22 March 2018

News Flash

भाजपपाठी भस्मासुर..

 मग तीस हजार कोटींचा आकडा आणला कुठून?

संतोष कुलकर्णी | Updated: September 18, 2017 3:02 AM

भारतीय जनता पक्ष (प्रतिकात्मक छायाचित्र )

– बाबा गुरमितसिंह रामरहीम ‘इन्सान’ यांना अटकेनंतर रोहतकला घेऊन जाण्यासाठी वापरलेले हेलिकॉप्टर अदानींचेच होते, जे नरेंद्र मोदींनी लोकसभा प्रचारादरम्यान वापरले होते..

– तीन लाख कोटींचा काळा पसा परत आलेला नसल्याचे १५ ऑगस्टला लाल किल्ल्यावरून धडधडीतपणे सांगणाऱ्या मोदींचा खोटारडेपणा पंधरा दिवसांतच उघडा पडला..

– राहुल गांधी जर घराणेशाहीचा फायदा मिळूनही अपयशी ठरलेले राजकारणी (फेल्ड डायनास्ट) असतील तर त्यांच्या अमेरिकेतील भाषणाला प्रत्युत्तर देण्यासाठी भाजपने १७ प्रवक्ते आणि १०-१२ मंत्र्यांची फौज उतरवली कशाला?

– फडणवीस सरकारने ‘गुजरातच्या बुलेट ट्रेन’ला ३० हजार कोटी रुपये दिले. त्याच पशातून मुंबई रेल्वेचा स्वर्ग झाला असता, पण काय करणार? आता मराठी माणूस गुजरातचा नोकर झालाय..

गेल्या महिन्या-दीड महिन्यात वरील पोस्ट आपल्यापैकी बहुतेकांनी नक्कीच वाचल्या असतील. त्या केवळ प्रातिनिधिक. त्या कुणाला पटल्या असतील, कुणाला नाही. कुणाला खऱ्या वाटल्या असतील, कुणाला नाही. ज्यांना खऱ्या वाटल्या, त्यांना ‘खरे’ सांगावे लागेल. बाबा गुरमितसिंह, मोदी व अदानींची संगत जोडली गेली ती ‘एडब्ल्यू १३९’ हेलिकॉप्टरमुळे. मोदींनी फक्त अदानींचीच हेलिकॉप्टर वापरल्याचे सर्वानी गृहीत धरलेय. पण वस्तुस्थिती अशी आहे, की अदानींकडे एकही हेलिकॉप्टर नाही. आहेत ती तीन ‘एक्झिक्युटिव्ह जेटस्’. ज्या दोन छायाचित्रांचा संदर्भ देऊन बाबा, मोदी, अदानींना जोडण्याचा प्रयत्न झाला, ती हेलिकॉप्टर होती ‘ऑगस्टा वेस्टलॅण्ड’ (एडब्ल्यू) कंपनीची. ‘एडब्ल्यू १३९’ हा काही त्या हेलिकॉप्टरचा नोंदणी क्रमांक नाही. ते आहे मॉडेलचे नाव. ते कोणाच्याही मालकीचे असू शकते. अधिक तपशील मिळविल्यानंतर ते ‘डीएलएफ’ या प्रख्यात बांधकाम कंपनीच्या मालकीचे असल्याचे आणि ते भाडय़ाने देण्याचा त्यांचा रीतसर व्यवसाय असल्याचे स्पष्ट झाले.

हरियाणा सरकारने त्या दिवशी ते भाडय़ाने घेतले होते आणि बाबांच्या ‘डेरा सच्चा सौदा’कडून त्याचे भाडे वसूलही केले. पण तरीही अदानींचे नाव जोडले गेले आणि बहुतेकांना ते खरेच वाटले.

