एमबीएसारख्या व्यावसायिक अभ्यासक्रमाचे शिक्षण घेताना तसेच कॉर्पोरेट विश्वात नोकरी करताना आपल्या कामाचे, प्रकल्पाचे प्रेझेन्टेशन आपल्या ज्येष्ठ सहकाऱ्यांसमोर अथवा ग्राहक कंपन्यांसमोर करणे हा आज कामाचा अपरिहार्य भाग मानला जातो. दृक्-श्राव्य पद्धतीने सादरीकरण करताना काही पथ्ये ही पाळावीच लागतात. प्रेझेन्टेशनमधून केवळ तुम्ही केलेल्या माहितीची जंत्री सर्वासमोर जशीच्या तशी ठेवणे अपेक्षित नसते. उत्तम सादरीकरण कसे असावे, याविषयीचे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे तज्ज्ञ लियॉर शोहम यांनी दिलेले हे कानमंत्र-

6तुमची प्रेझेन्टेशन स्टाइल..
श्रोत्यांसमोर विविध दृक् साधनांच्या मदतीने जे प्रेझेन्टेशन करणार आहात, त्यात सर्वात मोठा परिणाम करू शकणारा घटक म्हणजे तुम्ही! कारण त्यांच्यापर्यंत हवा तो संदेश पोहोचवणारे तुम्ही आहात! लक्षात घ्या, श्रोत्यांवर सर्वाधिक प्रभाव हा तुमच्या देहबोलीचा पडतो. सुमारे ६० ते ७० टक्के प्रभाव हा तुमचा अ‍ॅपिरिअन्स, तुमचे हावभाव, तुमच्या हालचाली आणि चेहऱ्यावरच्या भावना यांचा असतो. ३० ते ४० टक्के प्रभाव हा तुमच्या आवाजातील चढ-उतार, बोलण्यातील स्पष्टपणा, उच्चार, बोलताना काही गोष्टींवर जोर देणं, ठहराव याचा होत असतो. तर सात ते १० टक्के प्रभाव हा आशय, भाषाशैली याचा असतो.

course on quantum technology for the first time in the country
देशात पहिल्यांदाच क्वांटम तंत्रज्ञानावरचा अभ्यासक्रम… जाणून घ्या सविस्तर!
design courses at iit bombay
डिझाईन रंग- अंतरंग : डिझाईन शिक्षण: विद्यार्थी, पालकांमधील सर्जनशीलता वाढवणारा दुवा
Essay on My Favourite Teacher goes viral
VIRAL: ६ वीतल्या विद्यार्थ्याचा निबंध वाचून शिक्षक कोमात; भूमिका मॅडमसाठी लिहिलेला निबंध होतोय तुफान व्हायरल
10 th Exam
दहावीत नापास झालात? काळजी नसावी कारण येत आहे नवे धोरण…

देहबोली
प्रेझेन्टेशन करताना तुमची देहबोली, तुमचे हावभाव हे श्रोत्यांशी संवाद साधत असतात.. प्रेझेन्टेशन करताना तुमचे हात खुले असू द्या. खिशात हात घालणं, हाताची घडी घालून उभं राहणं, हात कमरेवर ठेवणं टाळा. श्रोत्यांसमोर बोटं नाचवू नका. प्रेझेन्टेशन करताना हातात पेन, पॉइंटर धरून त्याच्याशी चाळा करू नका.

सकारात्मक दृष्टिकोन
तुम्हाला काय म्हणायचंय आणि का म्हणायचंय याबाबत स्पष्टता असू द्या. श्रोत्यांच्या दिशेने तोंड करून व्यासपीठाच्या मध्यभागी उभे राहा. जिथून सर्वजण तुम्हाला पाहू शकतील. सादरीकरण करताना पाय सरळ ठेवा. गरज असेल तशी हालचाल करा. अमूक एका गोष्टीबाबत माफी मागून प्रेझेन्टेशनची सुरुवात करू नका. तुम्हाला वाटत असतं, त्याहून तुमच्यात अधिक आत्मविश्वास असल्याचा दिसत असतो अथवा ऐकताना जाणवत असतो, हे लक्षात असू द्या.
त्याहून तुमच्यात अधिक आत्मविश्वास असल्याचा दिसत असतो अथवा ऐकताना जाणवत असतो, हे लक्षात असू द्या.

