail.com

chaturang@expressindia.com