|| अनिल भागवत

लग्नानंतर आपलं आयुष्य घडूही शकतं किंवा बिघडूही शकतं. पण त्याबद्दलचा निर्णय मात्र स्वत:च घ्यायला लागतो. लग्न करायचं म्हणजे दोन निराळ्या कुटुंबातली निराळ्या पाश्र्वभूमीतली दोन माणसं लग्न करताहेत याचा अर्थ विचार निराळे असणारच, हे समजायला पाहिजे. अभ्यास मंडळांमध्ये आयुष्यातल्या अनेक टप्प्यांविषयी त्यातल्या प्रश्नांविषयी आणि उपायांविषयी मोकळेपणाने बोलणे होते. तिथे तरुण आणि मध्यमवयीन असे सगळ्यांचे विचार कळतात.

chatura article on immoral relations, immoral relations in marathi
अनैतिक संबंधांना न्यायालयीन संरक्षण देता येणार नाही…
March 2024 Monthly Horoscope in Marathi
March 2024 Monthly Horoscope : मार्च महिन्यात या तीन राशींचे बदलणार नशीब? वैवाहिक जीवन, करिअर अन् आर्थिक लाभ; ज्योतिषशास्त्र काय सांगते…
Supreme Court ban Patanjali from advertising
अग्रलेख : बाबांची बनवेगिरी !
Menopause & Perimenopause
मेनोपॉज आणि पेरीमेनोपॉजचा शरीरावर कसा परिणाम होतो? महिलांनी स्वत:ची कशी काळजी घ्यावी?

‘लग्नानंतर एकमेकांसाठी’ ही मुख्य कल्पना सतत मनात ठेवून मी गेली २१ वर्ष विवाह अभ्यास मंडळ चालवतो आहे. सुरुवातीचे सभासद म्हणजे आमची लग्नाच्या वयाची दोन मुलं होती. मग त्यांची मित्रमंडळी वाढली. त्या मुलांचे आईवडील यायला लागले. या विषयाच्या अभ्यासाची माझ्यावरची जबाबदारी वाढत गेली. साधारण १०-१२ वर्षांनंतर या अभ्यास मंडळाचं अतिशय उपयोगी स्वरूप पक्कं झालं.

लग्नानंतर आपलं आयुष्य घडूही शकतं किंवा बिघडूही शकतं. पण त्याबद्दलचा निर्णय मात्र स्वत:च घ्यायला लागतो. शिक्षण, पगार, घरदार, दिसणं अशा अनेक गोष्टी बघून लग्न ठरतात, पण माणूस म्हणून एकमेकांची ओळख बहुतेक वेळेला राहून जाते. लग्न म्हणजे एक दिवसाचा सोहळा नाही. ती आयुष्यभराची दोघांनी एकमेकांना दिलेली साथ आहे. अनेकदा हे नवीन पिढीला समजत असून पालकांशी मात्र योग्य पद्धतीने संवाद होत नाही. बहुतेकांना वाटतं की परिचयातून मैत्री आणि मैत्रीमुळे लग्न असं व्हावं. ते निदान अभ्यास मंडळात शक्य आहे, असं वाटतं. इथे विचारांवर दडपण नाही आणि उपदेशांचे डोस नाहीत.