असेच मोदींच्या १५ ऑगस्टच्या भाषणाचे. ‘एका खासगी संस्थेच्या अंदाजानुसार, आजपर्यंत बँकिंग व्यवस्थेत नसलेले सुमारे तीन लाख कोटी रुपये नोटाबंदीनंतर बँकिंग व्यवस्थेत आले. (त्यांपैकी) एकूण पावणेदोन लाख कोटी रुपये संशयास्पद असून त्यांची चौकशी चालू आहे,’ असे मोदी प्रत्यक्षात म्हणाले होते. पण अनेकांनी पसरवले की, ‘‘तीन लाख कोटींचा काळा पसा जप्त झाल्याचे मोदींनी सांगितले आणि त्यांचा खोटारडेपणा रिझव्‍‌र्ह बँकेने लगेच पंधरा दिवसांत उघडा पाडला!’’ ते बोलले काय, पसरविले गेले काय. वस्तुत: नंतर रिझव्‍‌र्ह बँकेने जे सांगितले, तेच मोदींनी अप्रत्यक्षपणे सूचित केले होते. बुलेट ट्रेनचे तसेच. एक लाख आठ हजार कोटींच्या खर्चापैकी ८८ हजार कोटी कर्ज आहे. मग उरतात फक्त सुमारे वीस हजार कोटी रुपये. त्यात केंद्राचा हिस्सा दहा हजार कोटींचा आणि गुजरात व महाराष्ट्राचा हिस्सा प्रत्येकी पाच हजार कोटींचा. म्हणजे महाराष्ट्राला प्रत्यक्षात पाच हजार कोटी रुपये द्यावे लागणार.

 मग तीस हजार कोटींचा आकडा आणला कुठून?

८८ हजार कोटींच्या कर्जामध्ये महाराष्ट्राच्या हिश्शाला २५ टक्के बोजा येणार असल्याचे मान्य केल्यास मुद्दल, कर्जाचा हिस्सा व त्यावरील व्याज मिळून सुमारे २५ ते २८ हजार कोटींपर्यंत रक्कम जाऊ शकते.  पण हे सांगताना मुद्दाम विसरले जाते की, २० ते २२ हजार कोटींच्या कर्जाची परतफेड पन्नास वर्षांच्या कालावधीत करायचीय. आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचा मुद्दा असा, की बुलेट ट्रेनच्या महसुलात, नफ्यातही महाराष्ट्राचा हिस्सा २५ टक्के राहणारच आहे. पण जणू काही असे चित्र निर्माण केले गेले की, महाराष्ट्राच्या खिशातील तीस हजार कोटी लगेचच गुजरातच्या घशात घातले गेले.

राहुल गांधींच्या बर्कलेतील भाषणाला प्रत्युत्तर देण्यासाठी भाजपने १७ प्रवक्ते व १०-१२ मंत्री उतरविण्याइतका दुसरा हास्यास्पद दावा असू शकत नाही. मुळात भाजपमध्ये अधिकृतपणे १७ प्रवक्ते नाहीत. पण सरकार कोणाचेही असो, मंत्री दिसला की पत्रकारांची झुंड त्यांच्यामागे धावत असते. दोन-तीन डझन वृत्तवाहिन्यांना त्यांचा स्वतंत्र बाइट हवा असतो आणि हे दररोज कोणत्याही मुद्दय़ावर घडत असते. भाजपकडून अधिकृत प्रतिक्रिया दिली ती फक्त केंद्रीय मंत्री स्मृती इराणींनी. एक-दोन डझन वृत्तवाहिन्यांवर दररोज चर्चाचे कार्यक्रम असतात. त्यात सर्वच पक्षांचे प्रवक्ते, नेते असतात. अगदी फुटकळ विषयांवरही ही मंडळी तावातावाने बाजू मांडत असतात. त्यामुळे राहुल गांधी यांना प्रत्युत्तर देण्यासाठी भाजपने ‘नेत्यांची फळी’ उतरविल्याचा दावा नुसताच पोकळ नाही, तर मनोरंजन करणारा आहे.

