वर्षभर आपण अभ्यास यासंदर्भात बोलत गेलो. एका सर्वात महत्त्वाच्या अभ्यासाबद्दल मात्र बोलायचंच राहिलं, तो म्हणजे ‘स्वत:चा अभ्यास.’

रोजच्या गडबडीत शांतपणे बसलोय, स्वत:च्या आयुष्याचा विचार करतोय, आपल्या क्षमता कशा वाढतील याविषयी चिंतन करतोय, असं घडत नाही. या बाबतीत आपण आपल्याला अनोळखीच राहतो.

cabinet deputy secretary mrunmai joshi guidance for upsc
माझीस्पर्धा परीक्षा :अभ्यास करावा नेटका…
medical treatment, pregnant minor, hospital , police complaint issue
अल्पवयीन गर्भवतीच्या उपचाराकरता इस्पितळाने पोलीस तक्रारीचा आग्रह धरणे अयोग्य…
kanyadan, valid marriage,
वैध लग्नाकरता कन्यादान नाही, तर सप्तपदी महत्त्वाची !
Loksatta vyaktivedh economics Nobel Prize Standards Daniel Kahneman
व्यक्तिवेध: डॅनिएल कानेमान

आपल्याला काय येतं, काय आवडतं, काय करायला आवडेल, काय जमू शकेल, कोणासारखं व्हायला आवडेल, आपल्यातील शक्तिस्थानं कोणती, कमकुवत बाजू कोणत्या यांसारख्या अनेक प्रश्नांना आपण भिडतच नाही.

मी अभ्यास का करतो? शाळा- महाविद्यालय- पदव्युत्तर शिक्षण.. पुढे काय? या भविष्यात डोकावायला लावणाऱ्या प्रश्नाला आपण सामोरं जातो का?

भोवतालच्या समाजात- देशात- जगात- काय चाललं आहे, ते मला पटतंय का, आवडतंय का, त्यात मला बदल करावेसे वाटतात का, वाटत असेल अथवा नसेल तरी माझी नेमकी भूमिका काय आहे.. असे विचार आपल्या मनात येतात का? आसपास विविध घटना घडतात. त्यावर अनेकजण प्रतिक्रियाही देतात. यशापयश, मानसन्मान, व्यवसायातील चढउतार, पैसा, प्रतिष्ठा या सर्वाना विविध व्यक्ती कशी भिडतात.. या साऱ्याकडे आपण डोळसपण बघायला शिकलं पाहिजे.

आयुष्यातल्या कठीण प्रसंगांना लोक कसे तोंड देतात, एखादी व्यक्ती, संस्था कशी घडते, कशी  मोठी होते हेही अभ्यासण्यासारखं असतं.

साहित्यातले नऊ रस आपल्याभोवती प्रत्यक्षात बरसत असतात. त्यात न्हाऊन निघालात तर आयुष्य अधिक अर्थपूर्ण होतं..

या सर्व गोष्टींशी कनेक्ट होणं म्हणजे स्वत:चा अभ्यास करत जाणं. आपण जसे आहोत तसं स्वत:ला स्वीकारणं, आपलं भवताल अधिक सुंदर, चांगलं, मोठं, मंगल करण्यासाठीचा विचार मनात येणं त्याचा सराव करणं म्हणजेही अभ्यासच.

त्यासाठी सारा आळस, कंटाळा, थकवा, दूर सारायला हवा. सतत नवं काही शोधत राहायला हवं. पाहणं, अनुभवणं, करणं म्हणजे अभ्यासच.

कोणत्याही वयात कोणतीाही गोष्ट शिकता येते आणि घेतलेलं शिक्षण कधीच वाया जात नाही अशी श्रद्धा मनात रुजवणं हाही अभ्यास.

जे स्वत:ला भावलं, आवडलं, पटलं, रुचलं ते इतरांना वाटा. त्यांना मिळालेल्या आनंदात तुम्हीही आनंदून जा. एखाद्याला समजून घ्यायचा प्रयत्न करा. त्याच्या आणि तुमच्याही नकळत तुमचा मदतीचा हात पुढे करा. असा विचार करण्याचा प्रयत्न हादेखील अभ्यासच.

अभ्यास कधीच वह्या, पुस्तक, गाईड, वर्कबुक, क्लासेस, प्रॅक्टिकल यात मावत नाही. परीक्षा, प्रश्नपत्रिकांत बंदिस्त करता येत नाही.

तुम्ही कितीही तयारीनं दिलेलं उत्तर केवळ त्याच क्षणापर्यंत बरोबर असतं. मात्र त्याचं मूल्यमापन मार्कात करता येत नाही. त्याचे संदर्भ, आयाम बदलत जातात याची जाणीव ठेवणं हाही अभ्यासच.

या आणि यांसारख्या अनेक गोष्टींचा स्वत:च्या वाढीच्या संदर्भात विचार करणं म्हणजे स्व-अभ्यासच. ज्याला हे थोडंफार जमतं त्याला त्याचा स्वत:चा सूर सापडतो. मग त्याचं स्वत:चं आयुष्य उजळून निघतंच, पण तो इतरांच्या आयुष्यातही प्रकाशदीप उजळतो. इतरांचा आवडता बनतो. त्याला फॉलोअर्स मिळतात. फॅन लाभतात. तो मोठा  होत असतो. स्वप्न, कर्तृत्वाची गगनभरारी घेताना त्याचे पाय जमिनीवर घट्ट असतात.

नाळ जुळलेली असते भूतकाळाशी, इतरांचे उपकार, ऋण, मदत यांची गंगाजळी असते. त्याचं ओझं वाटत नाही तेव्हा जीवन गंगौघासारखं होतं. असं व्हायचा प्रयत्न करू, असे व्हाल ही सदिच्छा, विश्वास, आशीर्वाद!

मला जे कळलं, समजलं ते तुमच्यापर्यंत पोचवलं आपण त्याला प्रतिसाद दिलात, त्याबद्दल धन्यवाद.

goreanuradha49@yahoo.in