सध्याच्या स्पर्धात्मक कार्यपद्धतीत, कामाचा ताण हा अनिवार्यपणे येतोच. या ताणाशी सामना करत, स्वत:च्या मानसिक आणि शारीरिक क्षमतांचा पुरेपूर वापर करून दिलेली कामे वेळेत आणि उत्तम प्रकारे पार पाडण्याचे कसब अंगी बाणवणे म्हणजेच कामाच्या ताणाचे व्यवस्थापन करणे. कामाच्या ताणाचे स्वरूप हे प्रत्यक्ष काम किंवा कामाशी निगडित कार्यालयीन वातावरण आणि अन्य घटकांवरही अवलंबून असते. कामाच्या ताणाचे व्यवस्थापन कसे करता येईल, ते जाणून घेऊयात..
कामाच्या ताणाची कारणे
* कामाबद्दल अनभिज्ञता-
प्रामुख्याने अननुभवी कर्मचाऱ्यांना, कामाबद्दल पुरेशी माहिती नसल्याने कामाचा ताण जाणवू शकतो.
* कार्यालयीन हुद्दा-
कामाच्या ठिकाणी जोखमीच्या जबाबदाऱ्या आणि महत्त्वपूर्ण निर्णय घ्याव्या लागणाऱ्या हुद्दय़ांवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कामाच्या तणावाचा सामना करावा लागतो.
* नोकरीची असुरक्षितता-
वाढती स्पर्धा, बदलती आíथक धोरणे, राजकीय बदल, तंत्रज्ञानातील प्रगती यामुळे नोकरीतील असुरक्षिततेचा तणाव कामाच्या ठिकाणी
जाणवू शकतो.
* क्षमतेपेक्षा अधिक काम-
काही कारणांमुळे कर्मचाऱ्यावर त्याच्या क्षमतेपेक्षा अधिक काम सोपवले तर त्याच्यावर कामाचा ताण येऊ शकतो.
* दैनंदिन कामाचे तास-
आजकाल शहरीकरण आणि वाढती लोकसंख्या यामुळे दूरदूरच्या उपनगरांत लोकवस्त्या पसरलेल्या असतात. परिणामी, कर्मचाऱ्यांचा दिवसाचा बराच वेळ प्रवासात आणि कामाच्या ठिकाणी जातो. अप्रत्यक्षरीत्या या बाबींचा कर्मचाऱ्यांवर ताण येताना जाणवतो. तसेच काही संस्था, आस्थापने किंवा कंपन्यांत दिवसाच्या कार्यकालाचे ठरीव वेळापत्रक नसते, यामुळेही तणावजन्य परिस्थिती निर्माण
होऊ शकते.
* कार्यालयीन राजकारण-
कामाच्या ठिकाणी होणारी गटबाजी आणि त्यांतून होणारे राजकारण  यामुळेही कामाचा ताण जाणवू शकतो.

ताणतणावाची लक्षणे
* कामावर जाणे नकोसे वाटते किंवा कामावर जाण्याची अनामिक भीती वाटते.
* कामाच्या विचारांनी, घरात किंवा घराबाहेर चिडचिड होते, निराश वाटते, संताप अनावर होतो.
* कार्यालयात काम करताना मानसिक किंवा शारीरिक थकवा जाणवतो.
* डोकेदुखी, पचनाच्या, झोपेच्या तक्रारी जाणवतात.
* कार्यालयात काम करताना लक्ष एकाग्र होत नाही.

article about mpsc exam preparation guidance mpsc exam preparation tips in marathi
MPSC मंत्र : अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व – परीक्षास्वरूप आणि अभ्यासक्रम
Gold Hits All Time High, 2400.35 doller an Ounce, global market gold price, global market gold high, all time gold high in world, Global Economic Uncertainty , gold,finance news, finance article, marathi news, vietnam, america,
सोन्याची विक्रमी तेजीची दौड कायम, जागतिक बाजारात प्रति औंस २,४००.३५ डॉलरचा उच्चांक
Loksatta kutuhal Limitations of learning
कुतूहल: सखोल शिक्षणाच्या मर्यादा
Income tax now on loans overdue for more than 45 days of business
उधारीच्या नव्या नियमाने वस्त्रोद्योगाचे धागे विस्कटले ! ४५ दिवसांहून अधिक काळ थकलेल्या उधारीवर आता प्राप्तिकर