दिल्लीतील पत्रकार स्वाती चतुर्वेदींनी ‘आय एम अ ट्रोल’ हे भाजपच्या ‘डिजिटल आर्मी’च्या कारवायांचे पितळ उघडे पाडणारे पुस्तक लिहिले. त्यात मोदींना २०१४ साली जिंकून देणाऱ्या आणि त्यानंतर अश्वमेधाची घोडदौड चालूच ठेवण्यासाठी मदतगार ठरलेल्या भाजपच्या भाडोत्री सायबर सनिकांची तपशीलवार माहिती आहे. त्याचबरोबर सामाजिक माध्यमांवर विष पेरणाऱ्या, विद्वेष माजविणाऱ्या आणि अफवा पसरविणाऱ्या काही जल्पकांना (ट्रोल्स) दस्तुरखुद्द मोदी फॉलो करीत असल्याचेही त्यांनी दाखवून दिलेय. पण असे भाडोत्री ट्रोल्स आता सर्वच पक्षांनी पाळलेत. पण मोदींवरील ‘भक्ती’पोटी स्वयंस्फूर्तीने वाह्य़ातगिरी करणाऱ्या ‘अनपेड ट्रोल्स’शी मोदींचा सदोदित द्वेष करणारे ‘अनपेड ट्रोल्स’देखील तितक्याच स्वयंस्फूर्तीने दोन हात करू लागलेत. या अगोदर उल्लेखलेली चार प्रातिनिधिक उदाहरणे नव्याने ऊर्जा गवसलेल्या मोदीविरोधकांच्या ‘ट्रोलगिरी’शिवाय दुसरे काय असू शकते?

हे ‘ट्रोल’ काय करतात? खऱ्याचे खोटे, आकडय़ांची मोडतोड, विधानांचे बदलायचे संदर्भ, लिहायच्या धडधडीत खोटय़ानाटय़ा गोष्टी. दीड-दोन महिन्यांपासून सायबरविश्वात विरोधकांनी चालविलेल्या आक्रमक मोहिमेने भाजप गोंधळलाय. सामाजिक माध्यमांवरील भाजपविरोधी प्रचाराला बळी न पडण्याचे आवाहन अमित शहांना जाहीरपणे करायला लागते, यातच सर्व काही येते. आज सरकारला तीन वर्षे पूर्ण झाल्यानंतर विरोधकांचे आक्रमक ‘ट्रोलिंग’ भाजपला काटय़ासारखे बोचत असेल; पण मोदी आणि भाजपच या भस्मासुराचा जनक आहेत. सामाजिक माध्यमांची ताकत ओळखणारा मोदी पहिला नेता. या विश्वावर त्याचे साम्राज्य आजही अबाधित. सामाजिक माध्यमांवर झंझावात करून निर्माण झालेल्या लाटेवर ते स्वार झाले. मोदीप्रतिमासंवर्धन अन् विरोधकांचे प्रतिमाभंजन करून जनमताला हवा तसा आकार देणे ही भाजपच्या ‘ट्रोल’ची उद्दिष्टे. त्यात त्यांना अभूतपूर्व यश मिळाले. तोपर्यंत विरोधक गाफीलच होते. प्रचाराची त्यांची तंत्रे अजूनही जुनी होती. मोदींनी या ‘नव्या भारता’चा फायदा उचलला आणि सर्वाना मागे टाकले. मात्र उशिरा का होईना, विरोधक सामाजिक माध्यमांवरील लढाईमध्ये शड्ड ठोकून उभे राहिले आणि बघता बघता काही महिन्यांपासून ते भाजपला पुरून उरल्याचे दिसतेय.