लग्न करायचं म्हणजे दोन निराळ्या कुटुंबातली निराळ्या पाश्र्वभूमीतली दोन माणसं लग्न करताहेत याचा अर्थ विचार निराळे    असणारच, हे समजायला पाहिजे. गटामध्ये आयुष्यातल्या अनेक टप्प्यांविषयी, त्यातल्या प्रश्नांविषयी आणि उपायांविषयी मोकळेपणाने बोलणे होते. लग्न म्हणजे तडजोड आणि ती बहुतेक ठिकाणी बाईलाच करावी लागते हे बरोबर नाही हे कळायला लागतं. सगळ्यांना मतं असतात आणि ती कोणावरही लादायची नाहीत हे कळायला लागतं. अभ्यास मंडळामधे तरुण आणि मध्यमवयीन असे सगळ्यांचे विचार कळतात. तरुणांना नकार शांतपणे स्वीकारण्याचा विचार कळायला लागतो. कोणीतरी आपल्याला दिलेला नकार याचा मनस्ताप होतोच, पण नकार शांतपणे स्वीकारण्याचा धडा मात्र मिळतो. अभ्यास मंडळाने तयार केलेली मुलगा आणि मुलगी यांनी भरावयाची प्रश्नावली याबद्दल सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही प्रतिक्रिया येतात. ही कल्पना आवडणाऱ्यांची संख्या जास्त आहे. पण काहींचा प्रतिवाद असा असतो की, दोन व्यक्तींचं प्रेमात पडणं यामुळे शक्य होणार नाही. पन्नास टक्क्यांच्या पलीकडे स्वत:शी सगळं जुळणारा जोडीदार क्वचित मिळतो हे नीट समजून घ्यायला हवं. लग्न याचाच अर्थ दोन व्यक्तींच्या विचारांचा मध्य काढायला लागणार हे नक्की आहे. ते कळलं नाही तर वादावादीला सुरुवात होते.

लग्न म्हणजे केळवण, समारंभ, जेवणावळी, उंची कपडे, दागिने, देणी-घेणी, मानपान, आहेर, वरात, रुखवत आणि मधुचंद्र अशीच समजूत असते. पण या सगळ्यांपेक्षा लग्नानंतरचं सहजीवन समाधानाचं जावं हे महत्त्वाचं आहे. अक्षता पडल्यामुळे, मंगलाष्टकं म्हटल्यामुळे ते होत नाही हे सगळ्यांचा अनुभव ताडून बघता आल्यामुळे स्पष्ट कळतं. अनेक प्रकारची मनाची तयारी लागते. स्त्रीपुरुष समानता कळणं, लैंगिक शिक्षणाचं गांभीर्य कळणं, पैशाबद्दलची विचारसरणी स्वच्छ असणं, स्वावलंबनाचं महत्त्व कळणं, एकमेकांशी खरं बोलण्याची सवय लागणं, या सगळ्याबरोबर त्रासदायक गोष्टींचा विचार केलेला असणं, महत्त्वाचं असतं.

अभ्यास मंडळातला एक मुलगा म्हणाला, ‘‘लग्न करण्यामागे माझा हेतू कोणाची तरी ‘कम्पॅनियनशिप’ मिळवण्याचा होता. लग्न ठरवण्यासाठी आधी स्वत:ची ओळख व्हायला हवी. त्यानंतरच दुसऱ्याकडून काही अपेक्षा करण्याचा नैतिक हक्क आहे. आमच्याबाबतीत साखरपुडा करायचा की नाही, लग्न कुठच्या पद्धतीनं साजरं करायचं, त्यासाठी खर्च किती करायचा हे सगळं आम्ही दोघांनीच ठरवलं. देणं-घेणं हा प्रकार आम्ही पूर्णपणे टाळू शकलो.’’

अभ्यास मंडळातल्या ग्रुप डिस्कशन्सने आणि अनेक मॅनेजमेन्ट गेम्सनी, शिवाय प्रश्नोत्तरांमुळे इंटरेस्टिंग पद्धतीने ज्ञान मिळतं. मला स्वत:ला त्यातल्या खूप खास वाटलेल्या गोष्टी अशा :

१) समोरच्याचे विचार आणि मतं ऐकण्याची तयारी. २) दुसऱ्यांच्या व्यक्तिस्वातंत्र्याचा आदर. ३) नात्यांमधली पारदर्शकता. ४) भावनांबरोबर व्यावहारिकतेची तयारी. या सूत्रांच्या साहाय्याने दीर्घकाळ टिकणारे कौटुंबिक संबंध बनवता येतील याबद्दल खात्री वाटते.

