बावनकशी यश मिळावं असं आपल्यापैकी प्रत्येकालाच वाटत असतं. अमूक एका क्षेत्रात आपल्याला सर्वोच्च पदावर पोहोचायचंय, अधिक पैसे मिळवायचेत, अधिक मित्र जोडायचेत, आरोग्य चांगलं राखायचंय अशा अनेक गोष्टी आपल्या यादीत असतात.. खरंतर या साऱ्या गोष्टी आपण संपादन करू शकतो. याचं कारण प्रत्येकातच आपलं स्वप्न पूर्ण करण्याची अथवा आपल्याला हवं ते साध्य करण्याची सुप्तशक्ती दडलेली असते. मात्र, या गोष्टी साध्य करण्यासाठी उत्तमतेचा ध्यास असावा लागतो. त्या जोरावर या साऱ्या गोष्टी शक्य होतात..

अत्युत्तम कामगिरीसाठी प्रयत्न करणे हा आज कुठल्याही व्यावसायिकतेचा महत्त्वाचा भाग आहे. यात जे काही तुम्ही कराल ते दर्जेदार होण्यासाठी प्रयत्न करणं येतं. या गुणधर्मामुळेच यशस्वी व्यक्ती इतरांपेक्षा वेगळ्या ठरतात.. उत्तमतेचा ध्यास घेतलेल्या व्यक्ती करिअरमध्ये वेगाने घोडदौड करू शकतात. अत्युत्तम कामगिरी होण्याकरता तुम्हाला तुमच्या ‘कम्फर्ट झोन’च्या बाहेर पडावे लागते. प्रयत्नांची पराकाष्ठा करत, स्वत:ला सुधारण्यासाठी सतत वेगवेगळ्या गोष्टी करून पाहाव्या लागतात. अपयश आलं तरी हे लक्षात ठेवायला हवं की प्रगतीचा रस्ता हा अपयशाच्या खाचखळग्यांतूनच जात असतो.. उत्तमतेचा सर्वात महत्त्वाचा निकष म्हणजे तुमची कामगिरी. प्रामाणिक प्रयत्नांतूनच तुम्ही अधिक शिकत जाता, त्यामुळे तुमचं ज्ञान विस्तारतं आणि प्रगतीचा राजमार्ग तुमच्यासाठी खुला होतो.

narendra modi, PM Narendra Modi,
हुकमी ‘नॅरेटिव्ह’ने यंदा मोदींना हुलकावणी दिली आहे का?
narendra modi
प्रचार संपल्यानंतर मोदींचे रालोआ उमेदवारांना पत्र
kanyadan, valid marriage,
वैध लग्नाकरता कन्यादान नाही, तर सप्तपदी महत्त्वाची !
Career MPSC exam Guidance UPSC job
करिअर मंत्र

