शिक्षण-प्रशिक्षणाच्या कालावधीतच प्रत्यक्ष कामाचा अनुभव मिळवणे म्हणजे इंटर्नशिप! अलीकडे वैद्यकीय, अभियांत्रिकी, व्यवस्थापन शिक्षणक्रमांत इंटर्नशिप अनिवार्य करण्यात आली आहे. या अंतर्गत विद्याशाखेच्या शेवटच्या सत्रातील किंवा अखेरच्या वर्षांतील विद्यार्थ्यांना संबंधित क्षेत्रातील संस्थेमध्ये कामाचा प्रत्यक्ष अनुभव संपादन करणे आवश्यक ठरते. इंटर्नशिपचा कार्यकाळ प्रत्येक शिक्षणक्रमासाठी वेगवेगळा असू शकतो. आज नोकरी मिळवताना ज्या स्पर्धात्मक वातावरणाला सामोरे जावे लागते, ते लक्षात घेता स्वत:चे परिचयपत्र अधिक परिणामकारक बनवायचे असेल, तर पदवी शिक्षणाच्या जोडीला अशा प्रकारच्या इंटर्नशिपचा अनुभव नक्कीच उपयोगी पडतो. इंटर्नशिपचा आपल्या शिक्षणक्रमात समावेश नसला, तरीही उन्हाळी किंवा हिवाळी सुटय़ांच्या काळात किंवा शिक्षणक्रमाच्या शेवटच्या टप्प्यात शक्य होईल, तेव्हा विद्यार्थ्यांना असा प्रत्यक्ष कार्यानुभव घेणे आवश्यक आहे.

बदलत्या काळाची गरज
ज्या कार्यक्षेत्रात करिअर करायचे आहे त्यात शिक्षण घेणे हे जसे आवश्यक असते, तसेच प्रशिक्षणाच्या अंतिम टप्प्यात त्या क्षेत्रात इंटर्नशिप करण्याची संधी मिळाली तर त्या क्षेत्राचा आवाका स्पष्ट होण्यास मदत होते. कामाचा प्रत्यक्ष अनुभव हा व्यक्तिमत्त्वात सकारात्मक बदल घडवून आणतो. उदाहरणार्थ-
* भविष्यात पेलाव्या लागणाऱ्या जबाबदाऱ्यांची, आव्हानांची जाणीव होते.
* पुस्तकी ज्ञानाचा व्यवहारात वापर करण्यासाठी आवश्यक ती बौद्धिक लवचिकता निर्माण होते.
* इंटर्नशिपची संधी मिळवण्यासाठीची मेहनत आणि इंटर्नशिपमधील कामाचा अनुभव या दोन्ही गोष्टी विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करतात.
* प्रशिक्षणाअंतर्गत शिकलेल्या विषयांतील मूलभूत संकल्पना सुस्पष्ट व दृढ होण्यास मदत होते आणि काम करताना शिक्षणाचा नेमका वापर कसा होतो, याचे भान येते.
* आपल्याला ज्या करिअर क्षेत्रात प्रवेश करायचा आहे, त्या क्षेत्राचे नेमके स्वरूप, तेथील कामकाज, काम करताना येणाऱ्या अडचणी व त्यावर मात करण्यासाठी आवश्यक ठरणाऱ्या उपाययोजना यांची प्रत्यक्ष ओळख होते.
* कामाच्या ठिकाणचे सहकारी, वरिष्ठ, सहाय्यक व्यक्ती यांच्याबरोबर काम करताना आवश्यक ठरणारी वर्तणूक कौशल्ये, एटिकेट आणि संवाद कौशल्ये याबाबत जाण येते.

