व्यक्तिगत आयुष्यात आणि कार्यालयीन वातावरणात काम करताना, आपल्याला अनेक मर्यादांचा सामना करावा लागतो. काहीवेळा या मर्यादा तात्पुरत्या किंवा कायमस्वरूपाच्या ही असू शकतात. या मर्यादांच्या परिघात राहून कामातील प्रगती आणि गुणवत्ता कायम राखणे व कामकाज सुरळीत सुरू ठेवणे हे आव्हान पेलण्यासाठी काही योजना आखणे आणि स्वत:च्या मानसिकतेत जाणीवपूर्वक बदल घडवणे गरजेचे ठरते.

मर्यादा म्हणजे नेमके काय?
प्रत्येक वस्तूचे, स्थळाचे, व्यक्तीचे काही विशिष्ट गुणधर्म, स्वभावविशेष असतात. या विशिष्ट गुणधर्मामुळे त्यांच्या उपयोगितेवर बंधने निर्माण होतात. उदा. एखादा कर्मचारी अतिशय कार्यक्षम असेल पण स्वभावाने तापट असेल तर ही त्या कर्मचाऱ्याची स्वभावमर्यादा
म्हणता येईल.

Sun Transit In Mesh Rashi
काही तासांत सुर्य करेल मेष राशीत प्रवेश! पाहा, कोणत्या तीन राशींचे नशीब उजळणार? मिळणार भरपूर पैसा अन् प्रसिद्धी
Womens health It is need to understand mentality of pregnant women
स्त्री आरोग्य : काय असतं गर्भवतीच्या मनात?
Addicted to junk food and can’t seem to stop Here’s how to overcome it
तुम्हाला जंक फूड खाण्याचे व्यसन आहे का? तज्ज्ञांकडून जाणून घ्या कशी सोडावी ही वाईट सवय
Before blaming diabetes drugs understand What chemicals are used in medicines
मधुमेहावरल्या औषधांना दोष देण्याआधी समजून तरी घ्या…

मर्यादांशी जुळवून घेताना..
* मर्यादा समजून घेऊन स्वीकारणे गरजेचे ठरते.
* स्वत:च्या दृष्टिकोणात बदल केल्याने एखादी मर्यादा, प्रगतीसाठी तारक ठरू शकते.
* ध्येयनिश्चितीमुळे मर्यादांशी तडजोड करून प्रयत्नांची दिशा ठरवणे शक्य होते.
* अचूक निर्णयक्षमता, मर्यादांच्या परिघात राहूनही सक्षम राहण्यास सहाय्यभूत ठरते.
* मर्यादांना टाळण्यापेक्षा, सामोरे जाण्याने ध्येयप्राप्तीचा मार्ग सुकर आणि स्पष्ट होऊ शकतो.
* आपल्याला भेडसावणाऱ्या मर्यादांबद्दल, संबंधित व्यक्तींशी संवाद साधून काही सुवर्णमध्य निघू शकतो.

परिस्थितीजन्य मर्यादा
* वेळेची मर्यादा – बऱ्याचदा असे जाणवते की, दिलेले काम वेळेत आणि अचूक पद्धतीने पूर्ण करणे शक्य होत नाही. किंवा काम पूर्ण करण्यासाठी दिलेला वेळ अपुरा पडू शकतो.
* या मर्यादेवर मात करण्यासाठी काम वेळेवर पूर्ण न होण्याच्यामागे कोणत्या अडचणी आहेत, यांचा आढावा घेणे.
* कामाचे महत्त्व, गांभीर्य जाणून घेणे.
* शक्य असल्यास मोठे काम छोटय़ा भागांमध्ये विभाजित करणे.
*‘मी काम वेळेतच पूर्ण करणार आहे’ हा आत्मविश्वास मदतनिसाचे काम करतो.

दळणवळणाची मर्यादा
* नोकरीच्या ठिकाणापर्यंत पोहोचण्याच्या दळणवळणाच्या सोयी सुविधा अयोग्य किंवा त्रासदायक असतील तर ती मर्यादा ठरू शकते. अशा वेळी राहत्या ठिकाणच्या जवळपास नोकरी शोधणे सोयीचे ठरते.
* दळणवळणाचा इतर पर्याय शोधणे हिताचे ठरू शकते.
* कामाच्या लवचिक वेळाचा पर्याय स्वीकारल्यानेही प्रवासाचा काळ सुसह्य होऊ शकतो.
* वरिष्ठांशी चर्चा करून ‘वर्किंग फ्रॉम होम’चा पर्याय पडताळता येईल.

