अलीकडे आपल्या कानावर सतत स्मार्ट सिटी, स्मार्ट रोड, स्मार्ट कॉम्प्लेक्स असे शब्द पडत आहेत. स्मार्ट शहरांमध्ये स्मार्ट गृहनिर्माणाची वेगाने निर्मिती होत आहे. अशा गृहसंकुलात इतर अनेक अत्याधुनिक सुविधांसोबत सुरक्षाविषयक इलेक्ट्रॉनिक बाबी बसवलेल्या असतात. आगामी काळात या स्मार्ट गृहसंकुलाच्या सुरक्षिततेची जबाबदारी पेलू शकतील अशा मनुष्यबळाची गरज मोठय़ा प्रमाणावर भासू शकते. ही बाब लक्षात घेऊन मुंबईस्थित शासकीय तंत्रनिकेतन या संस्थेने इलेक्ट्रॉनिक सिक्युरिटी या विषयाचे प्रशिक्षण सुरू केले आहे.
हे प्रशिक्षण पाच स्तरीय असून झिकॉम इलेक्ट्रॉनिक्स सिक्युरिटी सिस्टीम या संस्थेच्या सहकार्याने सुरू करण्यात आले आहे. या क्षेत्रातील तज्ज्ञ मनुष्यबळ निर्मितीसाठी हे प्रशिक्षण उपयुक्त ठरते. या प्रशिक्षणासाठी दहावी, कोणत्याही शाखेतील बारावी आणि आयटीआय उत्तीर्ण उमेदवार प्रवेश घेऊ शकतात. प्रत्येक स्तरातील प्रशिक्षणासाठी ४० उमेदवारांची
निवड केली जाते.
प्रथम स्तरीय प्रशिक्षणात वीज सुरक्षितता, इलेक्ट्रॉनिक घटक आणि उपकरणे, भौतिक सुरक्षितता विषयक मूलभूत बाबी, संगणकीय तंत्रज्ञान, इलेक्ट्रॉनिक सुरक्षितता कार्यप्रणालीची ओळख, व्हीडीओद्वारे दूरध्वनी या बाबींचा समावेश आहे.
दुसऱ्या स्तरावरील प्रशिक्षणात क्लोज्ड सíकट टेलिव्हिजन, इंट्रय़ुजन डिटेक्शन (अतिक्रमण शोध/ तपास), अ‍ॅक्सेस कंट्रोल (प्रवेश/ शिरकाव नियंत्रण) या कार्यप्रणालींचा समावेश आहे. अ‍ॅक्सेस कंट्रोल कार्यप्रणालीसाठी आवश्यक असणाऱ्या उपकरणांविषयी या प्रशिक्षणात माहिती दिली जाते तसेच प्रत्यक्ष स्थानकावर प्रशिक्षणही दिले जाते.
तिसऱ्या स्तरावरील प्रशिक्षणात इंटरनेट प्रोटोकॉल आधारित अ‍ॅक्सेस कंट्रोल कार्यप्रणाली, अग्नि सूचना कार्यप्रणाली, संगणकीय नेटवìकग, इंटरनेट प्रोटोकॉल सव्‍‌र्हेलन्स (निरीक्षण) आणि मध्यवर्ती संनियंत्रण केंद्र व प्रत्यक्ष स्थानकावर प्रशिक्षण या बाबींचा समावेश असतो. चौथ्या स्तरावरील प्रशिक्षणात एक्स्प्लोजिव्ह डिटेक्शन (विध्वंसक स्फोटक शोध/तपास) कार्यप्रणाली, रेडियो ध्वनीलहरी शोध, कार पाìकग व्यवस्थापन, अंडर व्हेइकल स्कॅिनग प्रणाली, अ‍ॅडव्हान्स्ड व्हिडिओ अ‍ॅनॅलिटिक्स, प्रगत मध्यवर्ती संनियंत्रण केंद्र आणि प्रत्यक्ष स्थानकावर प्रशिक्षण या बाबींचा समावेश आहे.
पाचव्या स्तरावरील प्रशिक्षणात इमारत व्यवस्थापन कार्यप्रणाली, एकात्मिक इमारत व्यवस्थापन कार्यप्रणाली, होम ऑटोमशन
(गृह स्वयंचलन), अग्निसुरक्षा आणि व्यवस्थापन, उद्योजकतेसाठीचे वाणिज्य तंत्र आणि प्रत्यक्ष स्थानकावर प्रशिक्षण या बाबींचा समावेश असतो.

पत्ता – शासकीय तंत्रनिकेतन, ४९, खेरवाडी, अलियावर जंग मार्ग, वांद्रे (पूर्व), मुंबई – ५१
वेबसाइट – http://www.gpmumbai.ac.in
ईमेल – gpmumbai@gpmumbai.ac.in

– सुरेश वांदिले