जिथे भाजपच्या ‘सायबरसन्या’ची हुकमत, त्याच सामाजिक माध्यमांकडे ‘दुर्लक्ष करा’ असे सांगण्याची वेळ शहांवर आली म्हणजे काळाने उगविलेला सूडच म्हणायला हरकत नाही. जिथे फुले वेचली, तिथे काटे टोचण्याची वेळ आल्याचा हा काव्यगत न्याय. सामाजिक माध्यमांच्या धास्तीची शहांना जाणीव होण्याचे कारण म्हणजे गुजरातमध्ये भलतीच लोकप्रिय झालेली ‘विकास पागल हो गया’ ही सायबर मोहीम. ती काँग्रेसची मोहीम. विकासाचे मॉडेल म्हणून दाखविले जात असलेल्या मोदींच्या गुजरातमधील विकासाचे पोकळ दावे दाखविणारी ती तिरकस, टोकदार मोहीम. ‘पागलविकास’ या एका हॅशटॅगने काँग्रेसच्या जिवात जीव आला, तर भाजप धास्तावलाय. आरक्षणासाठी पटेलांचे आंदोलन, गोरक्षकांच्या धुडगुसाने दुखावलेला दलित आणि सरकारविरोधी जनमताच्या (अँटी इन्कम्बन्सी) शक्यतेची चिंता सतावत असतानाच ‘पागलविकास’ भाजपच्या मागे हात धुऊन लागलाय. त्यामुळेच शहांना आपल्याच नेत्याने निर्माण केलेला भस्मासुर पक्षावर उलटण्याची भीती वाटत असावी. भस्मासुर का? भाजपचे काही ‘स्वयंस्फूर्त ट्रोल’ आता हाताबाहेर गेलेत. ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येचे निर्लज्ज समर्थन करण्यापासून ते विरोधी विचार मांडणाऱ्यांना जिवे मारण्याच्या धमकीपर्यंत त्यांची मजल गेलीय. त्यांना रोखणे आता भाजपच्या हातातही राहिलेले नाही. बाटलीतून बाहेर काढलेल्या ‘भुतां’ना पुन्हा बाटलीबंद करणे अवघड बनलेय. मध्यंतरी एका विरोधी नेत्याने म्हटले होते, मोदींपेक्षा त्यांचे ‘भक्त’च अधिक डोक्यात जातात. खरेच आहे ते. राजापेक्षा आंधळे भाट अतिधोकादायक. याची जाणीव भाजपला झालीय. नाही तर सायबरविश्वासारख्या घरच्या मदानावरून पळ काढण्याचा विचार भाजपच्या मनाला शिवला तरी असता का?

पेरले तेच उगवल्याची शिक्षा भाजपला मिळू लागलीय. तोडीस तोड बनलेल्या विरोधकांच्या ‘ट्रोल्स’नी त्यांना सळो की पळो करून सोडलेय. पण भाजपचा भस्मासुर भाजपवरच उलटू लागल्याने विरोधकांनी हुरळून जाण्याचे कारण नाही. भाजपला हा धडाच आहे; पण विरोधकांनाही दोन शहाणपणाचे शब्द सांगायला हरकत नाही. कारण भाजपच्या खोटेपणाला ते आणखी खोटेपणाने प्रत्युत्तर देऊ पाहत आहेत. अफवांचे, वस्तुस्थितीच्या विपर्यासाचे आणि खोटय़ा प्रचाराचे जीवन क्षणभंगुर असते. याउलट, विश्वासार्हता दीर्घकालीन असते. एकदा का विरोधकांच्या ‘ट्रोलिंग’ची विश्वासार्हता कमी झाली, की त्यांची गत भाजपसारखी होऊ शकते. त्यापेक्षा वस्तुस्थिती, अभ्यासपूर्ण विवेचन आणि वैचारिक आधारांवरील विरोध अधिक विश्वासार्ह ठरेल. भाजपला तर ठेच लागलीच आहे; पण विरोधकांनीही त्यापासून शहाणपणा घ्यायला हरकत नाही.

 