आíथक मर्यादांवर मात
* एखादा उद्योग सुरू करण्यासाठी, एखादा महागडा प्रशिक्षण कार्यक्रम सुरू करण्यासाठी किंवा रोजचा चरितार्थ चालवण्यासाठी जर पुरेसे पसे उपलब्ध नसतील, तर त्याला आíथक मर्यादा म्हणता येईल.
* अलीकडे लहान-मोठय़ा उद्योजकांसाठी, बँका, पतपेढी यांकडून कर्ज मिळू शकते. अशा कर्ज योजनांचा विचार करता येईल.
* शिक्षण आणि अनुभवाला अनुरूप असा जोडधंदा करता येऊ शकतो.
* असलेली नोकरी बदलून, अधिक मिळकत देणारी नवी नोकरी शोधण्याचाही पर्याय असू शकतो.
* स्वयंउद्योगासाठी भांडवल उभे करताना, योग्य गुंतवणूकदाराच्या शोधात राहणे आणि स्वत:च्या उद्योग कल्पना त्याना पटवून देण्यासाठी शर्थ करावी लागेल.

भावनिक मर्यादा लक्षात घ्या..
* क्रोध – मनाविरुद्ध घडणाऱ्या घटनांचा निषेध नोंदवण्यासाठी उमटणारी स्वाभाविक प्रतिक्रिया म्हणजे क्रोध. कोणत्याही प्रकारचे नुकसान टाळण्यासाठी, घटना घडण्याआधी दर्शवलेला क्रोध कदाचित फायद्याचा ठरू शकतो. परंतु घटनापश्चात दर्शवलेला क्रोध हा मात्र अनाठायी आणि अतिरेकी असू शकतो आणि व्यक्तिमत्त्वाची नकारात्मक प्रतिमा उभी करतो. एखादी व्यक्ती अभ्यासू, सक्षम, परंतु तापट किंवा रागीट असेल तर या स्वभावमर्यादेमुळे अनेक उत्तम संधींपासून वंचित राहू शकते.
* भावुकता – संवेदनशीलता ही वैयक्तिक प्रगतीसाठी आवश्यक असली, तरी तिचा अतिरेक, व्यक्तीला भावूक आणि प्रसंगी कमकुवत बनवतो. यातून
काही वेळा चुकीचे निर्णय आणि परिणामी, अपयश येऊ शकते किंवा या मर्यादेचा, इतरांकडून गरवापर
होऊ शकतो.
* न्यूनगंड – स्वत:चा, स्वत:च्या क्षमतेवर विश्वास नसणे म्हणजेच न्यूनगंड. व्यक्तीची स्वभावमर्यादा ठरलेला न्यूनगंड व्यक्तीच्या प्रगतीसाठी मारक ठरतो. नवीन आव्हाने, जबाबदाऱ्या पेलण्यास असमर्थ बनवते, अपयशास कारणीभूत ठरते. या भावनिक मर्यादेच्या अतिरेकातून नराश्यासारख्या गंभीर समस्या निर्माण
होऊ शकतात.
* अतिआत्मविश्वास – स्वत:तील कमतरतांची जाणीव नसल्यास संभाव्य धोके, अडचणी वेळीच ओळखून त्यासाठी पूर्वतयारी केली जात नाही. ही स्वभावमर्यादा असलेल्या व्यक्तींना अपयशाचा सामना करावा लागतो.
* भीती – आत्मविश्वासाच्या कमतरतेतून भीती निर्माण होते. उदाहरणार्थ- परीक्षा किंवा व्यवसायातील अपयश, नातेसंबंधांतील दुराव्याची भीती, गुंतवणुकीतील नुकसानीची भीती. या मर्यादेच्या अतिरेकातून काही मानसिक आजारही निर्माण होऊ शकतात.
* मोह, द्वेष, सूड भावना – या मानसिक मर्यादांतून प्रगतीचा परीघ आकुंचित होतो, लक्ष ध्येयापासून विचलित होते. भ्रष्टाचार, फसवणूक आणि शत्रूंची संख्या वाढते.
या भावनिक मर्यादांवर मात करण्यासाठी..
स्वीकार – स्वत:तील भावनिक मर्यादांची जाणीव असणे आणि त्यांचा स्वीकार करणे महत्त्वाचे ठरते.
मनोनिर्धार – या मर्यादा कमी करण्यासाठी मनोनिर्धार आवश्यक ठरतो. स्वप्रगतीसाठी या मर्यादा मारक आहेत, ही वस्तुस्थिती मेंदूला सतत समजावत राहणे.
स्वयंनियंत्रण – या मर्यादांचा अतिरेक टाळण्यासाठी, यावर सतत विचार करणे, आणि प्रयत्नपूर्वक टाळणे लाभदायक ठरते.
व्यायाम, योगासने – नियमित व्यायाम आणि योगसाधनेतून मन:शांती आणि मेंदूला होणारा ऑक्सिजनचा पुरवठा, रक्ताभिसरण प्रक्रिया सुरळीत होऊन संतुलित मनोवस्था निर्माण होऊ शकते.
डॉक्टरी उपचार – भीती, निराशा, न्यूनगंड यांच्या अतिरेकावर मात करताना डॉक्टरी उपचारही काही प्रमाणात कामास येऊ शकतात.