’इच्छाशक्ती- इतर कुणासाठी म्हणून नव्हे तर ‘तुम्हाला स्वत:ला’ उत्तम कामगिरी करावी असं वाटणं गरजेचं आहे.
’ध्येयनिश्चिती- तुम्ही तुमचे ध्येय निश्चित करा. जर कुठले ध्येयच जर तुम्ही ठरवले नसेल तर अत्युत्तम कामगिरी बजावण्याची संधी तुम्हाला कशी प्राप्त होणार? लक्ष्य ठरवल्याने तुम्ही तुमचे काम अधिक एकाग्रतेने, प्रयत्न केंद्रित करून करता आणि मग ध्येयाच्या दिशेने तुमची आगेकूच निश्चित होते.
’उत्तमतेचे निकष बदला- तुम्ही ज्या क्षेत्रात काम करत आहात त्या क्षेत्रातील सर्वोत्तम लोक व्यक्तींची माहिती मिळवा. त्यांनी आपल्या कामात किती यश संपादन केले आहे.. त्यानुसार तुम्ही यशाचे निकष आणि संकेत निश्चित करा किंबहुना, त्या पल्याड झेपावण्याचा प्रयत्न करा.
’आत्मविश्वास महत्त्वाचा!- मी करू शकेन, हा आत्मविश्वास बाळगा. यश मिळवण्यासाठी आत्मविश्वास सर्वात महत्त्वाचा असतो. निश्चित केलेल्या उद्दिष्टाच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी ‘मी हे नक्कीच करू शकेन’ हा आत्मविश्वास बाळगणे आवश्यक आहे. जर काही कारणाने तुमचा आत्मविश्वास डळमळीत झाला तर याआधी तुम्ही मिळवलेल्या यशाचा विचार करा. ते यश छोटे होते की मोठे हे महत्त्वाचे नाही. पण त्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढू शकतो आणि ध्येयाच्या दिशेने वाटचाल करण्याची तुमची इच्छाही प्रबळ होऊ शकते. यशाचा एकेक टप्पा पार करताना तुमचा आत्मविश्वास अधिकाधिक बुलंद होत जातो..
’कामाची योजना बनवा- प्रत्येक ध्येयप्राप्तीसाठी सुयोग्य योजना अथवा आराखडा आवश्यक असतो. जितके मोठे तुमचे ध्येय असेल तितकी अचूक कामाची योजना हवी. यश मिळवण्यासाठी एक ठोस योजना आखा, ती अमलात आणण्यासाठी जीवाचे रान करा आणि आपल्या कामाच्या योजनेचे सातत्याने पुनरावलोकनही करा.
’उत्तम कामांपासून आणि काम करणाऱ्यांपासून शिका- तुम्हाला ज्या क्षेत्रात यश मिळवायचं आहे, त्यातील सवरेत्कृष्ट व्यक्तींच्या कामाचा अभ्यास करा. त्यांची कामाची पद्धत न्याहाळा. शक्य असल्यास त्यांचे कामासंदर्भातील विचार, अनुभव ऐका. त्यातून तुम्हाला बरंच शिकता येईल.
’ स्वत:ला मर्यादा घालून घेऊ नका- तुमच्या ध्येयापर्यंत तुम्हाला पोहोचवणारी लहानातील लहान गोष्ट करण्यास कचरू नका. नवी गोष्ट शिकण्याचा एखादा प्रयत्न जरी तुम्ही गमावलात तर त्यातून तुमची संभाव्य संधी हुकू शकते. त्याउलट मिळालेल्या प्रत्येक

संधीकडे तुम्ही खुलेपणाने पाहिलंत तर त्या संधी तुमच्या यशाचा भक्कम पाया ठरतील, यात शंका नाही.
’मेहनत हवी- मिळणाऱ्या प्रत्येक यशासोबत कठोर मेहनतही येते. मेहनतीशिवाय अपेक्षित निकाल हाती येत नाहीत. भोवताली जर तुम्ही पाहिलंत तर तुमच्या लक्षात येईल- लवकरात लवकर श्रीमंत होण्याचा मार्ग अनुसरणाऱ्या व्यक्ती कुठल्याही क्षेत्रात फार काळ टिकू शकत नाहीत. केवळ कठोर मेहनत ही एकच गोष्ट आहे, ज्या आधारे जगाच्या पाठीवर कुठेही तुम्ही दीर्घकाळ कार्यरत राहू शकता आणि स्वत:ची प्रगती साध्य करू शकता. जर तुम्ही एखाद्या क्षेत्रात मनापासून वेळ आणि प्रयत्नांची गुंतवणूक कराल तर नक्कीच सकारात्मक परिणाम दिसू लागतील.
’प्रयत्नांवर लक्ष केंद्रित करा- तुम्हाला हवे असलेले परिणाम साध्य करण्यासाठी योग्य दिशेने परिणामकारक प्रयत्न करणे आवश्यक ठरते. तुमच्यावर सोपवलेल्या कामाहून अधिक काम करा. कामापलीकडे या कामाला पूरक ठरणाऱ्या उपक्रमांमध्ये सहभागी व्हा. त्या क्षेत्रात अत्युत्तम कामगिरी बजावण्यासाठी वाढीव प्रयत्न आवश्यक असता.
’बदलांशी जुळवून घ्या- अत्युत्तम कामगिरी बजावण्यासाठी नव्या परिस्थितीशी जुळवून घेणे हा गुण अत्यंत महत्त्वाचा ठरतो. कुठल्याही क्षेत्रात बदल अपरिहार्य असतो. त्याला सामोरे जात, आपल्यात अनुरूप बदल करणे आणि परिस्थितीशी जुळवून घेणे आवश्यक असते. हे तुमच्या योजनांनाही लागू होते. ठरवलेल्या योजनांशी चिकटून बसू नका. आवश्यक भासल्यास त्यात बदलही करा. तुमच्या योजना परिणामकारक ठरल्या नाहीत तर त्यात सुधार करा अथवा त्या राबवणे थांबवा.
’निराश होऊन प्रयत्न सोडू नका- प्रयत्नांची कास सोडू नका. आपण जोवर आपला पराजय मान्य करीत नाही, तोवर आपला पराभव होत नसतो, हे लक्षात ठेवा. एखादी मोठी समस्या उद्भवली तर त्याचा एकेका तुकडय़ामध्ये विचार करा. तसे केल्यास तुम्हाला ती समस्या सोडवणे शक्य होईल. प्रयत्न करत राहिल्यास तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत नक्कीच पोहोचू शकता.