संतोष कुलकर्णी

santosh.kulkarni@expressindia.com

First Published on September 18, 2017 2:54 am

Web Title: bjp used social media for election campaign
 1. S
  sudhara
  Sep 19, 2017 at 6:30 pm
  एकाने गाय मारली म्हणून दुसरयाने वासरू मारू नये
  Reply
  1. S
   S K Kulkarni
   Sep 19, 2017 at 8:56 am
   Nothing is true, Indians know who is right.
   Reply
   1. विनोद
    Sep 18, 2017 at 11:01 pm
    साेमनाथ हा प्राणीमित्र आहे की स्वतः एक जनावर आहे ? फारच उत्कृष्ट उपमा असतात त्याच्या प्रतिक्रीयेत ! जनावरांच्या आणी विवीध आजारांच्या !
    Reply
    1. J
     JaiShriRam
     Sep 18, 2017 at 9:57 pm
     विरोधकांच्या ट्रोल्स चा खोटेपणा संतोष कुलकर्णी यांनी आज जसा एवढ्या धडाडीने उघडा पडला त्याबद्दल त्यांचे अभिनंदन.....पण अश्याच धडाडीने भाजपच्या ट्रोल्स चा खोटेपणा पूर्वी कधी उघडा पाडलेला वाचनात आला नाही ....तसे झाले तर ते अधिक अभिनंदनीय होईल ....बाकी सत्ताधारी असो वा विरोधक ....न्याय , समता , , विश्वसार्हता ह्याचा मान राखला गेलाच पाहिजे.
     Reply
     1. S
      Somnath
      Sep 18, 2017 at 8:33 pm
      लोकसत्ता सुद्धा शिंक आल्यासारखी विनोद नावाच्या मर्कटला बाजूला करते तरी हे टिनपाट कोणतीही प्रतिक्रिया न देता हुंगत फिरत असत बिनपगारी लाचार श्वानची अवस्था बघवत नाही. हाड म्हटलं तरी कुत्रा हाड टाकत पण काही पाळलेली श्वान ती आवडीने चघळत असतात कारण अंगवळणी पडलेली फेकलेल्या तुकड्यावरची लाचारी.
      Reply
      1. S
       Shyamrao Laturkar
       Sep 18, 2017 at 5:11 pm
       बरखा, राजदीप, निधी, निखिल, केतकर हे सगळे टीव्ही ट्रोल्स नव्हते कि काय. बाहेर सेक्युलॅरिसम चे भजन लावून आत भ्रष्टाचाराचा तमाशा चाललेला होता तो जनतेला पुरता लक्ष्यात आला होता. तसाच सध्याचा सोशल मीडिया वरचा खोटारडेपणा लोकांना लगेच कळतो. कोणीही चिंता करू नये.
       Reply
       1. R
        rmmishra
        Sep 18, 2017 at 3:07 pm
        खोटेपनातुनच भाजपाचा जन्म झाला, त्याच्या बापाचा म्हनजे RSS चा जन्मसुद्धा खोटेपनातुनच झाला। हे कधितरि खोटेपना करने सोडतिल काय?
        Reply
        1. S
         Shriram
         Sep 18, 2017 at 1:45 pm
         तू जपून टाक पाऊल जरा, दिल्ली मधल्या किल्लेदारा . संतोष कुलकर्णी हे लोकसत्ता मधले विदुर का नाना पटोले? त्यांचे सत्याचे प्रयोग त्यांना भारी पडणार की एक्सप्रेस ग्रुप आता ' गुड काॅप, बॅड काॅप ' पाॅलिसी राबवणार त्याची ट्रायल चालू आहे ?
         Reply
         1. R
          rajendra
          Sep 18, 2017 at 1:12 pm
          ह्या ट्रोलप्रकरणामध्ये लोकसत्ताकार प्रामुख्याने भागी होते, आहेत व असा कर्मदरिद्रीपणा करीतच राहातील अशी खात्री वाटते !!
          Reply
          1. N
           Nilesh
           Sep 18, 2017 at 12:50 pm
           अतिशय छान विश्लेषण - संतोष कुलकर्णी.
           Reply
           1. V
            Vijay
            Sep 18, 2017 at 12:14 pm
            तडीपार अमित शाह कडून लोकसत्ताच्या डायरेक्टर ला धमकीचा फोन आला हे खरं आहे का ????? नाही म्हटलं भक्तांप्रमाणे थुंकले पटापट चाटून घेतले म्हणून विचारलं....
            Reply
            1. K
             kiran
             Sep 18, 2017 at 12:08 pm