Extension of time for registration of BBA BMS BCA entrance exam
बीबीए, बीएमएस, बीसीए प्रवेश परीक्षेच्या नोंदणीसाठी मुदतवाढ… आतापपर्यंत किती अर्ज झाले दाखल?
Admission Delayed, 500 Students of college of physican and surgeon, Maharashtra, 500 Students Still Awaiting Admission, physician students, surgeon students, admission awating physican students,
मान्यतेनंतरही सीपीएस अभ्यासक्रमाचे प्रवेश सुरू करण्यास मुहूर्त सापडेना, ५०० जागांवरील प्रवेशासाठी विद्यार्थी प्रतीक्षेत
Career MPSC exam Guidance UPSC job
प्रवेशाची तयारी: व्यवस्थापन शिक्षणासाठी राज्यस्तरीय सीईटी
Priority of schools
आरटीईअंतर्गत प्रवेशासाठी शाळांचा प्राधान्यक्रम निश्चित; शिक्षण विभागाकडून मार्गदर्शक सूचना

उपयुक्तता
इंटर्नशिपमुळे विद्यार्थीदशेतच कामाचा प्रत्यक्ष अनुभव मिळाल्याने, विद्यार्थ्यांच्या अंगी व्यावसायिक क्षमता वाढीस लागते. आपापल्या करिअर क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी आवश्यक ठरणारे व्यक्तिमत्त्वाचे पलू विकसित होतात-
* कामाची आवड निर्माण होते. ’मेहेनतीने वेळेत काम पूर्ण करण्याची चिकाटी अंगी येते.
* वक्तशीरपणा येतो. ’जबाबदारी स्वीकारण्याची आणि निभावण्याची सवय होते.
* ‘मी करू शकेन’ हा आत्मविश्वास येतो. ’वेळेचे नियोजन, कामाचे सादरीकरण यांचे महत्त्व पटते.

संधींचा शोध
ज्या शिक्षणक्रमांसाठी इंटर्नशिप अनिवार्य असते,
अशा विद्यार्थ्यांना आपल्या महाविद्यालयाच्या मदतीने इंटर्नशिपची संधी शोधता येते. अन्य विद्यार्थ्यांना मात्र यासाठी व्यक्तिगत पातळीवर प्रयत्न करावे लागतात.
* योग्य रेझ्युमे : सर्वप्रथम आपली अद्ययावत माहिती असलेला, संपर्क क्रमांकासहितचा रेझ्युमे तयार करावा.
* जनसंपर्क : शेजारी, मित्रमंडळ, कुटुंबातील इतर सदस्य, महाविद्यालयातील शिक्षक यांच्या मदतीने कामाच्या संधी मिळवणे अनेकदा सहजशक्य होते.
* वृत्तपत्रे : विविध वृत्तपत्रांत अननुभवी उमेदवारांसाठीही ‘पाहिजेत’च्या जाहिराती असतात. काही वेळा पदवीधर नसलेल्यांसाठीही कामाचीसंधी उपलब्ध असते. अशा ठिकाणी अर्ज करून अथवा प्रत्यक्ष भेटून इंटर्नशिपची शक्यता अजमावता येईल.
* थेटभेट : आपण निश्चित केलेल्या करिअर क्षेत्राशी निगडित संस्था/ कार्यालये/ उद्योजक यांच्या कार्यालयांत जाऊन त्यांची थेट भेट घेऊन किंवा दूरध्वनीवरूनही त्यांच्याकडे इंटर्नशिपच्या संधीविषयी विचारणा
करता येईल.
* इंटरनेट : आजकाल विविध कार्यक्षेत्रातील इंटर्नशिप संधींची माहिती देणारी संकेतस्थळे उपलब्ध आहेत, त्यांचाही आधार घेता येईल. उदाहरणार्थ- http://www.freshersworld.com, http://www.hellointern.com , http://www.twenty19.com
* लहान संस्थांशी संपर्क : प्रत्येकाला मोठय़ा कंपनीतच कामाची संधी मिळणे शक्य नसते. अशा वेळी आसपासची लहानसहान कार्यालये, संस्था यांतूनही प्रयत्न करता येईल. उदाहरणार्थ, चार्टर्ड अकाऊंटन्टच्या फर्ममध्ये वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांला काही काळ काम करता येईल. वकिलीचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थाला वकिलांच्या किंवा सॉलिसिटर फर्ममध्ये काही काळ काम करता येईल. वित्त क्षेत्राचे शिक्षण घेणाऱ्या व्यक्तीने शेअरब्रोकर, खासगी वित्तसंस्था येथे काम शोधणे योग्य ठरेल.