एका जोडप्याने आम्हाला काय सांगितलं ते सांगतो- एका कार्यक्रमामध्ये आमची ओळख झाली. विवाह अभ्यास मंडळाविषयी कळल्यामुळे आणि ते पटल्यामुळे आम्ही नियमित जात राहिलो. तिथे सबंध वर्षभरातले विषय सभासद आधीपासून ठरवतात आणि स्वत: सूत्रधार बनण्याचं प्रशिक्षण घेतात. विषयाच्या शीर्षकावरून अवघड वाटणारे विषय सगळ्यांच्या सहभागामुळे एकदम सोपे वाटायला लागतात. लोकांकडून जे विचार व्यक्त होतात त्या विचारांना कृतीची जोड लागते हे एकदम लख्ख कळायला लागलं. सामाजिक, आर्थिक आणि इतर कुठच्याही प्रकारचा भेदभाव इथे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षदेखील जाणवत नाही. आपण किती चुकीच्या गोष्टी कळत-नकळत या आधी केलेल्या आहेत हे स्पष्ट होत जातं.

एक विवाहित घटस्फोटित आणि मुलं असलेली मध्यमवयीन मुलगी म्हणते, ‘‘गटचर्चेमधून आपण वर्षांनुवर्षे चालत आलेल्या रूढी बदलू शकतो हे लक्षात येतं. अनेक लोक न्यूनगंडाने किंवा अहंगंडाने पछाडलेले असतात. त्यांना त्यातून मार्ग सापडतो.’’

एकाने म्हटले, ‘‘अभ्यास मंडळाबद्दल मला समजलं त्यामुळे माझ्या मित्रमैत्रिणींबरोबर माहिती घेण्यासाठी मी गेलो होतो. असं माझ्या लक्षात आलं की इथे भावना विचारांमध्ये कशा रूपांतरित करायच्या हे कौशल्य शिकता येते. भक्तिमार्ग लोकप्रिय आहे, पण ज्ञानमार्ग कसा असतो हे मला कळल्यावर खूप उत्साह आला आणि पुढचं आयुष्य जगण्याबद्दल मला आत्मविश्वास निर्माण झाला.’’

गटचर्चेच्या माध्यमातून स्वत:चे प्रश्न केव्हा सुटतात याचा खरं म्हणजे पत्ताच लागत नाही. एकूण आयुष्यात खूप प्रश्न असतात. त्याची साठ विषयांची यादी अभ्यास मंडळात वापरतात. त्या विषयांपैकी असा एक विषय काढून दाखवावा की ज्याचा आयुष्यात संबंध येत नाही. सूत्रधार बनण्याचं प्रशिक्षण ही गोष्ट तर खूप खास आहे. सूत्रधाराची मुख्य भूमिका ‘कॅटालिस्ट’ची असते. समुपदेशनार्थीला प्रत्यक्ष कळत नाही पण समुपदेशक अलिप्त असतो हे कळायला लागलं की थक्क व्हायला होतं. ‘रिफर्ड काऊन्सेलिंग’ हा एक कुठेही न आढळलेला समुपदेशनाचा प्रकार इथे चालतो. ज्या माणसाचा प्रश्न आहे तो माणूस यायलाच तयार नसतो. त्यामुळे त्याचा प्रश्न दुसरी हितचिंतक व्यक्ती समुपदेशकाला सांगत असते. याचा अर्थ ज्या व्यक्तीशी समुपदेशक बोलतात ती व्यक्ती प्रश्न असलेल्या दुसऱ्या व्यक्तीबरोबर जाऊन बोलते. त्यामुळे याला कॅरम बोर्ड टेक्निक म्हणतात.

याविषयी एकाने सांगितले, ‘‘साधारण वर्षभर नियमितपणे मंडळात आल्यावर विरोधी मतंदेखील शांतपणे ऐकून घेऊन त्याच्यावर विचार व्हायला लागला. लग्न या संकल्पनेचं समाजाने रंगवलेलं चित्र किती विचित्र, अवास्तव, खर्चीक आणि चुकीचं आहे याची जाणीव झाल्यावर खऱ्या अर्थाने संसाराची सुरुवात झाली. माझं वाचन भरपूर आहे, पण स्वत:च्या आयुष्याविषयी बोलणं हा अनुभव मला नवीन होता.’’

hianildada@gmail.com

chaturang@expressindia.com