काय कराल?
दिलेल्या वेळेत कामगिरी पूर्ण करण्यासाठी आणि कामाचा दर्जा उत्तम राखण्यासाठी, अल्प प्रमाणातील मानसिक दडपण पोषक ठरत असले तरी कामाच्या अतिरिक्त तणावाने कर्मचाऱ्याचे मनस्वास्थ्य मात्र बिघडू शकते आणि हे कामाच्या गुणवत्तेसाठीही मारक ठरते. कामाच्या ताणाचे व्यवस्थापन करण्यासाठी, व्यक्तिमत्त्वात वैचारिक व इतर बदल होणे हिताचे असते..
* क्षमता, कौशल्यांची वाढ –
कमी वेळेत जास्त काम करण्याची क्षमता किंवा दिलेले काम जास्तीत जास्त अचूकतेने, वेळेत पूर्ण करण्याची क्षमता कर्मचाऱ्याने प्रयत्नपूर्वक जोपासली तर सरावाने कामाचा ताण कमी करणे शक्य होते.
* संदर्भविषयांचा अभ्यास –
कामाशी संदर्भात विषयातील वाचन, अभ्यास या गोष्टी कामातील रुची वाढवण्यास आणि कामाबद्दल आत्मविश्वास निर्माण करतात आणि पर्यायाने कामाचा ताण कमी होतो.
* सकारात्मक विचार –
सोपवलेल्या प्रत्येक जबाबदारीकडे प्रगतीची संधी या दृष्टिकोनातून पाहिल्यास कामाच्या ताणाशी सामना करणे सोपे होते.
* छंदांची जोपासना –
कामाव्यतिरिक्तच्या वेळात आपले वैयक्तिक छंद किंवा आवडीनिवडी जोपासाव्यात अथवा समवयस्क मित्रमत्रिणी, कुटुंबीय यांच्यासोबत हा वेळ व्यतीत केल्याने मनाला विरंगुळा मिळतो.
* बौद्धिक, मानसिक लवचीकता –
दिवसेंदिवस झपाटय़ाने प्रगती करणारे तंत्रज्ञान, उद्योग तसेच माहिती तंत्रज्ञान यांमुळे कामाची गती, गरज आणि स्वरूप यांत अपरिहार्य बदल होत आहेत. नवनवीन विषय आणि तंत्रज्ञानातील बारकावे यांच्याशी जुळवून घेण्याची बौद्धिक आणि मानसिक लवचीकता असली तर कामाचा ताण कमी होतो आणि ही लवचीकता सर्वागीण प्रगतीला पोषक ठरते.
* कामाची निवड –
आपल्या आवडत्या विषयाशी किंवा व्यवसायाशी निगडित नोकरीची किंवा उद्योगाची, कामासाठी निवड केल्यास, साहजिकच कामाचा ताण तुलनेने कमी जाणवतो. अर्थात नोकरीच्या बाजारपेठेतील जीवघेण्या स्पध्रेत हे साधणे काहीसे अशक्य असते. अशा वेळी राहत्या ठिकाणापासून जवळ असलेले कामाचे ठिकाण निवडण्याचा प्रयत्न करावा.
* आंतरिक इच्छा –
स्वीकारलेली जबाबदारी योग्य तऱ्हेने पार पाडण्याची आकांक्षा तसेच स्वत:ची ओळख, स्वत:च्या कामातून निर्माण करण्याची तीव्र आंतरिक इच्छा, आपल्याला कामाच्या ठिकाणी जास्तीत जास्त मेहनत घ्यायला भाग पाडते. यामुळेही कामाचा ताण न जाणवता, उलट ती स्वप्रगतीची संधी वाटते. ही आंतरिक इच्छा मनात नेहमी जागृत ठेवणे हिताचे ठरते.
* विचारविनिमय –
कर्मचाऱ्याने स्वत:ला जाणवणाऱ्या कामाच्या ताणाबद्दल सहकाऱ्यांशी, वरिष्ठांशी चर्चा करणे आवश्यक आहे, समवयस्क मित्रांजवळ याबाबत संवाद साधल्यासही ताणाचे प्रमाण कमी
होऊ शकते.
* व्यायाम –
नियमित व्यायामाने शरीर आणि पर्यायाने मन:स्वास्थ्यही टिकून राहते. याचा अप्रत्यक्ष परिणाम म्हणजे कामाचा ताण सुस करण्यास, शरीराची आणि मनाचीही साथ मिळते. यासाठी खाण्यापिण्याच्या, झोपेच्या आरोग्यदायी सवयी जडवून घेणे
आवश्यक आहे.
* वेळेचे व्यवस्थापन –
स्वीकारलेल्या कामांना लागणारा वेळ आणि हातात असणारा वेळ याचे गणित मांडून कामाची आखणी केल्यास, कामाचा ताण कमी होऊ शकतो.
* प्राधान्यक्रमाची निश्चिती –
कामांची रीतसर यादी करून, वरिष्ठांशी चर्चा करून कामाचे प्राधान्यक्रम ठरवणे फायद्याचे ठरते आणि यामुळे कामाचा ताणही जाणवत नाही.
* ध्येयाची विभागणी –
प्रथम कामाचे अंतिम ध्येय ठरवून, त्यासाठीच्या कामांची क्रमवार आखणी आणि मांडणी करावी. थोडक्यात मोठय़ा ध्येयाची, लहान लहान ध्येयांत विभागणी केल्याने कामाचा ताण कमी होण्यास मदत होते.
* योग्य वेळी नकार –
स्वत:च्या मर्यादा ओळखून जर एखादी जबाबदारी स्वीकारणे शक्य नसेल तर वेळीच वरिष्ठांचा किंवा सहकाऱ्यांप्रति आदर राखून नकार देण्याची कला आत्मसात करायला हवी. यामुळे अतिरिक्त कामाचा ताण टाळता येऊ शकेल.
* चांगल्या सवयींचा अंगीकार –
वर्तणुकीतील लहानसहान चांगल्या सवयी अंगी प्रयत्नपूर्वक बाणवल्याने, अप्रत्यक्षपणे कामाचा ताण कमी होऊ शकतो. उदा. आजचे काम आजच संपवणे, एखादे काम समजले नसल्यास त्याबद्दल जाणून घेणे, वस्तू, कागद जागच्या जागी ठेवणे, स्वत:च्या चुका प्रांजळपणे कबूल करणे.. वगरे.