23 January 2018

News Flash

भाजपचे ‘उत्तर दक्षिण’

दोघांचीही भाजपशी वाढती जवळीक.

संतोष कुलकर्णी | Updated: May 29, 2017 11:50 AM

रजनीकांत (संग्रहित छायाचित्र)

मोदी सरकारला तीन वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने मागील आठवडय़ात सुरू असलेल्या कोलाहलामध्येसुद्धा दोन ठळक व्यक्तिमत्त्वे चर्चेत राहिली. त्या दोघांमध्ये तसा कोणताच संबंध नाही. एक उत्तरेतील, दुसरा दक्षिणेतील. एक लोकप्रिय मुख्यमंत्री, तर दुसरा जबरदस्त लोकप्रिय अभिनेता. आपल्याला पडलेली पंतप्रधानपदाची स्वप्ने प्रत्यक्षात उतरणे अवघड असल्याची एकाला होत असलेली जाणीव आणि दुसऱ्याला कदाचित लागलेले मुख्यमंत्रिपदाचे वेध.. पण या दोघांमधील एक समान धागा म्हणजे दोघांचीही भाजपशी वाढती जवळीक.

एव्हाना या दोघांची नावे लक्षात आलीच असतील.  बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार आणि तामिळ सुपरस्टार रजनीकांत ही ती नावे. २०१९ मधील लोकसभेचे पडघम वाजत असताना राजकीय क्षितिजावर ही दोन नावे वेगाने घोंघावू लागलीत.  या दोघांमध्ये दोन टोकांवरील दोन राज्यांची सगळीच गणिते बदलवण्याची क्षमता आहे. म्हणून तर त्यांच्या हालचालींनी सर्वाची उत्सुकता ताणलीय.

नितीशकुमार भाजपच्या जवळ जात असल्याची चर्चा राजधानीत पूर्वीपासूनच आहे. तिला खतपाणी मिळाले ते नितीश आणि अमित शहांमध्ये दिल्लीजवळील फार्महाऊसमध्ये झालेल्या कथित भेटीने. भेटीची कहाणी खरीखोटी माहीत नाही, पण एक गोष्ट खरी की तेव्हापासून नितीश यांच्या भूमिका बदलल्या. त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे नोटाबंदीचे समर्थन. सारे विरोधक त्याविरुद्ध मैदानात उतरले असताना नितीश ठाम राहिले. पुढे उत्तर प्रदेशातील भाजपच्या विजयानंतर विरोधकांनी ‘ईव्हीएम’वर शंका घेतल्या, तेव्हाही नितीश ‘ईव्हीएम’च्या बाजूने उतरले. लालूंच्या कुटुंबीयांवरील लागोपाठच्या आरोपांनंतर नितीश यांचे वक्तव्य धक्कादायक होते. कारवाई करण्याचे ते सरळसरळ केंद्रालाच सुचवीत होते आणि नेमके त्याच्या दुसऱ्याच दिवशी प्राप्तिकर खात्याने एक हजार कोटी रुपयांच्या बेनामी मालमत्तांप्रकरणी छापेही घातले. लालूंना हा धक्काच होता. त्यांचा इतका जळफळाट होता, की ‘नवा मित्र भाजपला लखलाभ असो’ ही त्यांची पहिली प्रतिक्रिया होती! पण नंतर महाआघाडी खंबीर असल्याची सारवासारव त्यांना करावी लागली. पण तोपर्यंत जायचा तो संदेश गेला होता. नितीश यांनी महाआघाडीला खरे तोंडघशी पाडले ते सोनियांनी बोलाविलेल्या १७ विरोधी पक्षांच्या बैठकीला दांडी मारून. त्यांची अनुपस्थिती एक वेळ ठीक होती; पण त्यांचं अगदी दुसऱ्याच दिवशी मोदींना भेटणं म्हणजे जखमेवर मीठ चोळण्यासारखं. आणि वर म्हणाले, बिहारसाठी भेटलो! नितीश यांच्या चालींनी काँग्रेस आणि लालूंची तोंड दाबून बुक्क्यांचा मार अशी पंचाईत केलीय. दिवसेंदिवस भाजपकडे झुकणारा नितीश यांचा ‘बोल्ड’पणा तर खुपतोय; पण त्यांना डिवचण्याची हिंमत नाही. कारण त्यांनी रामराम केल्यास महाआघाडीला नमनाअगोदरच अपशकुनाची भीती. धरलं तर चावतंय, सोडलं तर पळतंय.