             अरेरे एक पण कंमेंट नाही .....कुठे गेले ट्रॉल वाले.....
             Reply
             1. A
              Akshay
              Sep 18, 2017 at 11:35 am
              संघोट्या संतोष कुलकर्णी इतके ३ वर्षे झाक मारत होता का? ज्या वेळेस संघोटे पत्रकार भाजपसाठी ट्रॉल करत होते त्या वेळेस सर्व चड्डीत चूप बसले होते आता संघोट्यावर त्याचा प्रयोग चालू झाला कि त्यांना सावध करण्याचे कार्य वेळोवेळी संघोटे लोकसत्ता पत्रकार करत असतात.कमीत कमी खऱ्या गोष्टींवर तर विरोधी पक्ष ट्रॉल करीत आहेत. संघोट्या चड्डीत बसून चड्डी पत्रकाराने हे सुद्धा सांगून टाकले कि राहुल गांधींसाठी टाकलेल्या पोस्ट मध्ये मनोरंजनात्मक लिहिले होते आता तुमच्या सारख्या सुपारी बहाद्दर पत्रकाराने हे लिहिले त्या मुले तुमच्या सारखे मठ भक्त आहे तोपर्यंत मनोरंजनाची कुणालाच चिंता नाही. चायवाला या ट्रोल्स ची मीटिंग घेतो त्या वेळेस आपण कुठे त्या मीटिंग ला जाऊन बसून पैसे घेता कि चायवाल्यासोबत फोटो काढून घेता
              Reply
              1. V
               vivek
               Sep 18, 2017 at 11:33 am
               मार्मिक लेख Social mediatlya अंधभक्तांनी तर गोबेल्सला कधीच मागे टाकलेय. खोटी माहिती, अपप्रचार, धार्मिक भावना भडकवणे, प्रतिमा निर्मिती, प्रतिमाभंजन, केले व आताही चालूच आहे.हे सर्व ठरवून केले गेले परंतु ज्यांना त्याचा फायदा झाला त्याचा तोटाही होईल हे मात्र विसरले.
               Reply
               1. K
                kailas
                Sep 18, 2017 at 11:33 am
                लेखकाने मोदी, शहा आणि भाजपचा छान बचाव केला आहे. लेखक आधी पुण्यातील एका वृत्तपत्रात काम करीत होते. ते व्यवसायाने पत्रकार असले तरी मूळ पार्श्वभूमी आ.एस.एस.ची आहे. त्यामुळे त्यांच्याकडून काही वेगळे अपेक्षित नाही.
                Reply
                1. विनोद
                 Sep 18, 2017 at 11:14 am
                 हा लेख बापटने लिहीलाय की शहाताईंनी ? साेम्याने नक्कीच नाही ! कारण लेखात 'आेकारी' शब्द नाही. उम्याने नक्की नाही ! कारण त्याची 'कावीळ' यात दिसत नाही !
                 Reply
                 1. G
                  Giri
                  Sep 18, 2017 at 11:00 am
                  सुंदर लेख
                  Reply
                  1. Shriram Bapat
                   Sep 18, 2017 at 10:05 am
                   समाजमाध्यमांवर हिरीरीने प्रचार करणारे स्वयंस्फूर्त अनपेड ट्रोल आता भाजपाप्रमाणे विरोधी पक्षीयांकडेही असल्याचे दिसू लागले आहे. पण एकदा का विरोधकांच्या ट्रो ची विश्वासार्हता कमी झाली की त्यांचीही गत भाजपासारखी होऊ शकते असे कुलकर्णी म्हणतात. भाजप समर्थक म्हणून ा हे घडू नये असे वाटते कारण आत्ता भाजपच्या पाचही नसल्या तरी चार उंगल्या घी मध्ये आहेत. तेव्हा विश्वासार्हता कमी झाल्याने विरोधकांची गत भाजपासारखी होण्यासाठी भाजपच्या काही उंगल्या घी मधून बाहेर काढाव्या लागणार तेव्हा माझी देवाकडे हीच प्रार्थना की विरोधकांच्या ट्रो ची विश्वासार्हता टिकू दे. उदाहरणार्थ लोकसत्तामधील,विरोधकांच्या प्रतिक्रियांचा दर्जा इतका नजरेत भरण्यासारखा असतो की न्यूट्रल वाचकांना आपले मत बनवणे सोप्पे जाते. तेव्हा आपल्या 'सोनू तुला भरवसा नाय काय' प्रमाणे ' ा विकास' लोकप्रिय झाला तर काही दिवसांनी लोक तो विसरतील हे बरे नाही . मराठीत येत असलेल्या प्रतिक्रियांवरून मोदींचा दारुण पराभव होऊन प्रामाणिक आणि कणखर नेतृत्वाचे काँग्रेसी सरकार येणार हा स्वागतार्ह भाग आहे. विश्वासार्हता टिकावी हीच इच्छा.