‘कम्फर्ट झोन’च्या पलीकडे पोहोचण्यासाठी..
’संधी मिळेल तेव्हा कामात पुढाकार घ्या. कुठलीही नवी गोष्ट करण्याची संधी चालून आली तर त्याला ‘नाही’ म्हणू नका. प्रयत्नांच्या जोरावर तुम्ही ती निभावू शकाल आणि मग ती गोष्ट करण्याचा आत्मविश्वास तुमच्यात जागा होईल.
’तुम्हाला नेमून दिलेल्या कामाची जबाबदारी स्वीकारा. ते काम उत्तमरीत्या पार पडण्यासाठी प्रयत्न करा.
’तुम्ही जे ध्येय निश्चित केले आहे ते गाठण्यासाठी प्राधान्यक्रम ठरवा.
’स्पर्धात्मक वातावरणात ‘मी ही गोष्ट करू शकतो’ हा दृष्टिकोन बाळगणे महत्त्वाचे ठरते. समस्या ओलांडून पुढे जाण्यापेक्षा किंवा त्या दुसऱ्या कुणाच्या तरी पुढय़ात सरकावण्यापेक्षा स्वत: त्या समस्या सोडविण्याचा
प्रयत्न करा.
’तुमच्यावर सोपवलेल्या कामापेक्षा कांकणभर अधिक काम करा. तुमच्याकडून जे काम करणे अपेक्षित आहे ते दर्जा आणि प्रमाण या दोन्ही आघाडय़ांवर अधिक करण्याचा प्रयत्न करा.
’कामात उत्साह दाखवा. तुमचा कामाबाबतचा सकारात्मक दृष्टिकोन इतरांच्या लगेचच लक्षात येतो.
’कामात येणाऱ्या संभाव्य अडचणींचे भान ठेवा आणि त्या येऊ नयेत यासाठी उपाययोजना करा.
’काम ज्या पद्धतीने करता, त्या पद्धतींत सातत्याने सुधारणा करा.
’काम करताना नावीन्यपूर्ण पद्धती अनुसरा. नव्या विचारांना उत्तेजन द्या.
’क्षमता वृद्धिंगत करणारी नवी कौशल्ये शिका.
’आपल्या कामाचे स्वत: सतत परीक्षण करा.
’यश मिळवण्यासाठी आवश्यक ठरणारी दृष्टी
विकसित करा.
’कामातील जोखीम आणि लाभ ओळखा.