मोदी, शहा यांना धूळ चारण्याच्या पराक्रमानंतरच्या दोन वर्षांतच नितीश यांना लालू व काँग्रेस का नको वाटायला लागलीय? नितीशकुमारांच्या संयुक्त जनता दलाचा एक दिल्लीनिवासी ज्येष्ठ नेता अनौपचारिक गप्पांमध्ये सांगत होता.. ‘‘आम्ही लालू आणि काँग्रेससोबत खूश नाही. केवळ नाइलाजाने आम्हाला त्यांच्यासोबत जावे लागले होते. दोन वर्षांनंतर आम्हाला जाणवतंय की काँग्रेसपेक्षा भाजप कधीही बरा. कारण तो अजूनही कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. पण इतकी वाईट स्थिती ओढवूनही काँग्रेसमधील सरंजामशाही नाही संपलेली.’’ त्याचे नैराश्य आणखी व्यक्त होत होते.

दोन दशके भाजपशी घट्ट मैत्री असणारे नितीश लोकसभेतील मोदी लाटेच्या धसक्यानंतर लालू आणि काँग्रेससोबत गेले; पण ते मनाविरुद्ध, नाइलाजाने. कारण नितीश आणि लालूंच्या राजकारणाचा पोतच परस्परविरोधी. नितीश हे स्वच्छ प्रतिमेचे, पण लालू बेबंद. नितीश मध्यमवर्गीयांना- मध्यमजातींना साद घालणारे, पण लालूंचा धुडगूस यादवांच्या ताकदीवर. भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाचा फारसा हस्तक्षेप नसायचा, पण लालू थोडेच गप्प बसणारे? त्यातच आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे लालूपुत्र आणि उपमुख्यमंत्री तेजस्वीची वाढती लोकप्रियता. अगदी नितीश यांच्या उपस्थितीमध्येही या तरुण नेत्याभोवती पडणारा गराडा पाहून नितीश यांसारख्या राजकारण्याला आतून अस्वस्थ वाटल्यास नवल नाही. खरे तर लालू राजकीयदृष्टय़ा जवळपास संपले होते; पण नितीश यांच्या प्रतिमेचे शेपूट पकडून ते सत्तेच्या तंबूत शिरले आणि बघता बघता डोईजड झाले. म्हणून तर तंबूत उंट घेतल्याचा पश्चात्ताप नितीश यांना आता होतोय आणि त्यातूनच लालूंपेक्षा भाजप बरा असल्याच्या निष्कर्षांपर्यंत ते पोचलेत. उत्तर प्रदेशाच्या निकालानंतर पंतप्रधानपदाचे स्वप्न तूर्त तरी अवास्तव असल्याची जाणीव त्यांना झाली असावी. त्यांनी तसे बोलूनही दाखविले. जर २०१९ नंतर पंतप्रधानपद ‘रिक्त’ होण्याची शक्यता कमी असताना मग आहे ते मुख्यमंत्रिपद टिकविण्यातच अधिक शहाणपणा आहे आणि मग त्यासाठी लालूंपेक्षा भाजप कधीही परवडला, असे त्यांना वाटल्यास आश्चर्य नाही. दुसरीकडे नितीश परतल्यास मोदींच्या पंतप्रधानपदासमोरील एक मोठे ‘आव्हान’ आपोआपच संपुष्टात येईल. खरे तर नितीशबद्दल भाजपमध्ये ‘सॉफ्ट कॉर्नर’ पहिल्यापासूनच आहे. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याची स्थिती असतानाही नोटाबंदीला दिलेल्या पाठिंब्याने तर ते भाजपाईमध्ये एकदम हिरो झाले. त्यामुळे झाली तर त्यांची ‘घरवापसी’ भाजपला हवीच आहे. अजून एक.. नितीशना लालूंची गरज नाही. ते भाजपच्या मदतीने केव्हाही सरकार स्थापू शकतात. सारांश ‘विन विन सिच्युएशन’ आहे ही नितीश आणि भाजपसाठी. देश तुमचा, बिहार माझे!