                   Reply
                   1. R
                    Rajan Patil
                    Sep 18, 2017 at 9:55 am
                    अगदी बरोबर आहे. भाजपसाठी भस्मासुरच असणार आहे येणारा काळ. गेल्या तीन वर्षांमध्ये लोकांच्या दैनंदिन व्यवहारामध्ये कुठेच अच्छे दिन दिसून आले नाहीत. जे अच्छे दिन आले ते न्युज चॅनेल आणि ठराविक पत्रकार आणि त्यांचे पेपर यांचे हे आता सामान्य जनता रोजच्या पेड न्युज पाहून समजू लागली आहे. रोज वाढणारे पेट्रोल, डिझेल आणि गॅस चे भाव बघितले तर सामान्य गृहिणीने का म्हणून मोदी सरकारवर पुढील निवडणुकीत विश्वास ठेवावा. त्यात भर म्हणजे बुलेट ट्रेन चे मोदी सरकारला २०१९ च्या लोकसभेमध्ये घाम फोडणार आहे एवढे नक्की. आज वेस्टर्न, सेंट्रल, हार्बर ह्या स्टेशन्स ची अवस्था बघितली तर लोक आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करतात. ना वशरूमची सोय मग बुलेट ट्रेन रुपी हा पांढरा हत्ती का पोसला जात आहे मूठभर धनधांडग्यांसाठी.
                    Reply
                    1. S
                     Somnath
                     Sep 18, 2017 at 9:05 am
                     काँग्रेसच्या दिग्गज व मंत्रिपद उपभोगलेल्यानी देशाच्या पंतप्रधानविषयी अपशब्द वापरावेत हि कोणती ‘ट्रोलगिरी’काँग्रेसने आत्मसात केली.निवडणूक जिंकण्यासाठी पदरी किशोरप्रधानला ठेवले म्हणून निवडणूक आपसूक जिंकता येतात हे राहुलबाळाच्या खाटसभानि सिद्ध केलेच आहे.भाजपने जे काही पप्पूवरती व मौनीबाबाचा उल्लेख केला त्यात जनतेला तथ्य दिसली आणि अजूनही पप्पू त्याला खतपाणीच घालत आहे.जण गण मन महंतांनी मोदी एक पाऊल पुढे गेले या सारखे टिनपाट प्रकार सडक्या मेंदूच्या मनीष तिवारीने करावे असली ट्रॉलगिरी करणारे विरोधक अजूनच संकटात सापडत जाणार.ह्या लेखाने असा प्रश्न निर्माण केला कि पत्रकारिता सुद्धा ट्रॉलगिरीचाच एकभाग तर नाही ना? कारण हल्ली निपक्ष पत्रकारिता काय असते याचा शोध घ्यावा लागतो. निदान लेखात अति काँग्रेसप्रौढी (कुबेरी) दिसत नाही बाकी बऱ्यापैकी विवेचन करणारा लेख.
                     Reply
                     1. उर्मिला.अशोक.शहा
                      Sep 18, 2017 at 8:28 am
                      वंदे मातरम- कुलकर्णी यांनी अनपेक्षित पणे भाजप चे वकीलपत्र घेतले सारखे वाटते इन्फॉर्मशन कॅम्पेन मिस इन्फॉर्मशन कॅम्पेन यातील फरक जनतेला कळतो म्हणून तर ढोंगी धर्मनिरपेक्षवाद्यांचा फुगा फुटला आता जमाना बाप दाखव नाहीतर श्राद्ध कर चा आहे जनता हुशार आहे. जे संतोष कुलकर्णींना कळले ते कदाचित संपादक महोदयांना कळले नसावे मुळात शक्ती एकवटायला पाच बोटे एकत्र यावी लागतात तर वज्र मुठ्ठी तर मोदी ला शह शक्य जितकी डोकी तितके नेते म्हणजे बेसुरी बासुरी.साठ वर्षत जनतेचा विश्वास कमावू शकले नाहीत आणि भाजप ने तीनवर्षात जादू ची कांडी फिरवावी हा आग्रह? आर्थिक सुधारणा होतीलच पण त्याला थोडा वेळ द्यावा लागेल अठरापगड जाती धर्मांचा हा देश बदलाव व्हायला वेळ हा लागणारच यात चलाखी बदमाशी ला वाव नाही जनते च्या कलाने सर्व काही सुरळीत होणार आहे फक्त मीडिया ने प्रामाणिक मूल्यांकन करावे या ग ते र हो
                      Reply
                      1. Load More Comments