खादी व ग्रामोद्योग आयोगाच्या अंतर्गत कार्यरत असणाऱ्या सी. बी. कोरा ग्रामोद्योग संस्थेतर्फे महिलांसाठी चालवल्या जाणाऱ्या ‘बेसिक ब्युटिशियन कोर्स’ची माहिती..
सध्या आपल्या देशात कौशल्य विकास प्रशिक्षणाच्या कार्यक्रमांना गतिमानता देण्यात येत आहे. कौशल्यप्राप्त व्यक्तीला रोजगाराच्या आणि स्वयंरोजगाराच्या विविध संधी उपलब्ध होऊ शकतात. कौशल्यानुरूप स्वयंरोजगाराची संधी देणारा असाच एक अभ्यासक्रम म्हणजे ‘ब्युटिशियन’ अभ्यासक्रम.
खादी व ग्रामोद्योग आयोगाच्या अंतर्गत काम करणाऱ्या सी. बी. कोरा ग्रामोद्योग संस्थान या संस्थेतर्फे फक्त महिलांसाठी बेसिक ब्युटिशिअन कोर्स हा अभ्यासक्रम चालवला जातो.
या अभ्यासक्रमाचा कालावधी एक महिन्याचा आहे. तो नियमितरीत्या सुरू असतो. या अभ्यासक्रमासाठी कोणत्याही महिलेला प्रवेश मिळू शकतो. त्यासाठी किमान वयोमर्यादा १६ वष्रे आहे.
या अभ्यासक्रमात नेल आर्ट, मेकअप, साडी ड्रेिपग, मेहंदी डिझाइन, हेअर कटिंग, हेअर स्पा, आय ब्रो, नेल आर्ट, वॅिक्सग, फेशिअल, ब्लीच कसे करावे आदी प्रशिक्षणाचा समावेश करण्यात आला आहे. हा अभ्यासक्रम प्रात्यक्षिकांवर अधिक भर देणारा आहे. प्रशिक्षणादरम्यान या अभ्यासक्रमासाठी आवश्यक असणारे साहित्य आणि मुद्रित नोट्स संस्थेतर्फे पुरवल्या जातात.
स्वयंरोजगार सुरू करण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवारांना पंतप्रधान रोजगारनिर्मिती योजनेअंतर्गत २५ लाख रुपयांपर्यंतच्या कर्ज योजनेचा लाभ मिळू शकतो. त्याविषयीची उपयुक्त माहितीही या अभ्यासक्रमादरम्यान दिली जाते आणि त्याविषयीचे आवश्यक ते मार्गदर्शनही केले जाते.

संस्थेचा पत्ता-
सी. बी. कोरा ग्रामोद्योग संस्थान, शिपोली गाव,
गावदेवी मदान, महापालिका शाळेजवळ,
बोरिवली- पश्चिम, मुंबई- ९२.

design courses at iit bombay
डिझाईन रंग- अंतरंग : डिझाईन शिक्षण: विद्यार्थी, पालकांमधील सर्जनशीलता वाढवणारा दुवा
pune , aicte, vernacular language
तंत्रशिक्षण संस्थांतील अध्यापनात आता स्थानिक भाषेचा अधिकाधिक वापर… काय आहे महत्त्वाचा निर्णय?
mpsc mantra study current affairs State National International Level Events
mpsc मंत्र: चालू घडामोडी अभ्यासाचा ‘आधार’
aicte directed question papers of technical education courses in two language
पुणे: तंत्रशिक्षणाची प्रश्नपत्रिका आता भाषासुलभ! काय आहे ‘एसआयसीटीई’चा निर्णय?

– सुरेश वांदिले