अनेकदा मनाचा कौल ‘नाही’ असा असूनही आपण इतरांना होकार देऊन मोकळे होतो, मग तो निर्णय तुम्हाला थकवणारा, अस्वस्थ करणारा असला तरी तुमचा त्याविषयी ठाम निर्णय न झाल्याने तुम्ही होकार भरता आणि अडचणीत सापडता. तुमची अस्वस्थता कमी करण्यासाठी वेगवेगळ्या परिस्थितीत ‘नाही’ या निर्णयापर्यंत पोहोचण्याच्या काही योजना, क्लृप्त्या आहेत. त्याविषयी..

आज संध्याकाळी स्वत:करता मोकळा वेळ काढून चालायला जायचं तुम्ही ठरवताय आणि तेव्हाच तुम्हाला कार्यालयात उशिरापर्यंत थांबायला सांगितलं तर..

Which yoga asanas can help you burn calories faster? Yoga for weight loss
Weight Loss Yoga: पोट, कंबर व हातांवरील अतिरिक्त चरबी घटवण्यासाठी करा ‘ही’ आसने! चेहऱ्यावरही येईल ग्लो
Vanchit Bahujan Aghadi Changes Lok Sabha Candidates in maharashtra ahead of lok sabha 2024 Election
‘वंचित’ चा फेरबदल कोणाच्या फायद्याचा? कोणाच्या सांगण्यावरून?
Addicted to junk food and can’t seem to stop Here’s how to overcome it
तुम्हाला जंक फूड खाण्याचे व्यसन आहे का? तज्ज्ञांकडून जाणून घ्या कशी सोडावी ही वाईट सवय
Rural Health Services pregnant woman from Nandurbar lost her life due to lack of timely medical care
ग्रामीण आरोग्य सेवा : ठसठसती जखम!

तुम्ही चालायला जाण्याचं ठरवलेलं तितकंसं महत्त्वाचं नसतं. का, कुठे जायचं हेही सारं अस्पष्ट असतं अशा वेळी कामाकरता म्हणून उशिरापर्यंत थांबण्याची विनंती सहजासहजी धुडकावता येत नाही, हे खरे. आज माझा पुरेसा व्यायाम झाला नाही हे आयत्या वेळचं स्पष्टीकरण तितकंसं बळकट ठरत नाही, मात्र जर अशा वेळी तुम्ही या राखीव दिवसाची आणि वेळेची कॅलेंडरमध्ये  नोंद केली असेल, तर तुम्हाला निर्णय घेणं अधिक सोपं जातं. अशा प्रसंगी ‘आज संध्याकाळी काही इतर गोष्टी करण्याचे प्लॅन्स आधीच निश्चित आहेत, आवश्यकता असल्यास मी वीकएण्डला मदत करू शकेन,’ असे उत्तर तुम्हाला आत्मविश्वासाने देता येईल.  जर कॅलेंडरमध्ये तुमचे अत्यंत महत्त्वाचे प्राधान्यक्रम आधीच नोंदवलेत, तर उपलब्ध असलेला वेळ तुम्हाला पडताळून पाहता येईल. ती वेळ उपलब्ध करून दिल्यास तुम्ही ‘नाही’ अधिक ठामपणे सांगू शकाल.

कामात व्यग्र असल्याने समिती, तुमची टीम अथवा गट यांच्यासाठी तुम्ही वेळ काढू शकत नसलात तर..

आपल्या टीमला पुरेसा वेळ देऊ शकत नाही, या टोचणीपासून मुक्त व्हा. एखाद्या गटाला नाही म्हणणं हे खरंच कठीण असतं, कारण तुमच्या ‘नाही’मुळे केवळ एखादी व्यक्ती नाही, तर अनेक व्यक्ती निराश होतात; पण मानसशास्त्रज्ञांच्या मते, आपण जितक्या प्रमाणात मानतो, त्यापेक्षा कमी नकारात्मक विचार इतर व्यक्ती आपल्याबाबत करतात. आपण आपली मर्यादा निश्चित केली तर लोक आपल्या निर्णयाचा आदरच करतात.  अशा परिस्थितीत नाही म्हणणं किती योग्य ठरतं? तुमच्या गरजा आणि प्राधान्यक्रमांच्या तुलनेत गटाच्या गरजा ध्यानात घेण्याकरता धाडस आवश्यक ठरतं. मात्र दीर्घकालीन विचार करता, ‘क्षमा करा, पण या आठवडय़ात मला शक्य नाही,’ हे इतरांना प्रामाणिकपणे आणि सौम्यपणे सांगणे उचित ठरते.