तिकडे तामिळनाडूही ‘सर रजनीं’च्या आगमनाच्या चर्चेने पुरतं ढवळून निघालंय. एकीकडे ‘रासिकर मंत्रम’ची (फॅन क्लब्ज) मोठी लगबग आणि दुसरीकडे रजनीकांत यांच्या घरासमोर कट्टर तामिळवाद्यांची निदर्शने. त्यांचे मूळचे तामिळ नसणे आताच डाचायला लागलंय काही जणांना. गेल्या काही दिवसांतील त्यांची वक्तव्येही (‘‘मी कधी येईन, कसा येईन हे कोणालाच सांगता येणार नाही. पण गरज निर्माण झाल्यास मी नक्की येईन.. अंतिम युद्ध छेडल्यास आपण ते पाहालच.’’) प्रस्थापितांच्या तंबूत साप सोडणारी. तामिळनाडूचे राजकारण आजपर्यंत कायम द्रमुक आणि अण्णाद्रमुक या दोघांभोवती फिरतंय. पण रजनीकांतच्या आगमनाने तिसरा कोन तयार होऊ  शकेल? जयललितांच्या निधनानंतर अण्णाद्रमुकची झालेली शकले, द्रमुकचे भीष्माचार्य करुणानिधींचे राजकीय पडद्यावरून जवळपास दूर होणे, अशा संधीकाळच्या परिस्थितीमध्ये रजनीकांत राजकीय पोकळी भरून काढतील? मोदी आणि भाजपकडील ओढा त्यांनी कधीच लपविला नाही. पण एकंदरीत ते भाजपच्या कळपात जाण्याऐवजी नवा पक्ष काढण्याची शक्यता अधिक. कारण भाजपची विचारधारा तामिळनाडूसाठी एकदम ‘परग्रहा’एवढीच दूरची! कन्याकुमारीजवळचे ‘बेट’ वगळता भाजपला तामिळनाडूमध्ये कधीच रुजता आलं नाही. रजनीकांतच्या लोकप्रियतेवर स्वार होऊन तिथं घुसण्याचे भाजपचे मनसुबे आहेत; पण ते व्यवहार्य नसल्याची जाणीव स्वत: भाजपलाही आहे. म्हणून भाजपच्याच काही नेत्यांनी नव्या पक्षाचा किंवा थेट अण्णाद्रमुकला गिळंकृत करण्याचा सल्ला रजनीकांत यांना दिलाय.

आणखी एक महत्त्वाचा मुद्दा. रजनीकांत यांना एवढय़ा गांभीर्याने घेण्याचे कारण म्हणजे त्यांची पडद्यावरील अभूतपूर्व लोकप्रियता. ती पाहून कुणालाही धडकी भरेल. त्यातच तामिळ राजकारण आणि चित्रपटसृष्टीची नाळ कमालीची घनिष्ठ. तामिळ राजकारणावर वर्चस्व गाजविणारे सगळे चित्रपटसृष्टीशी संबंधित. मग ते सी. के. अण्णादुराई असो, एम. जी. रामचंद्रन ऊर्फ एमजीआर असो, एम. करुणानिधी असो किंवा जयललिता.. पण पडद्यावरील सगळीच मंडळी राजकारणात यशस्वी झाली नाहीत. शिवाजी गणेशन हे त्याचे उत्तम उदाहरण. ‘नाडिगर तिलमक’ (अभिनेत्यांमधील रत्न) गणेशन पडद्यावर एमजीआर इतकेच लोकप्रिय, पण त्यांचा राजकारणात कधीच जम बसला नाही. के. भाग्यराज, शरथ कुमार, ‘डीएमडीके’चे विजयकांत ही आणखी अपयशी उदाहरणे. थोडक्यात काय तर पडद्यावरील लोकप्रियता ही काही राजकीय यशाची आपोआप हमी देणारा ‘पासवर्ड’ नाही. त्यातच तामिळ अस्मितेभोवती सदोदित फिरणारा तामिळनाडू बिगरतामिळ (म्हणजे कन्नड आणि मराठी) पाश्र्वभूमीच्या रजनीकांत यांना राजकीयदृष्टय़ा कितपत स्वीकारेल, हे प्रश्न रास्त असले तरी रजनीकांत ही भाजपसाठी आतापर्यंतची सर्वोत्तम शिडी असू शकते. त्यातच माजी मुख्यमंत्री ओपीएस पन्नीरसेल्वम यांच्या गटाबरोबरील भाजपची जवळीक रजनीकांत यांच्यासाठी फायद्याची ठरू शकते. ‘पोरका’ झालेल्या अण्णाद्रमुकमधील मोठा घटक सोबत आल्यास रजनीकांत भरभक्कम होऊ  शकतील. शिवाय दिल्लीची रसद मिळाल्यास साधनसामग्रीची कमतरता भासणार नाही. म्हणजे रजनीकांत आणि भाजपसाठीही ‘विन विन सिच्युएशन’ असू शकते. देश तुमचा, तामिळनाडू माझे..

आता उत्सुकता फक्त फेरमांडणीच्या उंबरठय़ावर असलेल्या बिहार आणि तामिळनाडूमध्ये प्रत्यक्ष उलथापालथीची. तोपर्यंत वाट पाहणेच इष्ट..