मनुष्यबळाची मर्यादा
उपलब्ध मनुष्यबळ संख्येने कमी असणे किंवा अकुशल, अकार्यक्षम मनुष्यबळ असणे ही व्यवस्थापनासाठी एक मर्यादा असू शकते. यावर मात करण्यासाठी..
* मनुष्यबळ नेमणुकीच्या वेळी सतर्क राहून सक्षम कर्मचाऱ्याची नेमणूक करणे योग्य ठरते.
* हाताखालील कर्मचाऱ्यांना, प्रशिक्षण देणे.
* नोकरीतील कामाव्यतिरिक्त, कामाशी संदर्भातील चर्चासत्रे, यांमध्ये सहभागी होण्याची संधी देऊन बाह्य जगाची ओळख करून देणे उपयुक्त ठरते.
* उपलब्ध मनुष्यबळाला स्वयंपूर्ण बनवणे, त्यांच्यातील उणिवा योग्य शब्दांत लक्षात आणून देणे गरजेचे ठरते.
* आकलनशक्ती वाढवण्यासाठी – काही व्यक्तींना एखादा विषय किंवा काम सांगूनही न समजणे, किंवा उशिराने समजणे या आकलनाशी निगडित मर्यादा
असू शकतात. यांच्याशी सामना करताना, मन
लावून सांगितलेल्या विषयाचा स्वयंअभ्यास करणे महत्त्वाचे ठरते.
* कार्यालयीन कामकाजासंदर्भात काही गोष्टींचे आकलन होत नसेल, तर वरिष्ठ किंवा सहकाऱ्यांचे मार्गदर्शन लाभदायक ठरू शकते.
* त्या किंवा तशाच प्रकारच्या, पूर्वी घडलेल्या कामांचा आढावा घेणे, नोंदी तपासणे, यामुळे पूर्वानुभव नसतानाही नवीन कामाचे आकलन होणे शक्य होते.

शारीरिक मर्यादांवर विजय
* जन्मत: व्यंग किंवा आजारपण, अपघात यांतून काही वेळा व्यक्तीच्या हालचालींवर तात्पुरत्या किंवा कायमस्वरूपी मर्यादा येऊ शकतात. या मर्यादांवर मात करण्यासाठी प्रचंड इच्छाशक्तीच्या आधारे शरीराच्या पंगुत्वावर मात करून काही अंशी किंवा पूर्णत: स्वावलंबी जीवन जगता येते.
* सराव आणि डॉक्टरी उपचार यांतूनही शारीरिक व्याधी असूनही सुरळीत जीवनक्रम आचरणे शक्य होते.
* काही मनोकायिक विकारांमध्ये डॉक्टरी उपाय तसेच मेंदूला सतत सकारात्मक विचारांची जोड देणे आवश्यक ठरते.

– गीता सोनी