तुम्हाला एका समारंभाचं आमंत्रण आले आहे. तुम्हाला जावंसं वाटतंय, पण तुम्ही थकलेले आहात आणि कदाचित आजारी पडू असं वाटतंय..

अशा वेळी भविष्यात आपल्यासाठी नेमकं काय योग्य ठरेल याचा विचार करण्यापेक्षा आपल्या सगळ्यांना वर्तमानात समाधान शोधणं आवश्यक वाटतं, विशेषत: जेव्हा पार्टीसारखा आनंददायी पर्याय समोर असेल तर..! अशा वेळेस निर्णय घेताना आता आपण कुठल्या गोष्टींना मुकू याचा विचार करण्याऐवजी नजीकच्या भविष्यकाळाचा स्पष्टपणे विचार करा. जर मला आज रात्री आराम मिळाला नाही तर उद्या सकाळी मी कसा दिसेन अथवा मला कसे वाटेल, हा विचार करणे सयुक्तिक ठरते. थकलेलो असल्याने समारंभ किती एन्जॉय करता येईल, याचाही विचार केलेला बरा.

आधीच तुमच्याकडे कामांची लांबलचक यादी आहे.. त्यात आणखी काम समोर ठेवले तर..

जेव्हा तुम्ही अधिकाधिक व्यग्र होता, तेव्हा तुम्हाला अधिकच्या कामांसाठी नाही म्हणणे अधिक जड जाते. यावर उपाय म्हणजे नाही म्हणण्याचा सराव करणे. जेव्हा आपल्याकडे अधिकच्या कामाची आर्जवं येतात आणि आपण तणावाखाली असतो, दमलेलो असतो तेव्हा आपण सतत काम करण्याचा पर्याय स्वीकारतो.मात्र जेव्हा आपण जाणीवपूर्वक अधिकचे काम स्वीकारण्याचा निर्णय घेतो तेव्हा ते काम अधिक उत्तमपणे निभावतो, हे लक्षात ठेवा.

त्यांनी ज्या कामातून पळ काढला आहे, ते काम तुम्ही करावे, याकरता कुणी जर तुमच्याकडे नैतिकदृष्टय़ा अयोग्य अशी मागणी केली तर..

जर मित्र-सहकाऱ्यांकडून अशी अवास्तव मागणी आली, तर त्याला नाही म्हणणं तितकंसं सोपं नसतं, कारण त्या व्यक्तींशी तुमच्या भावना गुंतलेल्या असतात. अशा प्रसंगी निर्णय घेताना दोन गोष्टी लक्षात ठेवाव्यात- तुमच्या मित्राच्या समस्येविषयी सहवेदना हवी आणि तुमची सचोटी जागृत हवी. स्पष्टपणे नाही म्हणताना आवश्यकता भासल्यास असे म्हणता येईल, ‘तुझ्यावर ओढवलेल्या प्रसंगाबद्दल वाईट वाटतंय आणि मला मदत करता आली असती तर किती बरे झाले असते! मी तुझ्याशी खोटू बोलू शकत नाही, कारण माझ्याकरता सचोटी अधिक महत्त्वाची आहे.’ तुमच्याकडून अशा प्रकारे नाही ऐकणे तुमच्या मित्राकरिता कष्टप्रद असू शकते; पण तरीही अत्यंत संयतपणे तुमच्या मित्राची अवास्तव मागणी धुडकावण्याची गरज असते.