 

संतोष कुलकर्णी

santosh.kulkarni@expressindia.com

First Published on May 29, 2017 4:48 am

Web Title: rajinikanth nitish kumar narendra modi bjp
 1. सिद्धेश
  May 30, 2017 at 4:29 pm
  मस्त लेख... एक्दम उत्तम विवेचन केलंय आपण ह्या परिस्थितीचं.. मोदी आणि रजनी हत्यांचात काहीतरी तर नक्कीच शिजतंय..! उगाच नाही वेंकय्या नायडू सारखे चेन्नई वारी करत..
  Reply
  1. P
   p d
   May 29, 2017 at 4:53 pm
   lalu cha bhrastachar aani tyncha mulancha vadhata prabhav peksha bjp cha support gheun bihar la suralit chalwave he bihar cha lokana awadel karan lalu ha bhrastachari aahe tyala sobat ghevun ghor chuki jdu ni keleli aahe dusare ase ki rajnikant jar dusari party kadhat asel tar he bjp karata chan aahe hyacha fayada bjp la 2019 election madhe milel
   Reply
   1. Sudhir Karangutkar
    May 29, 2017 at 11:33 am
    अगदी योग्य विवेचन यात कोणाची बाजू किंवा टाळी उचलूं धरली नाही आहे असेच निपक्षपाती लेख लोकसत्ताकडून अपेक्षित आहेत
    Reply
    1. D
     Dhananjay Mirashi
     May 29, 2017 at 10:37 am
     भाजपची तशी नीती आहे कि नाही माहित नाही पण लोकसत्ता कंपू असली पिल्ले सोडण्यात काय अग्रेसर असतो. कारण "राज्य तुमचे आणि केंद्र आमचे" हि खरंतर काँग्रेस हायकमांडची मानसिकता. म्हणूनच महाराष्ट्रात २६-११ चा हल्ला होऊनही रसद पुरवून विलासराव परत मुख्यमंत्री झाले. भाजपने कायमच स्ट्रॉंग मुख्यमंत्री दिले आहेत. शिवराज सिंह, देवेंद्र, योगी, वसुंधरा राजे हे स्वयंपूर्ण मुख्यमंत्री आहेतच. मध्य प्रदेश, राजस्थान मध्ये फिरले तर काँग्रेस ने केलेल्या विकासापेक्षा हि राज्य नागरी विकासात किती पुढे आहेत हे कळेल. फक्त आयटी आणणे आणि शेतजमिनी खाऊन रियल इस्टेट आणणे हि विकासाची संकल्पना काँग्रेस ची आणि ती केंद्र तुमचे आणि राज्य आमचे यावर आधारित होती. देश भावना कुठेच नाही.
     Reply
     1. A
      arun
      May 29, 2017 at 10:16 am
      सशक्त लोकशाहीला विरोधी पक्ष हवाच. बीजेपीला काँग्रेस हाच त्याला पर्याय आहे. त्याचं नेतृत्व करण्याचे गुण सध्या तरी एक पृथ्वीराज चव्हाणांचा करू शकतील. त्यांना दिल्ली संस्कृती माहीत आहे, त्यांना प्रत्येक विषयावर अभ्यास करणं माहीत आहे, त्यांना सर्वांशी जुळवून घेणं माहीत आहे, शिवाय " क्लीन मुख्यमंत्री हि त्यांची प्रतिमाही आहेच. नव्या पिढीतील पायलट, देवरा, या काँग्रेसला जर जगायचं असेल, तर खासगी मालमत्ता न समजून इतरांनी पुढाकार घेतला तर पोकळ राजकुमाराला काढायला पाहिजे. भविष्य असलेल्या या तरुणांनाही अच्छे दिन येतीलच.
      Reply
      1. Ramdas Bhamare
       May 29, 2017 at 8:24 am
       बाजारात तुरी आणि .......
       Reply
       1. A
        Arunkumar Joshi
        May 29, 2017 at 7:48 am
        लालकृष्ण अडवाणीजी राष्ट्रपती निवडणुकीत उमेदवार झाले तर Nitish kumar पाठिंबा देतील व भाजप सोबत राहतील
        Reply
        1. उर्मिला.अशोक.शहा
         May 29, 2017 at 7:24 am