7आवाज
बोलताना नैसर्गिक आवाजात बोला. किती व्यक्तींसमोर तुम्हाला बोलायचंय हे लक्षात घेत आवाज लहान-मोठा असायला हवा. बोलताना मध्ये ‘पॉज’ घेणं हे खूप शक्तिशाली ठरणारं तंत्र आहे. त्याचा वापर करा. बोलण्याचा वेग, टोन आणि पिच यात आवश्यक तेव्हा बदल करा. ‘ओके’, ‘तुम्हाला माहीत असेलच’, ‘आह’, ‘हम्मम’ अशा शब्दांचा वापर टाळा.

श्रोत्यांशी नजरभेट
जेव्हा तुम्ही व्यक्तींशी संवाद साधत असता, तेव्हा तुम्ही त्यांच्याकडे पाहायला हवं. श्रोत्यांपैकी प्रत्येकाकडे पाहा. मात्र, कुणा एकाकडे रोखून बघू नका. दोन ते तीन सेकंदांपलीकडे कुणा एकाशी नजरभेट नको. .

उत्साही असणं गरजेचं
सादरीकरणाच्या वेळेस तुमचा उत्साह श्रोत्यांना जाणवायला हवा, तरच श्रोत्यांना त्यात रस वाटेल. एखादी लहानशी गोष्ट सांगा, उदाहरण देत श्रोत्यांशी संवाद साधा.. म्हणजे श्रोत्यांना तुमचं बोलणं कंटाळवाणं वाटणार नाही. अतिउत्साह वा अतिउतावळेपणा नको.

8प्रेझेन्टेशनचे उद्दिष्ट
तुम्ही हे सादरीकरण का करत आहात, याची स्पष्टता तुम्हाला असणे आवश्यक आहे. या प्रेझेन्टेशनमधून काय साध्य करायचे आहे, हेही तुम्हाला नेमके ठाऊक असायला हवे आणि ते उद्दिष्ट अर्थातच वास्तववादी असावे.
तुमच्या प्रेझेन्टेशनचे उद्दिष्ट श्रोत्यांना माहिती देणे हे आहे, सुरू असलेल्या कामाविषयी ‘अपडेट’ करणे हे आहे की कामाचा आढावा घेणे हे ठरवा. तुमच्या प्रेझेन्टेशनचा परिणाम काय होईल, तुमचे प्रेझेन्टेशन पाहून श्रोत्यांचा प्रतिसाद कसा असायला हवा, याचाही विचार करा. एकदा हा आराखडा निश्चित झाला की प्रेझेन्टेशनमागचे तुमचे उद्दिष्ट एका वाक्यात स्पष्ट लिहावे. संपूर्ण प्रेझेन्टेशनच्या आखणीत आणि सादरीकरणाच्या वेळेस हा विचार केंद्रीभूत असणे अत्यावश्यक मानले जाते. तुमच्या श्रोत्यांनाही हे उद्दिष्ट सुरुवातीलाच कळायला हवे.

जाणून घ्या..
’सादरीकरणासाठी तुम्हाला किती वेळ देण्यात आला आहे ?
’श्रोत्यांची संख्या, त्यांची अर्हता.. या गोष्टी लक्षात घ्या.
’श्रोत्यांना या प्रेझेन्टेशनमधून काय हवंय, त्यांच्या या प्रेझेन्टेशनमधून काय अपेक्षा आहेत, त्यांच्या या अपेक्षा आणि प्रेझेन्टेशन करण्यामागचा तुमचा हेतू यांत सारखेपणा आहे का?
’तुमच्या प्रेझेन्टेशनला पर्सनल टच येण्यासाठी काय कराल? उदा. तुमची ओळख कशी करून द्याल?
’प्रेझेन्टेशन कुठे करायचे आहे, याची माहिती करून घ्या. प्रेझेन्टेशन परिणामकारक होण्यासाठी भोवतालचे वातावरण महत्त्वाची भूमिका बजावते.
’प्रेझेन्टेशन करण्याआधी दृक् – श्राव्य सामग्री व्यवस्थित काम करत आहेत ना, हे तपासा. आवश्यकता भासली तर तांत्रिक मदत कोण करेल, याचीही माहिती करून घ्या.
’आसनव्यवस्था कशी असेल ते जाणून घ्या. एअर कंडिशनर, दिव्यांचे नियंत्रण कुठे आहे, ते माहीत करून घ्या. नैसर्गिक प्रकाशात प्रेझेन्टेशन करणे सर्वात उत्तम. तुमच्या प्रेझेन्टेशनच्या गरजेनुसार प्रकाशव्यवस्था कशी करता येईल, हे समजून घ्या.

शब्दांकन – सुचिता देशपांडे
suchita.deshpande@expressindia.com