हेतू
* विद्यार्थ्यांने अवगत केलेल्या पुस्तकी
ज्ञानाचे प्रत्यक्ष कार्यक्षेत्रात उपयोजन करण्याची संधी देणे.
* विद्यार्थी आणि व्यावसायिक/ उद्योजक यांच्यात सेवा आणि अनुभव यांचे आदानप्रदान घडवून आणणे.
स्वरूप
* या अंतर्गत शिक्षणक्रमाच्या शेवटच्या सत्रात किंवा वर्षांत असलेल्या विद्यार्थ्यांनी अभ्यासशाखेशी निगडित संस्था किंवा उद्योग यांत कामाचा प्रत्यक्ष अनुभव घेणे अपेक्षित असते.
* या कार्यक्रमाचा कार्यकाल दोन महिन्यांपासून सहा महिन्यांपर्यंत असू शकतो.
* विद्यार्थ्यांला इंटर्नशिप काळात मिळणारा मोबदला अनुभव देणाऱ्या संस्थेवर किंवा व्यावसायिकावर अवलंबून असतो. मात्र, अनुभवाचे प्रमाणपत्र इंटर्नशिप कार्यकाळाच्या अखेरीस दिले जाते.

इंटर्नशिप स्वीकारताना..
इंटर्नशिपची संधी स्वीकारण्यापूर्वी खालील गोष्टी स्पष्ट होणे गरजेचे ठरते-
* इंटर्नशिपची संधी देणारी संस्था/ कंपनी आणि त्यातील कामाचे स्वरूप हे आपण निश्चित केलेल्या करिअर क्षेत्राशी निगडित आहे का, हे तपासून घ्या.
* संस्थेची/कंपनीची वैधता आणि विश्वासार्हता यांची आपल्या महाविद्यालयाकडून किंवा अन्य मार्गाने पडताळणी करा.
* इंटर्नशिपचा कालावधी, ठिकाण, तिथे जाण्या-येण्यासाठी लागणारा वेळ, वाहनाची उपलब्धता यांचाही विचार होणे गरजेचे आहे. शक्यतो घराच्या जवळपास किंवा महाविद्यालयाजवळची कामाची जागा निवडणे योग्य ठरते. यामुळे वेळेची बचत होऊ शकेल.
* इंटर्नशिपअंती अनुभवाचे प्रमाणपत्र मिळेल याची खात्री करून घ्या.
* कामाचा आíथक मोबदला किती मिळेल हा विचार न करता विद्यार्थ्यांनी कामाच्या अनुभवावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे.

प्रकार
* कामाची संधी- या इंटर्नशिपद्वारे शिक्षणक्रम पूर्ण होण्यापूर्वी शेवटच्या सत्रात किंवा वर्षांत काही महिने प्रशिक्षणविषयांशी निगडित असलेल्या कार्यक्षेत्रांतील कार्यालये, कंपन्या,
संस्था यांत कामाचा अनुभव मिळवता येतो.
* संशोधनाची संधी- देशात किंवा देशाबाहेरील वेगवेगळ्या संशोधन संस्थांमध्ये अशा प्रकारच्या इंटर्नशिप उपलब्ध असतात. याचा कालावधी संस्थेनुसार वेगवेगळा असू शकतो तसेच एखाद्या विशिष्ट कंपनीतील उत्पादनप्रक्रियेत, उत्पादनक्षमतेत सुधारणा करण्यासाठी अशा संशोधनपर इंटर्नशिपच्या संधी विद्यार्थ्यांना दिल्या जातात.
* व्हच्र्युअल इंटर्नशिप- यात इंटर्नशिपचा अनुभव मिळवण्यासाठी प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी जाण्याची गरज भासत नाही तर इच्छुक विद्यार्थी फोन, ई-मेल, वेब कम्युनिकेशनच्या माध्यमातून तेच काम पार पाडू शकतो.