         वंदे मातरम- भाजप ला शह देण्यासाठी विरोधकांनी नितीश कुमार ला पंत प्रधान पदाचे उमेदवार घोषित केले असते तर त्यांच्या महागठबंधं ला बाळसे प्राप्त झाले असते. पण ममता राहुल,मुलायम लालू असे महत्वाकांक्षी नेते हे आपला हक्क ज जी सोडणार नाहीत आणि गठबंधंन होणार नाही. नितीश ला सध्या स्वतःचे मुख्यमंत्रीपद सांभाळायचे आहे. मोठी उडी घेणे हे नितीश च्या आवाक्याच्या बाहेर चे आहे. महागठबंधंन मधील सर्व नेते हे परस्पर विरोधी विचार सरणी चे आहेत असे कडबोळे संभाळण्यातच शासनाचा वेळ खर्च होणार आहे सोनिया गांधी नि पुढाकार घेतला पण जर राहुल गांधी ला पी एम उमेदवार करणार नसतील तर काँग्रेसचे स्वारस्य उरणार नाही सर्वाना एकाच बंधनात बंधू शकेल असा जे पी सारखा नेता नाही मोदी विरुद्ध २०२४ आणि पुढे हि गठबंधं न होऊ शकणार नाही जा ग ते र हो
         Reply
         1. अशोक.गोविंद.शहा
          May 29, 2017 at 6:13 am
          वंदे मातरम-किल्लेदाराचा उत्कृष्ठ लेख नितीश आणि रजनीकांत यांचे केलेले राजकीय प्रभाव मूल्यमापन पटण्या सारखे. विरोधकांना एकत्र होऊच न देणे हा भाजप चा इलेक्शन जिंकण्याचा फंडा असावा, नितीश च्या स्वच्छ प्रतिमेच्या कुबड्या घेऊन लालू बिहार मध्ये पुन्हा पुनरागमन करू शकले मुलाला लोकप्रिय केले आणि नितीश आणि लालू यांच्यातील शीतयुद्ध पेटले दोघेही एकमेकांना संपविण्या करीत चाली खेळात आहे. त्यात नितीश ने मोदी चा शह देऊन विरोधकांना मात दिली आहे काँग्रेस चे राहुल गांधी यांना पी एम बनविण्याचे स्वप्न धुळीस मिळाले आहे. राजनकांत च्या प्रसिद्धीचा उपयोग करून भाजप तामिळनाडू मध्ये जम बसविण्यात यशस्वी होईल असे वाटते रजनीकांत याच्या विरोधा मागे भ्रष्टाचार्यांचे डावपेंच असावेत एकूणच भाजप हा २०१९ पर्यंत देशव्यापी पक्ष होणार आहे आणि काँगेस मुक्त भारत होणार अशी च लक्षणे आहेत मोदी शाह यांनी गनिमी कावा अ ात आणल्या सारखे वाटते राजकारणातील लढाई अश्याच डावपेंचांनी लढायची असते म्हणजे संप भी मारे और लाठी भी न तुटे जा ग ते र हो
          Reply
          1. उर्मिला.अशोक.शहा
           May 29, 2017 at 5:57 am
           वंदे मातरम-राजकारणाच्या बुद्धी बळात प्याद्यांच्या चालीने विरोधकांना नामोहरम करण्याचे मोदी शाह तंत्र हे २०१९ आणि पुढील पांच वर्ष करिता उपयुक्त ठरलेले धोरण आहे. आज देशभर भाजप चा प्रभाव आहे आणि विरोधक हे विखुरलेले आहेत.त्यांच्यात एकी होणे संभव नाही त्यांचेतिल एकमेव स्वच्छ चेहेराच भाजप ने हायजॅक केला तर महागठ बंधन हे फक्त ठगबंधन च उरेल रजनीकांत गळाला लागले तर भाजप चा बेडा पार होणार आहे. या नंतर चे राजकारण हे पोलराइज्ड होणार आहे राज्यस्तरीय किरकोळ पक्षांची मिजास चालणार नाही त्यांना कशी वेसण घालायची हे मोदी शहांना ठाऊक आहे राजकारण बोलके होणाऱ्यांचे भांडवल संपते आणि निमूटपणे काम करणाऱ्यांचे वजन वाढते हा मागील बहुतेक इलेक्शन चा अनुभव आहे. विरोधकांना चुका करायला लावणे आणि त्याचे भांडवल करणे हा पवित्रा यशाचे लक्षण ठरला आहे.पत्ते खेळताना हुकुमाचा पानाचे महत्व असते तसेच राजकारणात लोकप्रिय नेत्याला अमिश दाखवून गळास लावणे आणि विजयाची मु ्तमेढ रोवणे हे देखील कौशल्य आहे. मोदी ना नितीश ने विरोध केला होता पण तो पोटात घेऊन नितीश ला मित्र करून वचपा काढणे हे भाजप ला ज े आहे. जा ग ते र हो
           Reply
           1. Load More Comments