प्रामाणिकपणे स्वत:लाच विचारा की, तुम्हाला तुमच्या कामात समाधान मिळतं का? जर मिळत नसेल तर ते का मिळत नाही? तुम्ही जे काही पर्याय स्वीकारले त्याचा अंतिम परिणाम म्हणजे कामातील समाधान!

खरं सांगायचं तर एखादा पर्याय स्वीकारताना भोवतालच्या सामाजिक, आर्थिक परिस्थितीचा दबाव आणि प्रभाव हा तुमच्या निर्णयावर पडतो. त्यामुळे समाधानाचा विचार करून काम स्वीकारणे असे फारसे घडत नाही. कामाच्या ठिकाणही सततच्या घडामोडींमुळे आपल्या कामाचे परीक्षण आणि स्वत:शीच विचार करण्याचा वेळ आपल्याला अभावानेच मिळतो. मात्र, यातूनच कामासंदर्भातील आपला दृष्टिकोन विकसित होतो आणि आपण बदल करायला प्रवृत्त होतो.

land reforms
UPSC-MPSC : भारतातील जमीन सुधारणा अपयशी का ठरल्या? त्यामागची नेमकी कारणे काय होती?
loksatta kutuhal article about perfect artificial intelligence
कुतूहल : परिपूर्ण बुद्धिमत्तेचे धोके
Declaration of self-reliance and policy of import dependence
घोषणा आत्मनिर्भतेच्या आणि धोरण आयातनिर्भरतेचे
Science Day is Not just to celebrate but to practice it
विज्ञान दिन साजरा करण्यासाठी नव्हे, आचरणात आणण्यासाठी…

जी जागा आपल्याकरता नाही, हे उमजून तिथून काढता पाय घ्यायला हे विचार आपल्याला पुढे ढकलतात. जर आपण अधिकाधिक उत्पन्न मिळवणे आणि चांगले काम मिळवणे यावर लक्ष केंद्रित केले तर आपण समाधानी होऊ की आपण जीवनशैली, अधिकाधिक बिलं भरण्यात अडकू याचा विचार करायला हवा. असे केल्याने आपला अधिकाधिक वेळ आणि प्रयत्न जे काम आपल्याला आवडत नाही ते करण्यात खर्ची होईल. याचा अर्थ असा नव्हे की, आपण लगेच शेतीकडे नाही तर उद्योगाकडे वळतो. याचे खरे उत्तर आपण जगण्याला कसे सामोरे जातो, यात दडलेले आहे.

आयुष्य आणि काम हे खरंच वेगवेगळे आहे का, या प्रश्नावर प्रत्येकाने शांतपणे विचार करायला हवा. व्यक्तिगत समाधान आणि व्यावसायिक बढती यांत समतोल साधावा, असा आपला प्रयत्न असतो़  बव्हंशी मोठाल्या वेतनातून भल्यामोठय़ा व्यावसायिक उलाढाली आकाराला येत असतात आणि व्यक्तिगत समाधान देणाऱ्या कृती या नेहमीच काही तुम्ही अपेक्षा करत असलेल्या जीवनशैलीशी जुळलेल्या नसतात.. अशा वेळी मोठं वेतन की समाधान यांतला कुठला पर्याय निवडायचा, हे तुमच्यावर आहे.

जर आपण आपल्या सर्जनशीलतेच्या गरजेला उद्दिपित करणारे आव्हान स्वीकारले तर त्यातून जे साध्य होईल त्याची जबाबदारी आपल्यावरच येते. त्यातील सहभाग आणि आपण ते करत असल्याची भावना हीदेखील आपल्याला मिळालेल्या पैशाइतकीच महत्त्वाची असते.

सुरक्षित, आरामदायी आणि तथाकथित प्रतिष्ठित जगण्यात जबाबदारी कमी असते.. पण त्यामुळे आपल्याला जे रितेपण येते, ते धोकादायक असते.

सर्जनशीलता ही मानवाला सर्वाधिक समाधान देणारी एकमेव गोष्ट असल्याचे मानले जाते. सर्जनशील असल्याने त्यातून आपण काय निर्माण करत आहेत, याची जबाबदारी आपलीच असते. म्हणूनच सर्जनशील व्हा. याद्वारे तुम्हाला तुमचं काम अधिक समाधान देणारं बनवता येईल.

तुमची सर्जनशीलता ही संभाव्य भीतीच्या, असुरक्षिततेच्या भावनांमध्ये नष्ट होणार नाही आणि अल्पावधीसाठी सामोऱ्या जाव्या लागणाऱ्या आव्हानांमध्ये गडगडत जाणार नाही, याची काळजी तुम्हाला घ्यायला हवी.

– गीता देसाई